छी.! गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला, नग्न अवस्थेत फोटो काढून पोटावर सिगारेटचे चटके दिले.! चौघांवर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर येथे एका कॉलेजात शिकणार्या विद्यार्थीनीला काही तरुणांनी स्विफ्ट कारमध्ये बळजबरीने बसून नेले. सिन्नर येथील एका लॉजवर नेवून एकाने तिला उग्र वासाचे शितपेय देऊन तिच्यावर अत्याचार केला. तर, शरिर संबंध केल्यानंतर त्याने तिच्या पोटावर सिगारेटचे चटके देखील दिले. या दरम्यान, 18 वर्षीय मुलीचे अश्लिल फोटो काढून तिला मारहाण केली. ही घटना मंगळवार दि. 30 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9 ते रविवार दि. 2 डिसेंबर 2021 रोजीच्या दरम्यान घडली. यात पीडित तरूणीस वारंवार फसविण्यात आले असून घरच्यांना ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे, पीडितेच्या फिर्यादीनुसार चौघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सागर हाऊसिंग सोसायटी परिसरातील एक विद्यार्थीनी संगमनेरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कॉलेजला येत असताना आरोपी प्रविण अरुण लगड, संकेत भगवान राणे, दर्शन शिवाजी हिरे, राहुल कौलास वाघमारे (रा. संगमनेर व सिन्नर) यांनी तिला कॉलेजच्या समोर आडविले. यातील प्रविण याने तिला गाडीत घेऊन सिन्नर गाठले आणि तेथील सदानंद लॉजवर नेले. पीडित मुलीची इच्छा नसताना देखील आरोपी प्रविण आणि त्याच्या मित्रांनी तिला गुंगीचे शितपेय पाजले. पीडितेला गुंगी आल्यानंतर आरोपी प्रविण लगड याने तिच्यावर बळजबरीने वारंवार बलात्कार केला. तर त्यानंतर त्याने पीडितेचे विवस्त्र फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढले. हा बहाद्दर येथेच थांबला नाही. तर याने सिगारेट ओढून तिच्या पोटावर देखील सिगारेटचे चटके दिले. असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, बुधवार दि. 1 डिसेंबर रोजी वरील चारही आरोपींनी पीडित तरूणीस नाशिक येथील पंचवटी येथे नेले. तेथे नेऊन तिच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देत लग्न करुन लग्नाच्या नोंदणी कागदांवर सह्या घेतल्या. त्यानंतर तिला घरी न सोडता यांनी पुन्हा सिन्नर येथे नेवून साई लॉजवर नेवून प्रविण याने तिची इच्छा नसताना अत्याचार केला आणि पुन्हा याने त्याच्या मोबाईलमध्ये अश्लिल फोटो काढले. तर, गुरूवार दि. 2 डिसेंबर 2021 रोजी यांनी पीडितेला सिन्नर पोलीस ठाण्यात नेऊन तिला तिच्या कुटुंबास ठार मारण्याची धमकी दिली आणि पोलिसांना सांगायला लावले की, मी माझ्या मर्जीने निघुन आले असून मला कोणीही पळवून आणलेले नाही. मी माझ्या सहखुशीने घरुन निघुन आलेली आहे. अशा प्रकारचा जबाब नोंदुन घेतला आणि त्यावर तिच्या सह्या घेण्यात आल्या. दरम्यान, मुलगी घरी आल्यानंतर तिने घडला प्रकार कथन केला असता फिर्यादीनुसार पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी यात तिघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करीत आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या हाहाकारानंतर बर्याच दिवसांनी शाळा-कॉलेज सुरू झाले आहेत. त्यामुळे, एकतर्फी प्रेमी, प्रेमयुगल, रोडरोमीयो, भाई, दादा, भैय्या, बॉस यांची रस्त्यांवर गर्दी दिसू लागली आहे. त्यामुळे, अशा व्यक्तींना विद्यार्थी-विद्यार्थीनींनी न घाबरता धडा शिकविला पाहिजे. अन्यथा पोलीस ठाण्यात किंवा शिक्षकांकडे तक्रार केली पाहिजे. खरंतर, पाल्यांनी आपल्या पालकांचा विश्वासघात न करता शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. गेल्या काही दिवसात असे लक्षात आले आहे की, कोरोनाची लाट कमी झाल्यानंतर अनेकांचे प्रेम उफाळुन आले आहेत. त्यामुळे, अगदी तरुण मुलांवर अत्याचाराचे गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे, मुलांच्या समुपदेशनाची गरज आता भासू लागली आहे.