माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यासह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.!

 


सार्वभौम (नाशिक) :- 

                      पती किरण देशमुख (पिचड) हे रात्री अपरात्री घरी येत असल्यामुळे पती राजश्री देशमुख यांच्यात वारंवार वाद होत होते. मात्र, तरी देखील पिचड यांनी त्यास समजून न सांगता नेहमी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. तर पीडित महिला राजश्री यांना घरात मोलकरणीची वागणुक दिली जात होती. तर त्यांच्या पतीस वारंवार त्रास देऊन विषारी औषध प्राषण करण्यास प्रवृत्त केले. अशा प्रकारची तक्रार राजश्री यांनी न्यायालयात दिली होती. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने आज मंगळवार दि. 30 नोव्हेेंबर 2021 रोजी नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यासह अन्य पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी की, किरण देशमुख हे बारमध्ये जात असत. याची माहिती त्यांच्या पत्नीस लागली होती. त्यामुळे, बारमध्ये जाऊ नये या कारणास्तव त्या दोघांमध्ये टोकाचे वाद होत होते. मात्र, जेव्हा-जेव्हा हे वाद होत असे तेव्हा-तेव्हा पिचड कुटुंब देशमुख (पिचड) यांना पाठीशी घालत होते. तर फिर्यादीस घरातील सर्व कामे करायला सांगत होते. एखाद्या मोलकरणीसारखी वागणुक तिला देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या व्यतिरिक्त त्यांना शारिरीक व मानसिक त्रास देऊन त्यांचा छळ करीत होते. तसेच राजश्र यांचे वडील त्यांच्या घरी आले असता त्यांना देखील अपमानास्पद वागणुक देऊन वाईट शब्द वापरत होते. असे फिर्यादीत नमुद केले आहे.


दरम्यान, राजश्री यांचे पती किरण देशमुख यांना घरात फार त्रास दिला जात होता. त्यामुळे, त्यांना औषध पिवून आत्महत्येस प्रवृत्त केले जात होते. तसेच देशमुख यांनी केलेले सोन्याचे दागिने आणि पॉलिशा तसेच ठेवी यांची रक्कम त्यांच्या पत्नीस (राजश्री) यांना न देता त्या रकमेचा यांनी अपहार केले आहे. तसेच किरण देशमुख यांच्या भागिदारीत असणारी एक कंपनीचे बनावट कागदपत्र तयार करुन कंपनीचे नाव बदलले आणि फिर्यादीचे संपुर्ण हक्क संपुन टाकले आहे. त्यामुळे, राजश्री यांनी प्रचंड शारिरीक व मानसिक त्रास झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी 1997 पासून जो काही त्रास झाला आहेे. तो थोडक्यात फिर्यादीत मांडला असून न्यायालयाच्या आदेशाने यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान 1997 पासून जो काही प्रकार घडत होता. त्याबाबत न्यायालयात 19 पानांची तक्रार करण्यात आली होती. पोलीस ठाण्यात तक्रार करुन देखील याप्रकरणी काही एक कारवाई होत नव्हती. त्यामुळे, अ‍ॅड. उमेश वालझाडे यांच्या मार्फत राजश्री यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर चौकशीचे आदेश झाल्यानंतर सदर गुन्हा मंगळवार दि. 30 नोव्हेेंबर 2021 रोजी कोर्टाच्या आदेशान्वये 156 (3) प्रमाणे पंचवटी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा एस.एस साखरे करीत आहेत.

 यावर राजकारण नको.! 

दरम्यान, पिचड कुटुंब शांत व संयमी आहे. त्यामुळे, त्यांच्यावर 1997 ते 2021 असे 24 वर्षात झालेले आरोप मांडण्यात आले आहेत. त्यामुळे, प्रदिर्घ कालावधीनंतर दाखल झालेल्या तक्रारीत किती गांभिर्य आहे? असा प्रश्न अकोल्यातील अनेकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे, न्याय देवतेवर पिचड कुटुंबाने आजवर पुर्णत: विश्वास ठेवला आहेे. तर एक जबबादार म्हणून त्यांनी राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे, न्याय देवता खरे काय आणि खोटे काय हे ठरविणार आहे. मात्र, यावर तालुक्यात अगदी खालच्या पातळीवर जाऊन कोणी राजकारण करू नये किंवा टिका टिपण्णी करु नये. जर राजकारणापोटी असे कोणी आपला स्थर सोडत असेल तर त्या इतके निच राजकारण कोणतेही नाही. अशा प्रकारच्या चर्चा ऐकालयला मिळत होत्या. हा पिचड कुटुंबास बादनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे तालुक्यातुन सुर निघु लागले आहेत.