सभा संपताच राष्ट्रवादी व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते एकमेकांना भिडले.! अकोले तालुक्यातील धक्कादायक प्रकार.! दोन्ही पादाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल.!


सार्वभौम (अकोले) :- 

                  अकोले तालुक्यात आजकाल भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन प्रकारच्या विभिन्न दर्‍या निर्माण झाल्या आहेत. बड्या नेत्यांच्या नादाला लागून मनात द्वेष निर्माण करत शुल्लक कारणांहुन दोन गट एकमेकांना भिडताना दिसत आहे. अशाच प्रकारे अगदी शुल्लक कारण आणि गैरसमजातून भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये वाद होऊन धक्काबुकी, शिवीगाळ, दमदाटी आणि आरोप प्रत्यारोप झाले. ही घटना रविवार दि. 7 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. तुम्ही माझी बदली का केेली? असे म्हणत एकाने शिविगाळ दमदाटी केली तर दुसर्‍याने मिटींगमध्ये जास्त का बोलतो असे म्हणून दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यानंतर वाद होऊन दोन्ही गटाच्या तिघांवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत चक्रधर भिमाजी सदगिर (रा. मुथाळणे, ता. अकोले) हे पिचड कुटुंबाचे समर्थक असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  आरोपी भाऊसाहेब कोंडाजी ढोन्नर व दत्तु कोंडाजी ढोन्नर (दोघे रा. समशेरपुर) यांनी आमच्या समाजाची मिटींग बोलविली होती. तेव्हा, आरोपी यांनी समाज्याच्या हितासाठी काय कामकाज केले? याबाबत विचारले असता त्याचा मनात राग धरुन, तु मिटींगमध्ये जास्त बोलत होता. असे म्हणून चक्रधर यांना शिविगाळ दमदाटी करुन तुझा बेतच पाहतो असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवार दि. 7 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या समशेरपुर फाटा येथे घडला. असे चक्रधर सदगिर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून अकोले पोलीस पुढील तपास करीत आहेत.

तर त्यानंतर राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक कोंडाजी पुंजा ढोन्नर (रा. समशेरपुर, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही आमच्या कानडी समाजाची बैठक समशेरपुर येथील बहुउद्देशीय मंगलकार्यालय येथे रविवार दि. 7 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी आयोजित केली होती. तेव्हा कोंडाजी ढोन्नर हे मिटींगचे अध्यक्ष होते. ही मिटींग संपवून ते घरी जात असताना आरोपी चक्रधर भिमाजी सदगिर (मा. उपसरपंच मुथाळणे, मा. व्हा. चेअरमन अदि. सोसा) व रमेश केरु बेनके हे दारू पिवून आले व म्हणाले की, तू माझी बदली केली आहे. यांना कशाला अध्यक्ष केले. हे पैसे खाऊ आहेत. असे म्हणून वाईट वाईट शिविगाळ, दमदाटी केली व धक्काबुक्की करीत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार अकोले पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अकोले पोलीस करीत आहेत.


आता हे काही अध्यक्षपद किंवा काही फार टोकाचे वाद नाहीत. तर याला देखील काही राजकीय व वैयक्तीक हेव्यादाव्याच्या किणारी आहेत. त्यामुळे, कोणी कोणाची बदली केली का? किंवा कोणी दारु पिले होते का? यांनी एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या का? हा संशोधनाचा भाग आहे. मात्र, काल सोबत असणारे आज विरोधात बंड पुकारुन दंड थोपटू पाहत आहेत. अर्थात ज्यांना राज्याचे राजकारण करायचे आहे. ते करुन जातात, त्यांना जे काही फावायचे ते फावते. कोणी आमदार झाले तर 1 लाख 84 हजार पगार चालु होतो. तर कोणी माजी आमदार झाले तर प्रतिमाह 40 हजार पेन्शन चालु होते. या पलिकडे कोणी जिल्हा परिषदवर गेले तर दमबाजी करुन लोकांना ब्लॅकमेल करतात तर कोणी ठेकेदारीत बक्कळ पैसा कमवित असते. वाद होतात तुमच्या आमच्या नेत्यांचे.! आपापल्या समाजाचे. त्यामुळे, जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा समाज आणि आपली मानसे उभी राहतात. परकी फक्त कुरघोड्या करण्यासाठी येऊन रडून एकतात आणि हसून सांगतात. त्यामुळे, वाद या दोन्ही गटांचा म्हणून नव्हे.! अगदी कोणाचाही असो. त्यांनी बसून मार्ग काढला पाहिजे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सुज्ञ व्यक्तींनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.