87 वर्षाचे अरोटे थरथरत्या शब्दाने म्हणाले, कारखाना टिकवायचा असेल तर पिचड-गायकारांनी एकत्र यावं, निवडणुका नको, हवं तर मी बोलेल.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
सिताराम पाटील गायकर आणि मी तसेच पिचड साहेब हे देखील माझे एक चांगले मित्र आहे. सन 1980 सालापासून आम्ही राजकारणात आहोत. पिचडांच्या विश्वासातील माणूस म्हणून गायकरांनी राजकारणात चांगले स्थान मिळविले आणि बोलबोल करता त्यांच्या रुपाने बहुजन नेतृत्व म्हणून उदयास आले. मी, त्यांचा राजकीय सहकारी आहे. त्यामुळे, राज्याच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही आमने-सामने येत होतो. त्यांनी कधी द्वेषाचे राजकारण केले नाही. तीच संस्कृती पिचडांची देखील आहे. मात्र, त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मानसे जोडण्याचे काम, येथील विरोधक आणि बहुजन चेहरे एकसंघ ठेवण्याचे काम गायकर पाटील यांनी केले. याच दरम्यान त्यांना साहेबांचे विश्वासू म्हणून महानंदा तर कधी जिल्हा बँक, दुधसंघ आणि अगस्ति सहकारी साखर कारखान्यावर चांगली संधी मिळाली. त्यातून त्यांचे सहकारज्ञान हे प्रगल्भ झाले. त्यामुळे, त्यांना आता सहकाराची नाडी माहित झाली आहे. मात्र, तरी देखील उद्याचा कारखाना टिकवायचा असेल तर तो सामोपचाराने बिनविरोध कसा होईल. याचा विचार केला पाहिजे. पिचड आणि गायकर यांनी एकत्र येऊन कोणताही अहंभाव न ठेवता शेतकर्यांच्या हितासाठी एक आले पाहिजे. त्यासाठी हवंतर मी मध्यती करु शकतो. दोघांशी बोलु शकतो. अशा प्रकारचे मत शेतकरी नेते झुंबराव आरोटे यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना व्यक्त केले. त्यांचे वय 87 वर्षे असून अगदी पोटतिडकीने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर, दोन्ही डोळ्यांना ते दृष्टीहीन असताना देखील येथील शेतकरी जगला पाहिजे अशी तळमळीची भूमिका त्यांनी मांडली.
खरंतर आरोप-प्रत्यारोप करणे हे फार सोपे असते. मात्र, प्रत्यक्षात काम करणे त्यातील अडी-अडचणींवर मात करून संस्था चालविणे हे फार अवघड असते. ते काम पिचड आणि गायकर यांनी आजवर केले आहे. येथील संस्था उभ्या करण्यात पिचड साहेबांचा मोठा वाटा असला तरी त्या चालविण्याची कसब गायकारांकडे आहे. म्हणून त्यांनी तालुक्यातील प्रत्येक संस्थेत काम केले आहे. त्या सर्व संस्था आज उभ्या आहेत. एव्हाणा, ते जिल्हा बँकेत चेअरमन होते तेव्हा अगस्ति सहकारी साखर कारखाना फार अडचणीत होता. त्या पडत्या काळात त्यांनी एमएससी बँकेतून जे काही अगस्ति कारखान्याला कर्ज मिळत होते. ते एडीसी बँकेत नगरला रुपांतरीत केले आणि तेथून कर्ज काढल्यानंतर आपला कारखाना सुरळीत चालला. कोणी म्हणत असेल की कारखान्यावर कर्ज झाले, कोणी महाभाग आरोप करीत असतील. मात्र, आज जिल्ह्यातल्याच नव्हे.! राज्यातल्या प्रत्येक कारखान्यांवर कर्ज आहे. उगच विरोध करायचा म्हणून तो करण्यात काय अर्थ आहे. संस्था चालल्या पाहिजे हे देखील प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. आम्ही आयुष्यात पिचड साहेबांना विरोध केला. मात्र, कोठे खोडा घालण्याचे काम केले नाही. आमच्याकडे अभ्यास आणि लढण्याची शक्ती असून देखील त्याचा इतरांप्रमाणे दुरूपयोग केला नाही. त्यामुळे, आज अंतीम क्षणी देखील मी शेतकरी जगावा म्हणून माझी भूमिका प्रमाणिकपणे मांडत आहे.
आज, मी पाहतो आहे अकोले नगरपंचायतीचा निकाल राष्ट्रवादीच्या विरोधात लागला आहे. पिचड साहेबांना यश आले त्याबाबत कोणाला दु:ख नसावे. मात्र, नगरपंचायत आणि सहकाराच्या निवडणुका ह्या फार वेगळ्या असतात. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. आज, ज्या पद्धतीने तालुक्याचे राजकारण चालु आहे. ते फार घातक असून विकासाच्या दृष्टीचे नाही हे माझ्या लक्षात येत आहे. त्यामुळे, गायकर आणि पिचड किंवा पिचड आणि लहामटे अशा प्रकारचा वाद कोणी लावू पहात असेल तर तशी काही अकोले तालुक्याची राजकीय संस्कृती मुळीच नाही. विरोध हा निवडणुकीपुरता असला पाहिजे त्यानंतर मात्र द्वेषाचा लावलेश देखील दिसता कामा नये. काल जे काही धोतर मिरवणुकीत नाचविले गेले. त्याचे कोणीच समर्थन करू शकत नाही. कोण कोणाच्या वयाच्या मर्यादा राखायला तयार नाही, कोणी तालुक्यासाठी काय-काय योगदान केले ते गृहीत धरायला तयार नाहीत. हे पाहिल्यानंतर फार वाईट वाटते आहे. परंतु आता आमच्यासारखे ज्येष्ठनेते अंथुरणाला खिळले आहेत. 90 दी जवळ केल्याने शरिर क्षीण झाले आहे मात्र, विचारांची प्रगल्भता आजही कायम आहे. त्या चळवळीतील जिवणाची धार अद्याप आमच्या रक्तातून कमी झालेली नाही. आजही शेतकर्यांच्या हितासाठी आमच्या धमन्या दुथडी भरुन वाहतात....
वास्तवत: अगस्ति सहकारी साखर कारखाना चालु ठेवायचा असेल तर पिचड साहेब आणि गायकर साहेब हे दोघे महत्वाचे घटक आहेत. यांनी खरंतर तालुक्यातील शेतकर्यांच्या हितासाठी एकत्र आले पाहिजे. तालुक्यातील अन्य निवडणुका आणि सहकाराच्या निवडणुका ह्या फार वेगळ्या असतात. त्यामुळे, कारखान्यात शेतकर्यांच्या हिताचा विचार व्हायला हवा. कारण, कोरोनाच्या काळामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. टोमॅटो, भुईमूग, कांदे यांना हमीभाव नाही. त्यामुळे, शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशात असे एकमेव पिक आहे. ते म्हणजे उस.! की, ज्याला हमीभाव आहे. तेच एकमेव शाश्वत उत्पन्न आहे. तेथून शेतकर्यांना मोठा आधार मिळतो अन्यथा शेतकर्यांची फार बिकट अवस्था निर्माण होईल. अशात जर वादाच्या भोवर्यात कारखाना मोडीत निघाला तर येथील शेतकर्यांचे फार मोठे नुकसान होईल. जे कधी भरुन निघु शकत नाही. त्यामुळे, येथील एक एकर शेती असणारा शेतकरी देखील हतबल न होता आपला संसार चालवू शकतो. इतकी ताकद या कारखान्यात आहे. त्यामुळे, पिचड आणि गायकर हे एकत्र आले तर ही कामधेनू टिकेल आणि जर निवडणुका लागल्या तर तालुक्याला याचा तोटा सहन करावा लागेल. त्यामुळे, तेथे टाळता येईल तितके राजकारण टाळले पाहिजे. हवं तर मी पिचड साहेब आणि गायकर साहेब यांच्याशी मी बोलणार आहे.
खरंतर गायकरांनी त्यांच्या राजकीय जिवणात फार नातेगोते संभाळले आहेत. जे स्वत:ला नेते म्हणून मिरवतात त्यांनी कोणाची आणि किती मुले कामाला लावली? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे का? मात्र, गायकर पाटलांनी तालुक्यातील कित्तेक मुलांना नोकर्या लावून दिल्या आहेत. बहुजन चेहर्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली आहे. अनेक नेते उभे केले आहेत. गाव तेथे कार्यकर्ता आणि नेता उभा करून त्यांचे संघटन बांधले आहे. त्यामुळे, त्यांच्या पाठीशी सभासद उत्पादक फार मोठ्या प्रमाणावर आहेत. निवडणुकीची वेळ आले तरी ते तुलनात्मक चांगला आणि अधिकचा संघर्ष ते करतील. इतकेच काय.! त्यांना माननारा वर्ग आणि नात्यागोत्याचे राजकारण यांची गोळाबेरीज ते उत्तम रित्या बसवू शकतात. त्यामुळे ते कोठे कमी पडणार नाही. मात्र, तरी निवडणुका ह्या शेतकर्यांच्या दृष्टीने घातक राहिल. त्यामुळे, ही निवडणुक सामोपचाराने घेतली तर योग्य राहिल असे मला वाटते आहे. कारण, आम्ही शरिराने म्हतारे झालो तरी अनुभवाने आजही तितकेच प्रगल्भ आहोत. त्यामुळे, दोन्ही पक्षातील नेत्यांनी देखील फार टोकाचे आरोप प्रत्यारोप न करता कारखाना चालले कसे हे पाहिले पाहिजे.