राजकीय दबावानंतर राष्ट्रवादीच्या संदिप शेणकरांना रेशन प्रकरणी अटक.! भाजप नेत्यांना टेंडर हवे होते, म्हणून गोवले.! मी निर्दोषच.!
सार्वभौम (अकोले) :-
गेल्या तीन आठवड्यापुर्वी अकोले शहरातील नवलेवाडी परिसरात संशयित रेशनचे धान्य मिळून आले होते. यात आजवर चौघांना अटक करण्यात आली होती. तर, काल दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संदिप शेणकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शेणकर यांनी स्वत: पोलिसांना सरेंडर होत सांगितले की, मी यात कोणत्याही प्रकारचा काळा बाजार केला नाही. हे धान्य, गाड्या आणि आरोपी यांचा व माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. त्यामुळे, जर पोलिसांना यात मी दोषी वाटत असेल तर मी चौकशीसाठी तयार आहे. कारण, अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी कधी चुकीच्या मानसांना पाठबळ दिले नाही. आमच्यात कोणाचे दोन नंबर धंदे नाही. त्यामुळे, चौकशीसाठी मी आलो. पोलिसांनी मला अटक दाखविली आहे. मी या गुन्ह्यात आरोपी आहे. हे त्यांनी आता सिद्ध करावे.! अन्यथा मी निदोष कसा आहे. हे मी स्वत: न्यायालयात सिद्ध करेल. पण, पळकुटी आणि राजकीय दबावाला बळी पडणारा आमचा पिंड नाही. असे म्हणत त्यांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधिन केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तीन आठवड्यांपुर्वी पोलिसांनी एक रेशनची गाडी पकडली आणि त्यातून असे लक्षात आले की, रेशन हे सरकारी पोत्यातून खाली करुन खाजगी गोण्यांमध्ये भरण्यात आले होते. जेव्हा हा प्रकार रात्री 2 वाजण्याच्या सुमारास काही भाजप नेत्यांना व कार्यकर्त्यांना माहित झाला. तेव्हा त्यांनी मोठ्या शिताफिने या गाडीतील माल तपासला. तेव्हा हे रेशन काळ्या बाजाराच चालले होते. याची खात्री झाली. तेव्हा खर्या अर्थाने कार्यकर्त्यांनी एकच कज्जा केला. तेव्हापासून मुख्य आरोपीपासून ते सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात राष्ट्रवादी आणि भाजप हे टोकाचे विरोधक असून एकमेकांना डॉमीनेट करणे, कुरघोड्या करणे, मिसगाईड करणे असे प्रकार वारंवार होताना दिसत आहे. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्याकडे सप्लायर्सचे टेंडर असल्याने अनेकांना त्याची जेलोसी होत होती. परिणामी जोवर शेणकर यांना अटक होत नाही. तोवर त्यांच्याभोवती चौकशीचा भुंगा लावायचा हे ठरलेले होते. अखेर तेच झाले आणि गोण्या भरुन देणारा हमाल देखील यात आरोपी करण्यात आले आहे.
दरम्यान, शेणकर यांना अटक व्हावी यासाठी काही राजकीय नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. तर हे टेंडर पुन्हा आपल्याला मिळावी यासाठी काही कार्यकर्ते अगदी झोंबुन होते. त्यामुळे, यात चोर सोडून सन्याश्याला फाशी दिली की काय.! असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेही जेव्हा ही गाडी पकडण्यात आली. तेव्हा जो आरोपी होता. तोच एका माजी आमदारांचा पाहुणा आहे. त्यामुळे, आज तपास करा म्हणणारे काही काळ गप्प कसे बसले होते. विशेष म्हणजे आज चालणारा हा काळा बाजार आजच उदयास आला असे काही नाही.! याला अनेक वषार्र्पुर्वीचे कांगोरे आहे. ते कार्यकर्ते कोणाचे आहेत. हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, अनेक अतृप्त आत्मे रेशन भोवती घिरट्या घालत आहेत. उलट खर्या अर्थाने नशिब मानले पाहिजे. की, डॉ. किरण लहामटे हे स्वत: सांगतात. जर कोणी चुक असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. भलेही तो माझा कार्यकर्ता का असेना.! त्यामुळे, आमदारांच्या प्रतिमेला दाग लागण्यापेक्षा उलट त्यांचा चेहरा पारदर्शी झाला आहे.
कसा होतो घोटाळा.!
खरंतर असे बोलले जाते की, राजुर भागात फार मोठ्या प्रमाणावर भातीची लागवड होत असते. त्याची गुणवत्ता आणि रेशनची गुणवत्ता यात कोणतीही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे, ते रेशनचा तांदुळ स्वस्त मिळत असल्याने घेतात खरे परंतु खात नाहीत. तो तांदुळ ते विकून दुसरे धान्य घेतात किंवा बाजारात विकतात. परिणामी अशा पद्धतीने पायली चार पायली असे करत फार मोठा साठा तयार होतो आणि तो एखाद्या दलालाला दिला जातो. मग कोणाच्या ना कोणाच्या कानावर ही गोष्ट पडताच गाडी आडविली जाते आणि अखेर या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो.
टेंडर भाजप नेत्यांना हवं होतं.!
जी काही कारवाई झाली आहे. ती केवळ आकस बुद्धीने झाली आहे. याला राजकीय रंग देण्यात आला असून जे काही कागदपत्रे आहेत. त्यानुसार आता न्यायालयीन लढ. लढणार आहे. गेल्या कित्तेक दिवसांपासून भाजपचे काही लोक हे टेंडर घेण्यासाठी जीव काढत होते. मात्र, त्यांना ते मिळाले नाही. त्यामुळे, सरळ मार्गाने नव्हे.! तर असा मार्ग त्यांनी अवलंबला आहे. आम्ही केवळ गोडाऊन ते दुकानदार अशी वाहतुक व्यवस्था पुरवितो. मग गोडाऊनमध्ये दोष नाही, दुकानांमध्ये दोष नाही, पकडलेल्या आमच्या गाड्या नाहीत, ना आमचे हमाल आहे. जे पुरवठा करण्याचे काम आहे. ते प्रामाणिकपणे पार पाडण्याचे काम शेणकर करीत होते. मात्र, काही लोकांनी गलिच्छ पातळीचे राजकारण करुन त्याला गुन्ह्याचे रुप दिले आहे. पण, त्याचाही उलगडा नक्की होईल.
नगरसेविका स्वाती शेणकर (तालुकाअध्यक्ष)
यांनाही आरोपी करा.!
रेशन प्रकरणात केवळ हमाल आणि सब ठेकेदार आरोपी करून अशा प्रकारची गुन्हेगारी थांबणार आहे का? तर यात महसुलचे कर्मचार देखील सामिल आहेत का? गोडाऊन ते विक्रेता यांच्यात काही गफलत आहे का? जी लोक वारंवार घोटाळा करतात त्यांना कोणाचा अभय आहे? अशा अनेक गोष्टांचा विचार केला पाहिजे. खरंतर हमाल आरोपी होऊ शकतो तर गोडाऊ किपर, पुरवठा अधिकारी यांना देखील याच चौकशीअंती आरोपी करणे अपेक्षित आहे. मात्र, दुर्दैवाने संगमनेरात पंचायत समिती, राजूर आणि आता अकोले येथे रेशन पकडून देखील त्यांचा सखोल मुळापर्यंत तपास होत नाही. हे फार मोठे दुर्दैव आहे. तर या गोष्टीला फार वर्षे झाले, सीडफार्म येथे अनेक किलो रेशनचे धान्य पुरवून ठेवले होते. मात्र, त्याबाबत पुढे काही झाले नाही. या प्रकरणात शेणकर यांची भूमिका ठाम असून त्यांना राजकीय हेतूने यात गोवल्याचे बोलले जात आहे.