मुलीचे नको ते फोटो काढून इन्स्टाग्रामवर टाकत व्हिडिओ कॉल केले, माझ्यावर प्रेम कर म्हणत गुंडांची भिती दाखवून अत्याचार केला, गुन्हा दाखल.!


 सार्वभौम (संगमनेर) :- 

                             संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी-साकुर या परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय मुलीसोबत अश्लिच फोटो काढून तिला वारंवार ब्लॅकमेल करण्यात आले. तर, त्याची वासना फिरल्यानंतर पीडित मुलीस धमकावून हे फोटो इन्स्टाग्रामवर टाकेल, तुझ्या आई वडिलांना दाखवेल आणि गुंडांची टोळी आणून तुझ्या पालकांना संपून टाकू अशा वेगवेगळ्या धमक्या देत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना साकुर, बिरेवाडी व हेमंत लॉज आळेफाटा या ठिकाणी सन २०१८ ते २०२१ या कालावधित वारंवार घडली.  याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादिनुसार घारगाव पोलीस ठाण्यात अतुल रावसाहेब कढणे (रा. बिरेवाडी, ता. संगमनेर, जि. अ.नगर) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

               

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरोपी अतुल कढणे याची दि. 11 फेब्रुवारी 2018 साली एका मुलीशी ओळख झाली होती. त्यांच्यात चांगले मैत्रीचे संबंध होते. मात्र, कालांतराने त्यांच्यातील लगट वाढत गेली आणि पीडित मुलगी फार काही सज्ञान नसल्याने त्याच्यात वाहावत गेली. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्या आणि नंतर त्या दोघांचे संबंध अधिक घट्ट झाले. या दरम्यान आरोपी याने पीडितेचे नको ते फोटो काढून त्याच्याकडे सेव्ह ठेवले. जेव्हा त्यांच्या संबंधात या तरुणाची वासना जागी झाली तेव्हा त्याने त्याच्याकडील या फोटोंचा वापर सुरु केला. जेव्हा त्याला वाटले की, आपण या मुलीशी शरिर संबंध ठेवले पाहिजे. तेव्हा या महाशयाने तिला वेगवेगळ्या प्रकरच्या धमक्या दिल्या. मात्र, या तरुणीने त्यास शरिर संबंध ठेवण्यास नकार दिला असता त्याने सांगितले की, मी आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर टाकेल. त्या भितीपोटी तिने त्याच्या स्वाधिन होण्याचा निर्णय घेतला. कारण, समाजात आपली व आपल्या आई बापाची बदनामी व्हायला नको. म्हणून आरोपी कढणे जसे म्हणेल तसे ती वागत गेली. त्यानंतर त्याने पीडित मुलीची इच्छा नसताना तिच्यावर बिरेवाडी येथे बळजबरीने अत्याचार केला. आता यानंतर हा प्रकार थांबेल असे तिला वाटले होते. मात्र, तीच खरी ब्लॅकमेलिंगची सुरुवात होती.

                दरम्यान, बिरेवाडी येथे पीडितेवर अत्याचार झाला असता त्याने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेण्यास सुरुवात केली. आरोपी अतुल याने तिच्याकडे अनेकदा अशाच पद्धतीने शरिरसुखाची मागणी केली आणि तिच्यावर अत्याचार केला. जेव्हा ती या प्रकारास नकार देऊ लागली, तेव्हा त्याने तिचे काही नको ते फोटो इन्स्टाग्रामवर टाकून दिले. त्यानंतर तिला व्हिडिओ कॉल करुन ते दाखविले. जर जे हवे ते दिले नाही तर सोशल मीडियावर तुझी बदनामी करुन जे काही फोटो आहेत. ते तुझ्या आई वडिलांना दाखवेल. त्यामुळे, हताश होऊन पीडित तरुणी तो म्हणेल तसे वागण्यास तयार झाली. त्याने पीडितेस फेब्रुवारी, जुलै व आँगस्ट 2021 मध्ये तसेच दि. 26 आक्टेबर 2021 ला तिला बिरेवाडीतून घेतले आणि MH 14 DF 5155 या गाडीतून नेऊन पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील हेमंत लॉजवर नेवून बळजबरीने तिच्यावर शरिर संबंध केले. हा प्रकार वारंवार होत असल्यामुळे ती आरोपीच्या त्रासाला कंटाळली होती. आता त्याला शरण जाण्यापेक्षा त्याला धडा शिकवायचा असे तिने ठाम केले आणि पालकांच्या मदतीने तिने पुढे येत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल आहे. 

           

एकतर पीडित महिलांनी अशा वेळी कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करु नये. पुरुषांच्या भुलथापा आथवा ब्लॅकमेलिंगला बळी पडण्यापेक्षा तत्काळ आवाज उठविला पाहिजे. दोन ते तीन वर्षे लोटल्यानंतर जागे होऊन धाव घेतो. त्यामुळे अन्याय होऊनही संदिग्धता निर्माण होते. त्यामुळे, लग्न करतो, संभाळतो, पैसे देतो वैगरे गोष्टींपेक्षा महिलांनी आता सामाजिक अभ्यास करणे गरजेचे आहे. विशेषत: लहाण मुलींनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करुन करिअर व आयुष्यकडे लक्ष दिले पाहिजे. जर कोणी नडत असेल तर त्याला अडवे करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. तरच या गोष्टी कमी होऊ शकतात. असे मत एका समाजसेविकेने व्यक्त केले आहे.