नग्न करुन तरुणाचे मुंडके जाळले, पुर्वनियोजित कटातून अकोल्यात पुन्हा खून.! दारुच्या बाटल्या आणि जळीतकांडाचा तपास सुरू.!
अकोले तालुक्यातील राजूर येथे वाकी परिसरात एका 40 वर्षीय तरुणाला नग्न करुन त्याचा खून करण्यात आला. तर, मयत व्यक्ती कोण आहे याची ओळख पटू नये. यासाठी त्याचा चेहरा देखील जाळुन पुरावे नष्ट करण्यात आले. हा प्रकार दि. 28 डिसेंबर 2021 रोजी सकाळी वाकी पोलीस पाटलांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला आणि याबाबत माहिती दिली. त्यानंतर, साबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि काही संशयित गोष्टी त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. संबंधित मयत व्यक्तीचा चेहरा जाळुन टाकला असून शेजारीच काही दारुच्या बाटल्या देखील सापडल्याचे बोलले जात आहे. हा मृतदेह पोलिसांनी लोणी येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. हा खून हा पुर्वनियोजित असून अगदी कोल्ड माईंडने केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. अद्याप पोलिसांच्या हाती सबळ कोणताही पुरावे लागला नसून या खुनाची उकल करणे राजूर पोलिसांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजूर येथील वाकी परिसरातील पोलीस पाटील हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेताकडे चालले होते. तेव्हा त्यांना मुख्य रस्त्याच्या दोनशे मिटर आतमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह निदर्शनास पडला. अचानक पुर्ण नग्न अवस्थेत असलेला व्यक्ती आणि त्यात त्याचा चेहरा जाळुन टाकला होता. हे चित्र पाहताच त्यांना भिती वाटली. तेव्हा, तत्काळ त्यांनी राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर काही वेळातच तेथे पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला असता लक्षात आले की, हा मयत व्यक्तीच्या गळ्यात कशाचेतरी व्रण आहेत तर काही किरकोळ जखमा देखील आहेत. त्यामुळे, हा खून पुर्वीच गळा दाबून केला असावा आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी हे निर्जनस्थळ त्यांनी निवडले असावे असा त्यांनी अंदाज बांधला आहे.
दरम्यान, ज्या व्यक्तीला मारुन टाकले आहे. तो कदाचित अकोले तालुक्यातील तथा राजूर परिसरातील आहे का? त्याच्या मिसिंग बाबत नोंद आहे का? यासाठी पोलिसांनी काही चौकशी सुरु केली आहे. तर, गावातून कोणी हरविले किंवा गायब आहे का? याची देखील चौकशी सुरू केली आहे. कारण, जोवर हा व्यक्ती कोण आहे? याचे नाव-गाव कळत काही. तोवर त्याची हत्या कोणी केली? हे समजणे कठीण आहे. त्यामुळे, 24 तास उलटूनही अद्याप कोणताही सबळ पुरावा आणि माहिती पोलिसांच्या हाती नाही. मात्र, तरी देखील राजूर पोलीस या घटनेचा उलगडा करण्यासाठी कसोशिने प्रयत्न करीत आहेत. हा व्यक्ती गोरा असून गोल चेहरा आहे. उंची 6 फुट असून डोक्याचे केस लांब वाढलेले आहेत. तर, घटनास्थळी दोनशे रुपयांची नोट सापडली असून एक दारुची बाटली देखील मिळून आली आहे. सद्यस्थितीला या व्यक्तीचा चेहरा जळालेला असून ज्यांनी कोणी हे कृत्य केला. त्याने मयताची ओळख पटू नये म्हणून हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनिय दिसून येते. तर, चेहरा जळालेला असला तरी कमी प्रमाणात जाळ लागल्याने चेहरा किमान ओळखता येईल अशा स्थिती आहे. त्यामुळे, पोलीस नेमकी कशा पद्धतीने हत्या करणार्याचा शोध लावतात. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, दि. 3 जुलै 2020 रोजी वाकी परिसरात खिरविरे येथील प्रदिप भांगरे (वय 25, रा. खिरविरे, ता. अकोले) यांची खंडोळ्या करुन हत्या करण्यात आली होती. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने लावला होता. तर, देवगाव परिसरात एका अर्भकाची हत्या करण्यात आली होती. तो तापस अद्याप कायम तपासावर आहे. तर, गेल्या काही दिवसांपुर्वी साबळे यांच्या पथकाने 37 कोटी रुपयांचा इन्शुरन्स काढू पाहणार्या प्रभाकर वाकचौरे या मोहरक्यास बेड्या ठोकल्या होत्या. त्याने एका निरापराध व्यक्तीला साप चावून ठार केले होते. तर, ती मयत व्यक्ती आपण स्वत: असल्याचे भासविले होते. हा किचकट तपास त्यांनी अंतीम टप्प्यात नेला होता. त्यामुळे, साबळे यांची हा तापस करताना कसोटी लागणार आहे. तर, अकोले पोलीस ठाण्याअंतर्गत याच वर्षातील एक जळीत खुनाचा तपास अद्याप कायम तपासावर आहे. त्यामुळे, या गुन्ह्यात पोलिसांना किती यश येते.! हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.