आरे देवा.! संगमनेरात पुन्हा अँन्टीकरप्शनचा छापा.! दोन हजारांची लाच घेताना कर्मचारी अटकेत.! वायरमनला लाचलुचपतचा करंट.!



सार्वभौम (संगमनेर) :- 

                तक्रारदाराच्या आईच्या नावे मीटर घ्यायचे असल्याने कंत्राटी वायरमन याने दोन हजार रुपयांची  लाच घेतल्याचा खळबळजनक प्रकार आज गुरुवार दि.30 डिसेंबर 2021 रोजी दुपारच्या सुमारास घडला. यात श्रीधर गडाख (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) याला नगर लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. लाचखोर गडाख याने ही रक्कम स्विकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्यास अँन्टीकरप्शन  विभागाने ताब्यात घेतले असुन त्यांची संपत्ती, बँकखाते, घरझडती यासाठी पुढील प्रक्रीया सुरू केली आहे. यात संगमनेर तालुक्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. तर पोलीस अधीक्षक संजय कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली नगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधिक्षक खेडकर यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. तर संगमनेरपुर्वी चाकन पोलीस ठाण्यात तक्रारीहून कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरिक्षक सोमनाथ झेंडे याने ७० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. तर, या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता लक्षात आले. की, अख्तार शेख या व्यक्तीने स्वत:साठी १५ हजार देखील मागितले होते. म्हणजे तक्रारदार याचेकडे एकुण ८५ हजार रुपयांची मागणि केल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर, या घटनेची खात्री करुन लाचलुचपत विभागाने शेख याच्याभोवती सापळा रचला. त्यानंतर काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शेख याला पीएसआयच्या मागणि लाचेसह ८५ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तर, झेंडे या पीएसआयचे कारणाने नंतर समोर आले आहेत. आरोपीचे कॉल डिटेल्स तपासले असता हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे, दुसऱ्या करवी संपत्तीची हाव ठेवणारा तथा दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणारा पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात घावला आहे. आपले पितळ उघडे पडले हे लक्षात येताच तो पसार झाला असून पोलीस या पोलिस अधिकाऱ्याचा शोध घेत आहे.

         याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिवरगाव पावसा येथे तक्रारदाराच्या आईच्या नावाने मीटर बसवायचे होते. तक्रारदार यांनी मीटरच्या कनेक्शनसाठी डिपॉजित देखील भरले होते. परंतु, कंत्राटी वायरमन श्रीधर गडाख याने तक्रादाराला मेन कनेक्शन न देता तात्पुरते सर्विस कनेक्शन दिले होते. त्यामुळे, तक्रारदार यांना मीटर बसवण्यासाठी कंत्राटी वायरमन श्रीधर गडाख यांच्याकडे वेळोवेळी चकरा मारत होता, विनंती करत होता. परंतु, रोज नवे कारण सांगुन श्रीधर गडाख हा मीटर बसवण्यास टाळाटाळ करत होते. ते मीटर बसवण्यासाठी लाचखोर श्रीधर गडाख याने तक्रादाराकडे 2 हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तक्रारदार म्हणाले की, ज्यांच्या नावावर मीटर कनेक्शन घ्यायचे आहे. त्याचे डिपॉजित भरले आहे. त्यात पैसे कशासाठी द्यायचे? मात्र, ऐकतील ते कंत्राटी वायरमन कसले ? त्यांनी, तक्रादाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तक्रादार यांच्या वारंवार मागणीला वैतागल्याने त्यांनी थेट नगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर नगरचे पथक आज दुपारी थेट संगमनेरात दाखल झाले.

        दरम्यान, तक्रारदार हे त्यांच्या मतावर ठाम होते. त्यामुळे, लाचलुचपत विभागाने थेट हिवरगाव गाव गाठून सापळा रचला. हिवरगावातील एका किराणा दुकानात श्रीधर गडाख हे तक्रारदाराकडे 2 हजार रुपये घेत असल्याचे लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. आज दुपारी याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू होती. यात आणखी कोण आहेत का? यांनी यापुर्वी कोणाकडे अशी मागणी केली आहे का? यांच्या घरात तसेच बँकेत किती मालमत्ता आहे. आशा प्रकारची पुढील कारवाई सुरू आहे. तक्रारदार व लाचखोर गडाख हे एकाच गावचे असल्याने या पाठीमागे काही वादाची किनार होती का? अशी चर्चा गावात आता रंगु लागली आहे.

          दरम्यान, संगमनेर तालुक्यात किती भ्रष्टाचार बोकाळला आहे याची प्रचिती आता येऊ लागली आहे. संगमनेरात असे कुठले शासकीय व निम्नशासकीय कार्यालय राहिले नाही की, जिथे लाचलुचपत विभागाने छापा मारला नाही. त्यामुळे, येथे प्रत्येक शासकीय कार्यलयात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा संगमनेरातील सुज्ञ नागरिक करत आहे. अगदी पोलीस खात्यात अधिकाऱ्यांपासुन ते कर्मचाऱ्यांपर्यंत छापे मारल्याचे संगमनेरात पाहायला मिळाले. येथील हप्तेखोरीची अनेकदा अधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच काय.! सर्कलपासून ते तलाठी यांच्यावर कितीवेळा ट्रॅप होताना दिसत आहे. त्यामुळे, या वर्षी लाचखोरीत संगमनेर तालुका जिल्ह्यात अव्वल असल्याचे बोलले जात आहे.