आरे वा.! राष्ट्रवादीच्या गटनेत्याने भाजपचा आख्खा पॅनल निवडून आणला.! काँग्रेसमुळे 8 जागा पडल्या तर 13 जागा जिंकल्या असत्या.!

 


- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

              अकोले नगरपंचायतीचा निकाल आज जाहिर झाला आहे. त्यात भाजपला 12 जागा, राष्ट्रावादी, शिवसेनेला प्रत्येकी 2 तर काँग्रेसला एक अशा 17 जागांच्या निवडणुका होत्या. यात डॉ. किरण लहामटे आणि सिताराम पाटील गायकर यांना फार मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर, त्यांना पराभूत करण्याचे काम कोण्या त्रयस्त व्यक्तीने केले नसून राष्ट्रवादीचे विद्यमान गटनेते कैलास वाकचौरे यांनी केल्याचे लक्षात येथे. अर्थात त्यांचे संयमी राजकारण आणि जे काही नियोजन होते. त्याचे प्रतिबिंब या निवडणुकीत पहायला मिळाले. तर, दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढले असते तर महाविकास आघाडीच्या 13 जागेंवर त्यांनी अगदी सहज विजय मिळविला असता. मात्र, जे बाळासाहेब थोरात केंद्रात आणि राज्यात भाजपला विरोध दर्शवितात. त्यांनी अकोल्यात महाविकास आघाडी होऊ दिली नाही. हे त्यांनीच अकोल्यातील भाषणात नमुद केले. म्हणजे, अकोेल्यात नकळत काँग्रेसने भाजपला सपोर्ट केला. तथा एकेकाळी वंचित आघाडीला भाजपची बी टिम संबोधणार्‍या काँग्रेसला येथे भाजपची बी टिम म्हणून संबोधल्याची टिका झाली. त्यामुळे, काँग्रेसमुळेच अकोल्यात कमळ फुलल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे.

आज (दि.19) अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. भाजपने एकहाती आपली सत्ता प्रस्तापित केली आहे. भलेही नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अद्याप बाकी आहे. मात्र, तरी देखील भाजपचा विजय हा प्रखर सुर्यासारखा आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खर्‍या अर्थाने आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे गटनेते कैलास वाकचौरे यांनी भाजपची भिस्त संभाळली आणि अकोले तालुक्याच्या इतिहासात कधी नव्हे असा विजय भाजपच्या पारड्यात टाकला. त्यामुळे, त्यांचे कौतुक करणे हे क्रमप्राप्त आहे. परंतु, येथील राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांसह सर्वच पदाधिकार्‍यांनी स्वत:चा कामाचे आणि नियोजनाचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. कारण, जो आमदार जवळजवळ दिड लाख मतांनी निवडून आला. त्या आमदारास किती खाली पहायची वेळ आली आहे.

खरंतर, राष्ट्रवादीचे संघटन आणि नियोजन हे पुर्णत: शुन्य होते. ज्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या द्याव्यात तेच चोर निघावेत अशीच परिस्थिती येथे पहायला मिळाली. त्यामुळे, राज्यात आज लागलेल्या निकालात राष्ट्रवादी पक्ष आज एक नंबर विजयी असताना अकोले तालुक्यात तो शुन्य झाल्याचे पहायला मिळाले. याचे पातक कोणाचे आहे? हे देखील येथील नेत्यांनी अभ्यासले पाहिजे. कारण, डॉ. लहामटे हे अवघ्या दिड दोन लाख रुपयांत निवडून आलेला प्रतिनिधी आहे. असे असताना त्यांनी शहरातील उंबरा ना उंबरा पायाखाली घातला होता. त्याचे फलित काही अंशी दिसून आले. मात्र, त्यांने नेते आणि कार्यकर्ते नेमकी काय करत होते? त्यांच्या पाठीशी किती जनाधार होता? त्यांनी गेल्या महिनाभर किती प्रचार केला? अक्षरश: या सागळ्यांचे उत्तर कोणताच पादाधिकारी छातीठोकपणे देऊ शकत नाही. इतकेच काय.! भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी आवाहन केले की, या पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून आ.डॉ. किरण लहामटे यांनी त्यांच्या आमदारकीचा राजिनामा दिला पाहिजे. म्हणजे, लोक राजिनामे मागू लागले आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अद्याप त्यांची नैतीक जबाबदारी म्हणून राजिनामे द्यायला तयार नाहीत. याचाच अर्थ येणार्‍या काळात देखील पक्षाचा सुपडासाप केल्याशिवाय आम्ही पदच्युत होणार नाही. अशीच शपत पदाधिकार्‍यांनी घेतल्याचे दिसते आहे की काय? अशी चर्चा तालुक्यात सुरू होती.

एकीकडे, निवडणुक सुरू होती तेव्हा अशोक भांगरे आणि सिताराम पाटील गायकर यांनी प्रथमत: कोणत्याही प्रक्रियेत लक्ष घातले नव्हते. त्यानंतर भांगरे गटाच्या काही कार्यकर्त्यांची तिकीटे नाकारल्याने त्यांनी निवडणुकीतून काढता पाय घेतल्याची चर्चा रंगली. तर, माझ्या 2019 च्या निवडणुकीत जे कार्यकर्ते सोबत होते. त्यांनी निवडणुकीला संधी मिळाली पाहिजे. अशी भुमिका डॉ. लहामटेंनी घेतल्यामुळे, गायकर यांनी देखील बघ्याची भूमिका घेतली. मात्र, जेव्हा भांगरेंनी डॉक्टरांची साथ सोडली तेव्हा जवळ-जवळ उमेदवार फायनल झाले होते. त्यामुळे, गायकर साहेबांनी नंतर स्वत: लक्ष घातले आणि फार उशिरा का होईना त्यांनी निवडणुक हाती घेतली. अर्थात आज त्यांच्यामुळेच निवडणुकीला रंग चढला. कारण, नात्यागोत्यांची गोळाबेरीज त्यांच्याइतकी कोणीच करू शकत नाही. तीच आजच्या निवडणुकीत पहायला मिळाली. तर, दुसर्‍यांदा देखील प्रभाग चार मध्ये भोईर गुरूजी यांना उमेदवारी मिळावी असा त्यांचा अग्रह होता. तर 14 आणि 13 मध्ये देखील त्यांनी वेगळी नावे पुढे काढली होती. मात्र, त्यांच्या मनाजोगे झाले नाही. शहरातील कारभार अन्य लोकांनी घेतल्यामुळे त्यांनी केवळ बळ देण्याचे काम केल्याचे पहायला मिळाले. तर त्यांनी अचानक वंदना शेटे यांनी उमेदवारी दिली आणि दोन शेटे उमेदवार असून देखील बबलु धुमाळ यांची जागा अवघ्या 7 मतांनी पडली. त्यामुळे, जर सगळी निवडणुक पहिल्यापासून त्यांच्या ताब्यात असती तर आज निकाल वेगळा लागला असता अशी चर्चा भाजपच्या नेत्यांकडून ऐकावयास मिळाली. मात्र, लोकं माझ्या मागे आहेत हा जो मीपणा होता. तो आमदारांचा मोडीत निघाल्याचे पहायला मिळाले आहे.

एकंदर, आज भाजपला 12 जागांवर विजय मिळाला आहे. तर एकुण आठ प्रभागांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला तोटा झाला आहे. यात प्रभाग 2, 3, 4, 11, 12, 13, 14 आणि 16 हे प्रभाग महाविकास आघाडीच्या हातातून गेले आहे. त्यामुळे, भाजपला फायदा झाला आहे. एकंदर, आमदारांच्या माथ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या काँग्रेसने प्रचंड ताठर भूमिका घेतली आणि त्याचा फायदा भाजपला झाला. तर, प्रभाग क्र. 4, 2, 14, आणि 16 येथे काँग्रेसला देखील तोटा झाल्याचे पहायला मिळाले आहे. तर, काँग्रेसमुळे प्रभाग क्र. 3, 11, 12, 13 या ठिकाणी काँग्रेसमुळे, राष्ट्रवादीला तोटा झाला आहे. या सर्व प्रभागातून जे उमेदवार पराभूत झाले आहे. तेथे काँग्रेस व राष्ट्रवादी हे एकमेकांना घातक ठरले आहे. त्यामुळे, आता राज्यात एक मेसेज तर गेला आहे. की, भाजपं ही अधिकाधिक बळकट होत आहे. तर अकोल्यासारख्या ग्रामीण भागात कमळ फुलू लागले आहे. त्यामुळे, याचा तोटा राष्ट्रवादीला कमी पण काँग्रेसला जास्त होणार आहे. अर्थात 2019 प्रमाणे येथे भाजप म्हणजे पिचड साहेब जिकडे जातील तिकडे हे नगरसेवक फिरतील. त्यामुळे, भाजपचे कमी मात्र, पिचड साहेबांचे हात बळकट झाले. असेच म्हणावे लागेल. तर, या विजयाकडे पाहिले तर पहिल्यांदी सत्ता ही पिचडांच्याच ताब्यात होती. तर, शहरावर त्यांची कमांड देखील आहे. त्यामुळे, विजय झाला हे निच्छित असले तरी याचे पडसाद येणार्‍या निवडणुकींवर किती उमटतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

क्रमश: भाग 1