सावंतांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन केजरीवाल अकोल्याचे चेअरमन होऊ पाहताय.! होय.! बी.जे. देशमुख संधी साधु केजरीवाल - विकास शेटे

        सार्वभौम (अकोले) :-    
                                  दि. 5 एप्रिल 2011 साली ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयका संदर्भात जंतर-मंतरवर आंदोलन केले होते. यात हजारे साहेबांनी जनतेच्या हितासाठी भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे आयुष्य वेचले. मात्र, केजरीवाल यांनी आण्णांच्या आंदोलनात येऊन दिल्ली काबीज केली असेच आरोप झाले. अशाच प्रकारचे राजकीय डावपेच आता अकोल्यात दिसून लागले आहे. सावंत साहेबांच्या प्रतिष्ठेचा आणि कार्याचा फायदा घेऊन बी.जे.देशमुख हे त्यांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन तालुक्यात राजकारण करू पहात आहे. केजरीवाल देखील एक हुशार व्यक्तीमत्व होते. मात्र, राजकारणाचा हव्यास लागला आणि दुसर्‍याला नालायक ठरवून आपण गादीवर कसे बसू या इर्शेने त्यांनी आण्णांचा घात केला. तसेच गणित बी.जे.देशमुख अकोल्यात वापरु पाहत आहे. त्यामुळे, अमित भांगरे यांनी जे काही वक्तव्य केले. की, बी.जे.देशमुख हे तालुक्याचे केजरीवाल आहेत. हे अगदी सत्य आहे. मात्र, केजरीवाल यांनी एका ज्येष्ठ नेत्याच्या धगधगत्या निखार्‍याखाली आपली पोळी भाजून घेतली. त्यांना अनेक जणांनी नावे ठेवली. नंतर खुद्द हजारे साहेबांनी देखील त्यांच्यावर ताशेरे ओढले. त्यामुळे, प्रत्येक गोष्टीला एक आवश्यक वेळ उत्तर देत असते.  ती येणार्‍या काळात नक्की येइल. कारण, यांनी परिवर्तनाच्या नावाखाली जे काही राजकीय घुसखोरीचे वर्तन सुरू केले आहे. त्याला लोक भिक घालणार नाही. त्यामुळे, ते हे संधीसाधु केजरीवाल किती वेळी तडजोडीला बसतात आणि पुन्हा बंड करतात. याहून जनतेला देखील यांचा अंदाज आला आहे. येणार्‍या काळात यांच्या डावपेचाचा छुमंतर झाल्याशिवाय रहणार नाही. अशा प्रकारचे मत राष्ट्रवादीचे नेते विकास कचरुपाटील शेटे यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले की, कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असतात. पुर्वी कारखान्याचे इलेक्शन लागणार म्हणून यांनी गावोगावी शेतकरी आणि सभासदांमध्ये संभ्रम निर्माण केला. हा कारखाना कडेलोटावर आहे. अशा टिमक्या वाजविल्या आणि बदनामी देखील केली. मग कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर आहे तर यांना कशाला तेथे स्थान पाहिजे आहे? एकीकडे मी कारखाना निवडणुक लढविणार नाही असे यांनी म्हणायचे आणि दुसर्‍याने म्हणायचे नाही नाही साहेब.! जनतेने तुम्हाला विनंती केली तर तुम्हाला लढावं लागेल. म्हणजे, तु मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखे करेल. अशा पद्धतीचे अधोगती राजकारण यांचे सुरू आहे. दुर्दैव इतके आहे की, ज्यांनी तालुक्यासाठी कवडीमोलाचे योगदान दिले नाही. त्यांना तालुक्यातील आदरतित्थ्य नेते मदत करतात. त्यामुळे, आपलेच दात आणि आपलेच ओठ काय बोलावं कळत नाही. मात्र, असे संधीसाधु केजरीवाल या तालुक्याच्या विकासाला आणि विशेषत: कारखान्याला घातक आहे. हेच मी नमुद करतो.

जंतर-मंतरच्या आंदोलनाचा फायदा केजरीवाल यांना झाला. त्यामुळे, जे कोणी अतिहुशार असता ते त्यांना काही काम नसले की अशा आंदोलनाची कुर्‍हाड हाती घेतात. मग चर्चेत येण्यासाठी, प्रतिष्ठा मिळविण्यासाठी, राजकीय स्थैर्यासाठी जो कोणी लिडर आहे. त्याच्यावर घाव घालायचा आणि चर्चेत यायचे. असा फंडा शातीर निवृत्त मानसांचा असतो. माग तालुक्यात देखील असेच झाले. परिवर्तन मंडळ नावाचे भोंगे तिनचार ठिकाणी वाजले आणि त्यांनी तालुक्यातील फक्त लोकाभिमूख बहुजन नेत्याला टारगेट केले. अगदी इतके की, तोंडात येईल ते बरळणे सुरू केले. विशेष म्हणजे ज्यांच्यासाठी बहुजन नेत्याने बरेच काही केले. त्यांनी देखील कोणतीच कसर सोडली नाही. त्यामुळे, तालुक्याचे राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊ शकते आणि उपकाराची फेड अपकाराने देखील केली जाते हेच अनेकांनी दाखवून दिले. मात्र, याच मंडळाचा बाजार उठविण्याचे काम जनतेने केले. चारदोन डोकी घेऊन जो काही शब्दांचा नंगानाच केला गेला. तो जनतेला रुचला नाही. हे लक्षात येताच यांनी तीन सभांमध्ये आपले बिर्‍हाड आवरुन घेतले. त्यामुळे, तालुक्याचा केजरीवाल देखील गेली कित्तेक दिवस शांत होता. मात्र, आता न.पंचायतीच्या निवडणुका झाल्या, कारखाना कधीही लागू शकतो. त्यामुळे, माईक मिळाला की, केजरीवालांना संधी साधल्याशिवाय होत नाही. ही टिका आता एकटा विकास शेटे नव्हे.! तर तालुका म्हणू लागला आहे.

खरंतर, धोतर नाचविणारी औलाद बहुजनांची नसेल. त्यामुळे, त्यांच्या मानत व्यक्तीद्वेष आहे. मात्र, ज्यांनी कोणी हे कृत्य नियोजनपुर्वक केले आहे. त्यांना देखील ही जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. मात्र, केजरीवाल यांनी जे काही त्यांचे पित्तू सोडले आहे. त्यांनी केवळ बहुजन नेत्यांना बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. याचे उत्तर देखील योग्यवेळी दिले जाईल. मात्र, जर विरोधकांना कारखान्याची सुत्रे हवी असतील तर त्यासाठी दिल्ल्लीचे केजरीवाल देखील इतक्या थडक्लास पातळीवर गेले नव्हते. तितके हे लोक जात आहेत. खरंतर आता कारखाना यांनी बदनाम केला आहे. तरी देखील गायकर साहेबांनी तो मोठ्या शिताफीने पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे, मायबाप जनतेने ठरवायचे आहे. केजरीवाल सारख्या संधीसाधुंच्या आरोपांना बळी पडायचे अन चालु गाडीची कानखीळ काढणार्‍यांना अजून किती अभय द्यायचा आहे. हा कारखाना 2002 प्रमाणे बंद पाडून तोट्यात घालायचा आहे की, ज्या पवार साहेबांनी कारखान्याला पुन्हा उभे केले. त्यांच्या विश्वासातील गायकर साहेबांच्या पाठीशी उभे राहायचे आहे...!