दिवाळीचा फटाका वाजविला आणि प्राध्यापकांंच कुत्र मेलं.! ह्रदयविकार की घातपात, पीएम ला बॉडी रवाना, फटाके वाजविण्याहून दोन सरकारी कर्मचारी एकमेकांना भिडले.!
सार्वभौम (अकोले) :-
ऐकावे ते नवलच, अशा पद्धतीचे प्रकार सध्या अकोले तालुक्यात घडत आहेत. अगदी काल परवा कळस येथील प्रभाकर वाकचौरे यानं पॉलिसी पास करुन घेण्यासाठी एका मनोरुग्णाला साप चावून त्याचा खून केला. आता आज शुक्रवार दि. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर-धुमाळवाडी परिसरात पुन्हा दोन सुशिक्षित व्यक्तींमध्ये फटाके फोडण्याच्या कारणाहून हाणामाऱ्या झाल्या. यात विशेष बाब म्हणजे, मोठ्या आवाजाची फटाके वाजविल्याने चक्क दरवाजात बांधलेल्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने वादाचे थळ पेटले आणि दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत शिविगाळ दमदाटी सुरु केली. यात सेवानिवृत्त डॉक्टर शिवाजी सोन्याबापू वाकचौरे (रा. धुमाळवाडी, ता. अकोले) यांना मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी अकोले बस डेपोमध्ये काम करणारे अधिकारी सचिन पुंजाजी वाकचौरे (रा. धुमाळवाडी) यांच्यावर अकोले पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता मयत कुत्र्याचा मृत्यू हा संशयास्पद असल्याने पोलिसांनी या कुत्र्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास कायदेशिर मेमो दिला आहे. त्यामुळे, हे कुत्रे ह्रदयविकाराच्या झटक्याने गेले की, घातपात झाला. हेच पाहणे महत्वाचे आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव हे पंचायत समितीत डॉक्टर होते. हे मुळचे कळस येथील असून कामानिमित्त ते धुमाळवाडी परिसरात स्थायी आहेत. दिपावलीच्या निमित्ताने बाहेर लोक फटाक्यांची आतिशबाजी करीत असताना त्याचा त्रास हा शिवाजी वाकचौरे यांना होत होता. अर्थात, दुसर्यांना त्रास होईल अशा मोठ्या आवाजाची फटाके वाजविणे यावर बंदी असताना आरोपी सचिन वाकचौरे यांनी ते बिनधास्त वाजविले. हे मुळचे विठा येथील असून ते बस डेपो येथे एका जबाबदार पदावर आहेत. त्यामुळे, दोन्ही सुशिक्षित व्यक्ती असतांना देखील त्यांच्या कॉलनीत सनासुदिच्या दिवशी अशा प्रकारचा राडा झाल्याने सगळ्या कॉलनीत एकच चर्चा सुरु होती. विशेष म्हणजे या परिसरात सर्व प्राध्यापक, शिक्षक व सरकारी कर्मचारी यांची रहदारी असून या प्रकाराने शिवाजीनगर येथे दिवाळीच चर्चेसाठी चांगलेच फराळ मिळाले आहे. यात वादात अगस्ति कॉलेजवर कार्यरत असणाऱ्या एका प्राध्यापकाचे म्हणजे फिर्यादी यांच्या जावयांच कुत्र मयत झालं असून, मोठ्या आवाजाचे फटाके वाजविल्यानेच ते मयत झाल्याचा आरोप होत आहे. किंवा या कुत्राचा कोणी घातपात तर केला नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.
आता हा शुल्लक वाद होता. मात्र तो थेट हाणामारीवर गेला आणि तेथेच न थांबता पोलीस ठाण्यात देखील गेला. यात शिवाजी वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी सचिन वाकचौरे यांनी शिवाजी वाकचौरे यांच्या घराच्या दिशेने तोंड करुन फटाके वाजवायला सुरुवात केली होती. तेव्हा शिवाजी हे त्यांना म्हणाले की, आमच्या घराच्या दिशेने तू फटाके का लावतो आहे? तुला आमचे घर जाळायचे आहे का? तेव्हा सचिन हे म्हणाले की, फटाका गेला असेल, तुला काय करायचे ते ते करुन घे. असे म्हणून घाणघाण शिविगाळ दमदाटी सुरु केली. व तुला माझे मित्र आणून त्रास देईल, तु येथे कसा राहतो हेच मी पाहतो. असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली व सेवानिवृत्त अधिकारी शिवाजी वाकचौरे यांची गच्ची धरुन त्यांना मारहाण केली. याप्रकरणी त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात दुपारी हजर राहुन फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन वाकचौरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास पोलीस नाईक आहेर करीत आहेत.
दरम्यान, फटाक्यांच्या आवाजाने कुत्र मयत झाल्याचा संशय आहे. त्याची खात्री करण्यासाठी मयत कुत्र्याचे पीएम करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेण्यात आली आहे. पोलिसांनी कुत्र्याची पहाणी करुन खरोखर ते मेले आहे का? त्याला काही जखमा आहेत का? त्याचे कारण काय असू शकते? त्याचा घातपात झालाय का? या माहितीसाठी पोलिसांनी कुत्र्याचे पीएम करण्यासाठी पीएम रिपोर्ट दिला आहे. त्यामुळे, नेमकी हा काय प्रकार आहे. हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर लक्षात येणार आहे. परंतु, एक मात्र नक्की की, दिवाळीच्या काळात अनेक ठिकाणी फटाके वाजत असतात. त्यामुळे, कोण्या एकाच्या फटाक्यांच्या आवाजाने असा प्रकार होईल का ? कुत्र्याने फक्त हिच दिवाळी पाहिली आहे का? गत दिवाळीत त्याला भिती वाटली नसेल का? ते कुत्र आजारी तर नसेल ना? खरोखर मोठ्या आवाजाने कुत्र मरु शकतं का? त्याचा ह्रदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू आला असेल तर ते आजारी देखील असू शकते. त्यामुळे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे रिपोर्टमध्ये मिळणार आहे. मात्र, तोवर मृत्युचे कारण हे गुलदस्त्यात राहणार आहे.