मामाचा दहावा करण्यापुर्वीच दोन्ही भाचे नदित वाहुन गेले, मुंबईहू पाहुणे आले आणि निळवंडे धरणावर घेऊन गेले.! एक दहावा, दोन अंत्यसंस्कार.!

 

सार्वभौम (राजूर) :- 

                            अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या नजिक प्रवरा नदिपात्रात दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दि. २८ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. मामांच्या दहाव्यासाठी मुंबईहून पाहुणे आले आणि फिरण्यासाठी निळवंडे धरणावर गेले असता या मुलांना पाण्याकडे पाहुण पोहण्याचा मोह आवरला नाही.  त्यामुळे, त्यांनी कपडे काढून नदित उडी मारली आणि धरण जवळ असल्यामुळे, प्रवाहाचा वेग प्रचंड होता. तो त्या चिमुकल्यांच्या लक्षात आला नाही. त्यांनी उडी मारताच होत्याचे नव्हते झाले आणि पाण्याच्या प्रवाहाने त्यांना कुठच्या कोठे फेकूण दिले. यात दोघे सख्खे भाऊ समिर शांताराम पवार (वय १४, रा. राजूर, ता.  अकोले) व सोहम शांताराम पवार (वय ११) या दोघांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मोठ्या कष्टाने पवार कुटुंब आपली गुजरान करीत होते. मुलांची आई ग्रामपंचायतीत साफसफाई करण्याचे काम करते. त्यामुळे, या कुटुंबावर पुन्हा एक मोठे संकट कोसळले आहे. 


 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुलांचे मामा हे गेल्या काही दिवसांपासून अजारी होते. त्यांना कुटुंबियांनी फार दवाखाना केला. मात्र, तरी देखील त्यांना अपयश आले. दरम्यान ते अनंतात विलिन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधिसाठी मुंबईहून काही नातेवाईक आले होते. तो विधी पार पडल्यानंतर मुंबईहून ये-जा करण्यापेक्षा थेट दहावा करुनच ते पुन्हा मुंबईला परतनार होते. अंत्यविधी झाल्यानंतर तीन दिवस उलटले, म्हणून घरात बसण्यापेक्षा ते चितळवेढे येथे त्यांच्या नातेवाईकांकडे गेले आणि तेथून धरण पाहण्यासाठी त्यांनी निळवंडे गाठले. यावेळी, एक माहितगार म्हणून पाहुण्यांनी या मुलांना देखील सोबत घेतले होते. थोडाफार निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर या मुलांना पाण्यात पोहण्याचा मोह झाला. त्यांनी कपडे काढले, ज्याला चष्मा लागलेला होता, त्याने देखील तो काढून अगदी व्यवस्थित ठेवला होता. त्यांना जरा देखिल कल्पना नव्हती. की, काही क्षणानंतर आपल्या आयुष्याला पुर्णविराम मिळणार आहे. त्यामुळे, त्यांनी आपले कपडे, चपला, चष्मा अगदी सुस्थितीत ठेवल्याचे पहायला मिळाले.

          आता या मुलांना पोहता येत होती की नाही. हा फार नंतरचा प्रश्न  आहे. कारण, निळवंडे धरण अगदी काही अंतरावर आहे. या धरणातून काही क्युसेस ने पाणी सोडलेले होते. त्यामुळे, त्याचा प्रवाह इतका होता. की, अगदी कट्टर पोहणारे व्यक्ती जरी असते. तरी, त्यांना या पाण्याचा ठाव देखील लागला नसता. त्यामुळे, ही तर चिमुरडी मुले होती. ते पाण्यात उतरले असता बघणाऱ्यांच्या डोळ्याची पाते लवते ना लवते तोच दोघे अचानक गायब झाली. जो व्यक्ती तेथे हजर होता. त्याला देखील मुले कोठे गेली याची चुनूकही लागली नाही. काही काळ त्यास वाटले की, मुले असतील, पाण्यात पोहत असतील. पण, त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे, त्याने शोधाशोध सुरु केली. मात्र, तरी देखील पाण्यात निरभ्र आकाश सोडून काहीच दिसेनासे झाल्यामुळे या तरुणाने एकच आरडाओरड सुरु केली. तेव्हा, या परिसरात काही लोक मासे पकडणारे होते. त्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. त्या कट्टर पोहणाऱ्यांनी या बालकांचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. सलग चार तास शोधमोहिम सुरु ठेवली असता चार वाजण्यापुर्वी बुडालेल्या मुलांपैकी एक मुलगा रात्री आठ वाजता मिळून आला. तर, दुसऱ्या मुलाचा शोध होत नव्हता, त्यामुळे धरणातून खाली सोडलेले पाणी बंद करण्यास पोलिसांनी विनंती केली असता ते बंद केले आणि आज बुधवार दि. २९ रोजी पहाटे ८ वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या मुलाचा देखील मृतदेह पोलिसांना मिळाला. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले असून त्यांचा व्हिशारा राखून ठेवला आहे. काल मोठ्या शोकाकूल वातावरणात समिर आणि सोहम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हुशार आणि कष्टाळु मुलांच्या जाण्याने त्यांच्याच नव्हे, संपर्ण राजूर परिसराला दु:ख झाले असून अकोले तालुक्यातील जनतेने हळहळ व्यक्त केली आहे.

                एकंदर, जसे लॉकडाऊन लागले होते. तेव्हापासून फक्त अकोले तालुक्यात शेततळे, विहिर आणि नदित बुडून २४ जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे आख्ख्या कोविड परिस्थितीत १४ गेले आणि कामधंदा नसतानाही हकनाक २४ जणांनी आपले प्राण गमविले आहे. पुर्वी लहित येथे मामा भाचे यांचा मृत्यु तालुक्याला चटका लावून गेला.ते ही पाहुणे मुंबईचे होते. तर,  उंचखडक बु येथील कट्टर पोहणारा व अनेकांना बडताना वाचविणारा कृष्णा देठे याच्या मृत्युने देखील हळहळ व्यक्त केली. अशा अनेक घटना आहेत. त्यामुळे, पालकांनी मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे. आजकाल धरण आणि नद्या नाले यांच्या पाण्याचा ठाव पुर्वीप्रमाणे लागत नाही. वाळु उपसा व अवैध वाहतूक यामुळे, नद्यांचे पात्र खोल व रुंद होत चालले आहे. संगमनेरात असे कित्तेक बालके पाण्याखाली गेले आहे. पण, वाळु वाहतुकांना काही लाज-लज्जा, शरम-आब्रु काही राहिली नाही.! आज या दोन मुलांच्या मृत्युनंतर हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत. त्यामुळे, आता शाळा सुरु आहेत. मुलांनी शाळेत जावे. तर, भलेही गरम होत असेल. तरीही नदिवर जाऊ नये. हिच प्रशासनाने विनंती केली आहे.