तक्रार केली म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास वाळुच्या ट्रॉक्ट्ररने चिरडले.! मोगलाई माजली पण, नशिब बलोत्तर.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                 संगमनेर तालुक्यातील कसारा दुमाला परिसरात एका वाळूच्या ट्रॅक्टरने शिवसैनिक पदाधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. कसारा दुमाला येथुन अवैध वाळु बंद व्हावी म्हणुन उपसरपंच आशा काळे यांनी आयुक्तांना तक्रारीचे निवेदन बनवले. याची खबर वाळुतस्करांना लागली असता त्याचा कड काढण्यासाठी त्यांचे पती शिवसैनिक रमेश काळे यांच्यावर वाळु तस्करांनी ट्रॅक्टर चालवला. यामध्ये रमेश काळे यांच्या पाठीला जबरदस्त दुखापत झाली आहे. त्यांच्या पाठीला 15 टाके पडले तर हाताला व पायाला चांगलाच मार लागला आहे.  मात्र, ही घटना वाऱ्यासारखी सोशल मीडियावर व्हायरल होत असली तरी प्रशासनाने मात्र या घटनेकडे कानाडोळा केले आहे. त्यामुळे, साधा कोतवाल आणि तलाठी जरी कारवाईत थोडाफार जखमी झाला. तरी कलम 353 (सरकारी कामात अडथळा) व 307 (प्राणघातक हल्ल करणे) अशी गंभिर कलमे लावली जातात. आता, काल परवा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यास पाठीशी घालणारे प्रशासन पुन्हा वाळुतस्करांना पाठीशी घालतात की काय.! असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काळे हे खा. लोखंडे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय असून त्यांनी तरी या प्रकारात लक्ष घातले पाहिजे. असे मत शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांन पासून कसारा दुमाला परिसरात अवैध वाळुचे 10 ते 15 ट्रॅक्टर चालु आहे. म्हणुन शिवसैनिक रमेश काळे यांनी आयुक्तांकडे तक्रार केल्याचे ठरवले होेते. रमेश काळे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात तक्रार अर्ज केला. याची माहिती वाळुतस्करांना मिळाली असता त्यांनी रमेश काळे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा कट रचला, रमेश काळे हे रोज मित्रांसोबत फिरण्यासाठी जात असल्याची माहिती वाळु तस्करांना मिळाली. त्यांनी याच संधीचा फायदा घेत आज सकाळी म्हाळुंगीच्या पुलावर रमेश काळे यांच्या अंगावर भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविला. ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने ते रस्त्याच्या कडेला पडले. यामध्ये त्यांना जबरदस्त दुखापत झाली आहे. हा प्रकार घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी जखमी अवस्थेत पडलेल्या रमेश काळे यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले. आज अद्याप त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

           दरम्यान, कसारा दुमाला हे अवैध वाळु तस्करांचे आगार होत चाले आहे. ही वाळुतस्करी कशी व कोठे चालते हे अगदी सामान्य व्यक्तींना माहीत आहे. याबाबत पोलीस आणि महसुल अनभिज्ञ असेल असे म्हटले तर तो निव्वळ मूर्खपणा ठरेल.! कारण, महसुल आणि पोलीस यांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कसारा दुमाला गावातुन राजरोस अवैध वाळू चालू आहे. हे वाळुतस्कर दिवस रात्र तहसील कार्यलय व पोलीस ठाण्याच्या आवारातच असतात. तर काही अधिकाऱ्यांचे शाही पद्धतीने वाढदिवस देखील करतात, कार्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी होते. त्यामुळे, कसारा दुमाला परिसरातून दिवस रात्र वाळु चालली हे प्रशासनाला व अधिकाऱ्यांना माहित नाही असे कसे ? तरी हातावर घडी तोंडावर बोट हीच भमिका त्यांची आहे. इतकेच काय.! नदिचे पाणी आटले की २४ तास उपसा करुन स्टोअरेज केले जाते आणि पाणी आले की, अव्वाच्या - सव्वा भाव करून विकली जाते. संचारबंदी असतानाही संगमनेरात वाळु माफियांनी हैदोस घातला होता. या लॉकडाऊनच्या काळात महसूल कर्मचाऱ्यांना देखील धक्काबुक्की केल्याचे पाहायला मिळाले आहे. तर संगमनेर खुर्द येथून वाळुच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या एका पोलिसाने खाजगी गाडीचा वापर केला होता. तो वाळुच्या गाडीचा पाठलाग करत असताना तिघांचा जागीच मृत्यू देखील झाला होता. पण, त्या पोलिसाला बड्या अधिकाऱ्याचा हात पाठीशी असल्याने या प्रकरणात "तेरी भी चूप और मेरी भी चूप"असेच काहीसे पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतर या प्रकरणाचे पुढे काय झाले हे गुलदस्त्यात राहिले. ही घटना होऊन महीना उलटत नाही तेच शहरातील जोर्वेनाका येथे वाळू भरलेल्या एका पिकपच्या धडकेत आरफाद शेख या १९ वर्षीय युवकाचा मृत्यु झाला होता. तर यापुढे आश्चर्याची बाब म्हणजे तहसिल कार्यलयाच्या आवारातून जमा केलेले ट्रॅक्टर पळवून नेले जातात. त्यामुळे संगमनेरमध्ये वाळू माफियांना कायद्याचा धाक आहे की नाही? असा प्रश्नही तालुक्यातील सुज्ञ नागरिकांना पडला आहे. 


         इथे फक्त थातूर-मातूर कारवाई केली जाते. पण येथे गब्बर झालेले वाळुतस्कर यांना पोलीस, महसूल विभाग यांची किंचितही भीती राहिलेली नाही. त्यामुळे घारगाव-साकुर परिसरातील मुळा नदी ते कसरवाडी आणि आश्वी परिसरातील प्रवरा नदी येथे राजरोस वाळूची तस्करी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. येथे महसुल व पोलीस यांनी वाळूतस्करांवर संयुक्तपणे कारवाई करणे अपेक्षित आहे पण, तसे होताना दिसून येत नाही. त्यामुळे, वाळू तस्करांनकडून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्का-बुकी होत असल्याचे तालुक्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे, प्रशासनाने येथे कठोर भूमिका घेणे अपेक्षित आहे.

 दरम्यान, शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी देखील गेल्या आठवड्यात वाळुबाबत एक प्रकरण बाहेर काढले होते. मात्र, त्यात 1 लाख 43 हजार रुपयांचा दंड झाला होता. या पलिकडे अनेक प्रकरणे दडपली जातात, त्यामुळे, येथील काही अधिकारी हे इतके निर्ढावले आहेत की, त्यांना आरोप प्रत्यारोपाचा काही एक फरक पडत नाही. म्हणजे आमचे कोणीच काही करु शकत नाही. हम करे सो कायदा, अशी पद्धत संगमनेरात रुढ झाली आहे. एकेकाळी, नेवासा, कोपरगाव, श्रीगोंदा आणि राहुरी यांना वाळुचे आगार म्हटले जायचे. आता संगमनेरने तर हद्दच पार केली आहे. येथील मांस, गुटखा, गांजा यांची राज्यभर चर्चे असते. त्यामुळे, एकेकाळी सुसंस्कृत असलेला संगमनेर तालुका बिहार होऊ पाहतोय का.? असा प्रश्न समाजसेवकांनी उपस्थित केला आहे.