दादांनी यांना काहीच सांगितले नाही. पण, खोटं बोलुन त्यांंच्या नावे शुद्रपणाचे राजकारण सुरू आहे.! आमदारांना घेऊन तुम्ही काम सुरू करा.!
सार्वभौम (अकोले) :-
अजित दादांनी आम्हाला असे सांगितले आहे. शरदचंद्र पवार साहेबांनी आम्हाला तसे सांगितले आहे. असा बाळबोधपणा गावभर मिरवून काही लोक त्यांच्या नावे राजकारण करू पाहत आहे. मात्र, मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना भेटलो. तेव्हा त्यांना सांगितले की, मी कोणाला काहीही सांगितले नाही. मला जे सांगायचे ते मी थेट सांगत असतो. त्यामुळे, ज्यांनी माझे नाव सांगून तालुक्यात संदिग्ध परिस्थिती निर्माण केली आहे. त्यांच्या नादी न लागता आमदार साहेबांना घेऊन तुम्ही तुमचे काम सुरू करा. येणार्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाला अधिक यश आले पाहिजे. अशा प्रकारे काही फितुर बांडगुळांकडे दुर्लक्ष करुन कामाला लागा. मी तुमच्या पाठीशी खंबिर उभा आहे. अशा प्रकारचा आशिर्वाद दादांनी दिल्याचे मत कारखान्याचे व्हा. चेअरमन सिताराम पाटील गायकर यांनी रोखठोक सार्वभौमशी व्यक्त केले.
साहेब पुढे म्हणाले की, अजित दादांचे नाव घेऊन काही तथाकथित नेते कारखाना ताब्यात घेऊ पाहत आहेत. म्हणजे, एकीकडे म्हणायचे की, कारखाना बंद पडायच्या मार्गावर आहे, कडेलोटावर आहे. तर, दुसरीकडे म्हणायचे आमच्या ताब्यात कारखाना द्या.! म्हणजे, सत्ता मिळविण्यासाठी नव्याने राजकारण करू पाहत असणारे नेते किती अपप्रचार करतात आणि किती हापापले आहेत. याची प्रचिती आता येऊ लागली आहे. म्हणजे, सत्तेसाठी आम्ही एखाद्याची आब्रु देखील चव्हाट्यावर आणायला तयार आहोत. अशा प्रकारचा संदेश त्यांनी त्यांच्या सभांमधून दिला आहे. मात्र, त्यांचा बाजार उठविण्याचे काम त्या-त्या गटातील लोकांनी केले आहे. या तालुक्याला पुरोगामीत्वाचा इतिहास आहे. त्यामुळे, कोणाच्या इज्जती काढून आपण किती विद्वान आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. मात्र, ते जनतेला पचले नाही. म्हणून तर त्यांना पत्रकार परिषदेत माफी मागावी लागली. खरंतर पहिल्यांदा मी या आरोप प्रत्यारोपाला वैतागलो होतो. आता मात्र, याची सवय मला होते आहे. कारण, यांना सामावून घेण्यासाठी मी दोन-तीन वेळा बैठका घेतल्या, त्यांच्या समस्या समजून घेत त्यावर हल काढण्याचा प्रयत्न केला. यांना माना सन्मानानं कारखान्यात स्थान देण्याचे ठरले. मात्र, यांना सन्मान नको आहे. तर हा कारखानाच बंद पाडण्याची भुमिका हे लोक घेऊ पाहत आहेत. मात्र, आज मी छातीठोकपणे सांगतो की, कारखाना मी बंद पडू देणार नाही.
खरंतर, काही लोक तालुक्यात केजरीवाल होऊ पाहत आहे. म्हणजे, वयोवृद्ध आणि अनुभवी लोकांना पुढे करायचे आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आपली पोळी बाजू पहायची. ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या सोबत राहून केजरीवाल आज दिल्लीचे मुख्यमंत्री झाले, कोणी राज्यपाल तर कोणी आमदार झाले. तसेच येथे होऊ पाहत आहे. सावंतांच्या अभ्यासाचा आणि कर्तुत्वाचा मला नक्की अभिमान व आदर आहे. आम्ही अनेक दिवस एकत्र काम केले आहे. तर, त्यांच्यासोबत रात्र-रात्र जागविल्या आहे, (समझने वाले समझ गऐं हैं) त्यामुळे, त्यांनी तरी समजून घेतले पाहिजे की, आपल्या ज्ञानाचा वापर कोणीतरी त्यांच्या राजकीय स्थैर्यासाठी वापरत आहे. सावंत यांनी जेव्हा-जेव्हा शेतकर्यांच्या हिताच्या गोष्टी मांडल्या आहेत. तेव्हा-तेव्हा आम्ही त्यांच्या सोबत उभे राहिलो आहे. म्हणजे, शेतकर्यांना एफआरपी पासून ते त्यांच्या शेतीच्या धोरणांबाबत त्यांचे म्हणणे एकले आहे. परंतु आता त्यांना कशाचे डोहाळे लागले आहे. हे काही समजत नाही.
खरंतर कारखाना चालु राहण्यासाठी किती आटापिटा करावा लागतो याची जाणिव विरोधात राहून तथा मोर्चे आंदोलने करुन होत नाही. ज्यांनी गेल्या हंगामात खोडा घातला त्याचा परिणाम कारखान्याच्या उन्नतीत बाधा आणणारा होता. कारण, कारखान्याची चौकशी लावली. ती चालु आहे, बँकाना कर्ज न देण्याच्या सुचना यांनी केल्या, कारखाना कडेलोटावर आहे असे म्हणून जिल्हाभर बदनामी केली. त्यामुळे, कामगार येईनात, त्यांना पेमेंट मिळते की नाही.! असा प्रश्न पडला आहे. अशी अनेक कारणे आम्ही फेस केली. कारखाना चालविणे म्हणजे निवेदन देऊन उपोषणाला निवांत बसल्यासारखे नाही. किंवा तो बोलक्या बाहुल्यांचा खेळ नाही. यांनी बदनामीचा कडेलोट केला तरी देखील अगस्ति त्याच दिमाखात सुरू आहे. आता पुन्हा यांनी उपोषणाचा घाट घातला आहे. कशासाठी? तर चौकशी व्हावी. आता सहकार प्रशासनेने चौकशी केली आहे. त्याचा अहवाल येणे बाकी आहे. म्हणजे, तो अहवाल येण्याची वाट देखील पाहण्याची मानसिकता नाही. पण, अहवाल आला की, आमच्या उपोषणाचे हे फलित असा फतवा आला तर काही वावघे वाटण्याचे कारण नाही. तसेही आता शिविगाळ, अपशब्द आणि शुद्र राजकारण यापलिकडे त्यांना दुसरे काहीच येऊ शकत नाही. त्यामुळे, त्यांच्या कोणत्याही कृतीचा आमच्यावर परिणाम होणार नाही. दादा व डॉ. लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढाई सुरू केली आहे.
या लोकांच्या शब्दांनी इतकी निच पातळी गाठली आहे की, तालुक्याला त्याची लाज वाटू लागली आहे. कारण, यांच्यात काही लोक असे आहेत की, अक्कल ढबुची आणि प्रवास लंडनचा.! त्यामुळे, त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवणार.! उचलयची जीभ आणि लावायची टाळुला त्यामुळे, आता आम्ही त्यांच्या आरोपांना घाबरत नाही. चौकशी लावली आहे, जर दोषी असेल तर वाट्टेल त्या शिक्षेला आम्ही तयार आहोत. यांच्या आरोप व भ्रष्टाचाराची व्याख्या म्हणजे, पैशाचा ढिग घालणे आणि ज्याला वाटेल त्याने बोचकडून घेऊन जाणे, ती वाटून घेणे.! म्हणजे, पैसा त्यांच्यासाठी अगदी किरणा बाजारासारखा आहे. अर्थात ज्यांच्यावर कोट्यावधींचे आरोप झाले, त्यांनी आम्हाला शिष्टाचार शिकविणे म्हणजे फार हस्यास्पद आहे. त्यामुळे, आरोप प्रत्यारोप करुन यांना कारखाना बंद कसा पडेल याचा ठेका काही लोकांनी घेतला आहे. मात्र, मी सभासद आणि उस उत्पादक यांना छातीठोपणे सांगतो की, कामगारांचे पगार वेळेवर होईल. योग्यवेळी उस तोडला जाईल हा कारखाना आपली भाग्यलक्ष्मी आहे. ती आम्ही बंद पडू देणार नाही. भलेही कोणी साखर आयुक्तालायवर आंदोलने करुन कारखाना बदनाम करीत असेल. तरी, ही कामधेनू वाचविण्यासाठी आपले लोकप्रिय आमदार डॉ. किरण लमामटे साहेब व आम्ही महाविकास आघाडीचे घटक कटिबद्ध आहोत.!