आरे देवा.! मराठा मॅट्रीमनीहुन लग्न केलं आणि नवरा नपुसक निघाला.! पहिलं प्रेम आठवून त्याच्या त्या भावनाच मेल्या.! नवर्यासह पाच जणांवर गुन्हा.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले शहरातील एक तरुण व पुण्यातील एका तरुणीचे मराठा मॅट्रेमनीवरुन लग्न ठरले होते. लग्नापुर्वी जेव्हा दोघांना मोकळा वेळ मिळाला, तेव्हा दोघांनी एकमेकांना त्यांचा भुतकाळ सांगितला. मग काय.! याला धोका दिला आणि तिचा प्रेमभंग झाला. त्यानंतर हिला फिट आली तर त्याच्या लैंगिक भावनाच संपून गेल्या होत्या. अखेर झालं काय? तर, दोघांमध्ये वारंवार वाद आणि सर्व अनैसर्गिक शरिर संबंधांच्या गोष्टी. त्याचा अंत अखेर दोन कुटुंबात कुलूपीतपणा आणि शेवटी पोलीस ठाणे. असा अनोख्या लग्नाचा धक्कादायक प्रवास उघड झाला आहे. ही घटना दि. 20 जून 2021 ते दि. 2 नोव्हेंबर 2021 या दरम्यान अकोले व पुणे या ठिकाणी घडली. याप्रकरणी अकोले, संगमनेर व पुणे अशा पाच जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी की, अकोले शहरातील एक मुलगा पुण्यात जॉबसाठी गेला होता. तेथे त्याने एका मुलीवर प्रेम केले आणि तेथे तो लव इन रिलेशनशिपमध्ये एका खोलीत राहत होता. मात्र, ती याच्यासोबत राहुन देखील दुसरीकडे देखील लाईन देत असल्याचा माहिती याच्या लक्षात आली आणि त्याने तिला जाब विचारला. तर, तीने याला डिच्चु देत दोन वर्षे केलेल्या आपल्या प्रेमावर पाणी फिरविले आणि निघुन गेली. याचे तिच्यावर प्रेम असल्यामुळे, त्याची पुढील लग्नास इच्छा नसली तरी त्याने मराठा मॅट्रीमनीवर आपली प्रोफाईल तयार केली. त्यानंतर त्याची नव्याने हडपसर येथील एक मुलीबरोबर ओळख झाली. त्यांच्यात वैयक्तीक चर्चा झाली आणि दरम्यानच्या काळात दोन्ही कुटुंब एकत्र येऊन त्यांनी या दोघांना एकत्र आणुन यांचा संसार बसवून देण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, झट मंगनी पट ब्याह न झाल्याने दोघांना एकमेकांशी चर्चा करण्यास वेळ मिळाला. तेव्हा, यांच्यात त्यांच्या वैयक्तीक आयुष्याच्या भुतकाळाचे उत्खनन झाले आणि याने तिला खरे खरे काय झाले ते सांगून टाकले. मात्र, हे सांगितले नाही की, दरम्यानच्या काळात त्याच्यावर लैंगिक समस्या निर्माण झाली आहे. आता आपले पतीदेव इतके खुले झाले आहेत म्हटल्यावर या मॅडमला कोठे गप्प बसवते का? त्यांनी देखील आपले मन मोकळे करण्यास सुुरुवात केली. माझे देखील एका मुलावर प्रेम होते. मात्र, माझा प्रेमभंग झाल्यामुळे मला अचानक तणाव आल्यामुळे फिटीचा अपकार जडला आणि त्याच्या गोळ्या मी अद्याप घेत आहे. या दोघांची मने मोकळी झाल्यानंतर देखील त्यांनी एकमेकांना स्विकारले होते. त्यामुळे, त्यांनी दि. 20 जून 2021 रोजी दोन्ही परिवारांच्या संमतीने विवाह केला.
आता खरी कसरत येथून सुरू झाली होती. हे दाम्पत्य दि. 22 जून रोजी अकोले येथे आल्यानंतर त्यांनी सत्यनारायण व जागरण गोंधळ घातले. यांच्यात अशी परंपरा आहे की, जागरण गोंधळ झाल्याच्या रात्री नवदाम्पत्य यांच्यात शरिर संबंध ठेवण्याची प्रथा आहे. त्यानुसार, दोघांचे ठरले खरे.! मात्र, या मधुचंद्राच्या रात्री पतीच्या लैंगिक समस्येचा भांडाफोड झाली. अनेकदा प्रयत्नांना अपयश आल्यानंतर मात्र, या नवरदेवाने धक्कादायक पराक्रम गाजविला. त्याने पुर्वीच एक व्हायब्रेट मशीन आणून ठेवले होते. त्याचा गैरवापर करीत तो प्रयोग त्याने आपल्या पत्नीवर तिच्या इच्छेविरोधात केला. त्याचा तिला प्रचंड त्रास झाला. मात्र, पहिल्या प्रेमामुळे त्याच्या मेंदुवर परिणाम झाला असेल असे समजून घेत येणार्या काळात सर्व काही ठिक होईल असे म्हणत तिने घडल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. रात्री घडलेला प्रकार कोणाला न सांगता मनात दाबून ठेवला. त्यानंतर, दि. 24 जून रोजी ती पुण्याला माहेरी गेली. तेव्हा पतीदेव देखील कामानिमित्त पुण्याला गेला होते. तेथे एका लॉजवर त्यांनी पत्नीला नेवून स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो देखील अयशस्वी ठरला.
आता नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीप्रमाणे सर्व खापर तरुणीवर फोडण्यात आले. मात्र, तिने सुंदर दिसावे म्हणून चक्क 10 हजार रुपयांचे ब्युटी पार्लर कोर्स तिला लावण्यात आला. मोठे केस सोडून छोटे करण्यात आले, अॅब्रो, लिप्स्टीक असे नाना प्रयोग करण्यात आले. तरुणाचे बेड सजविण्यात आला. मात्र, झाले काय? शेवटी तोच निकाल हाती आला. अखेर या तरूणाने या लैंगिक समस्येला कंटाळुन मद्य प्राषण करणे सुरू केले. मात्र, दारु पिण्यापेक्षा आपण वैद्यकीय उपचार घेऊ, समुपदेशन करु अशी विनंती पत्नीने केली. मात्र, त्याने तिचे काही एक एकले नाही. परंतु, त्याने त्याच्या मित्राचा सल्ला घेऊन एक वेबसाईटहून काही क्रिम व गोळ्यांची मागणी केली. जेव्हा हा प्रकार पत्नीस समजला तेव्हा तिने त्याची सखोल माहिती वेबसाईटवर चेक केली. तेव्हा, या गोळ्या, औषधे या वयात फार धोकादायक आहेत अशी माहिती त्यात दिलेली होती. त्यामुळे, तिने पतीस विनंती केली की, तुम्ही जो काही उपक्रम करीत आहात तो अयोग्य आहे. त्यापेक्षा आपण वैद्यकीय उपचार घेऊन सुखी संसार करू. मात्र, त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करुन उत्तरे देण्यास टाळाटाळ केली.
दरम्यान, दि. 3 जुलै 2021 रोजी कोरोनाचा काळ सुरू असल्याने वर्क फ्रॉम होम काम सुरू होते. त्यामुळे, ही दोघे अकोले येथे आले होते. तेव्हा दिवसभर हा तरुण काम करीत होता. नंतर एक ते दिड तास पाळीव कुत्र्यासोबत खेळत होता. नंतर बेडमध्ये आल्यानंतर पत्नी कटून-थटून त्याच्यापुढे येत होती. मात्र, तो दोघांच्या मध्ये उशी टाकून विरुद्ध दिशेने तोंड करुन झोपत असल्याचे फिर्यादीत म्हटली आहे. आता हा प्रकार तिने स्वत:पुरता मर्यादीत न ठेवता सासु सासर्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आईबाप आहेत सहाजिकच पाठीशी घालणार. त्यामुळे, सुनेला त्यांनी घालुन पाडून बोलण्यास सुरूवात केली. घरातील सगळीच कामे तिच्या एकटीवर टाकण्यात आली. रडारड, मतभेद, वाद आणि रात्रीचे जागरण त्यामुळे, घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. चिडचिड व आरडाओरड यामुळे कुटुंबात स्थिरता व एकविचार राहिला नाही. हा प्रश्न इतका गंभीर झाला की, अखेर मुलीस दि. 12 जुलै 2021 रोजी तिच्या सासरी पाठविण्यात आले. मात्र, कालांतराने अकोले तालुक्यातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींनी यात मध्यस्ती केले आणि दोन कुटुंबांमध्ये मिलाप घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याला काही अंशी यश देखील आले होते.
दरम्यान, जेव्हा ही तरुणी तिच्या माहेरी गेली तेव्हा तिने पतीच्या लॅपटॉपवर काही गोष्टी शोधल्या. त्यात अमेझॉन येथून काय-काय खरेदी केले आहे. याची यादी शोधली असता त्यात सन 2016 साली एक मसाज व्हायब्रेट मशीन खरेदी केल्याचे लक्षात आले. त्याहुन एक सिद्ध झाले की, 2016 साली त्याची प्रेयसी देखील यात मशीनची पीडित असावी. म्हणून हिने त्या प्रेयसीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती बानेर येथे असल्याचे समजले. ती फार सुंदर आणि काटक असल्याची माहिती मिळाली. कारण, तिचे काही फोटो हिच्या हाती लागले होते, त्यात मोबाईल नंबर देखील मिळाला होता. तेव्हा, पतीच्या प्रेयसिकडे त्याच्या प्रेमाच्या ब्रेकअप बाबत माहिती विचारली असता तेव्हा तिने सांगितले की, त्याला लैंगिक समस्याचे प्रॉब्लेम आहे. म्हणून मी त्याला सोडले आहे. हा पुरावा देखील पत्नीकडे असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. त्याला वार्षीक पगार 22 लाख होता. त्यामुळे, त्याने पत्नीला वार्षीक 3 लाख 50 हजाराची नोकरी सोडून देण्यास सांगितले. तर, लग्नानंतर चांगल्या पगाराचे अश्वासन देखील दिले होते. परंतु ते काहीच झाले नाही. उलट या पत्नीने त्याच्या प्रेयसिप्रमाणे दिसावे, वागावे यासाठी त्याच्या नातेवाईकांनी हवा तो प्रयोग करण्यास हिला भाग पाडल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.
तर, फिर्यादी हिच्या दिराच्या लग्नात मुलीकडच्यांनी 1 कोटी रुपये खर्च केला होता. वर्हाड्यांना एक चांदिचे नाणे दिले होते. अक्षरश: तो शाही विवाह सोहळा पार पडला होता. तशा पद्धतीने या मुलीच्या वडिलांनी कोणताही सोहळा केला नाही. त्यामुळे, तिची सासू तिला टोमणे मारत होती. तरी देखील 20 तोळे सोन्याचे दागिने यांनी घेतले होते. लग्न ठरविताना वैज्ञानिक विचार दाखवून प्रत्यक्षात मात्र फसवणुक केली. आपला मुलगा लैंगिक अत्याचाराचा पीडित असून देखील ती माहिती यांनी लपवून ठेवली. घरी येऊन तेथे राडा घातला, रेकॉर्डिंग केलेला मोबाईल हिसकावून घरातून पळ काढला. अशी अनेक पद्धतीने आरोप करणारी फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. अकोले येथे ये-जा करणे, येथील पोलीस दबावांना बळी पडू नये किंवा तरुणीला अर्थिक खर्च होऊ नये यासाठी तिने हडपसर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
टिप :-
सदर घटना ही पोलीस ठाण्यात दाखल आहे. यातून एक महत्वाचे म्हणजे, जो विवाह दोन कुटुंब आणि दोन व्यक्ती एकत्र बसून ठरवितात. त्यात असे प्रकार होत नाही. त्यामुळे, ऑनलाईनच्या फंद्यात पडू नका. दुसर्यावर विश्वास ठेवताना विचार करा. आपल्या भुतकाळाला पुन्हा-पुन्हा उकरु नका. यातून प्रत्येकाने काहीतरी धडा घ्यावा. म्हणून कोणाचेही नाव न घेता सविस्तर मांडले आहे.