शाळा सुरू होताच, शिक्षकाच्या मुलावर समलैंगिक-अनैसर्गिक अत्याचार, घारगावात गुन्हा दाखल.!

 
सार्वभौम (संगमनेर) :-

                     कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे, आता कोठे विद्यार्थी घराबाहेर पडू लागले आहेत. तर काही नराधमांना पोटसुळ उठल्याचे पहायला मिळत आहे. एकीकडे विद्यार्थीनी सुरक्षित नाहीत असे म्हटले जाते. तर आता विद्यार्थी देखील सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण करणारी घटना संगमनेर तालुक्यातील साकुर परिसरात घडली आहे. कारण, येथे इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणार्‍या एका विद्यार्थ्यावर एका नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार दि.23 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली. मुलगा जेव्हा रडत घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्यास विचारले असता त्याने हा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने थेट घरागाव पोलीस ठाणे गाठले आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाळा सुरू झाल्यामुळे, एक विद्यार्थी 10:30 शाळेत गेला होता. दुपारी 1:15 वाजता शाळा सुटल्यानंतर तो घरी आला आणि त्याच्या आईने त्यास जेवू घातल्यानंतर तो मित्रासोबत दुपारी पुन्हा खेळण्यासाठी बाहेर गेला होता. तेव्हा दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास एक मुलगा घरी धावत पळत आला आणि पीडित मुलाच्या आईस म्हणाला की, एक व्यक्तीने तुमच्या मुलाला काठीने मारहाण करुन त्यास बालावाडीमागे ओढून नेले आहे. तो रडत होता, त्यास विरोध करीत होता. मात्र, तरी देखील त्या व्यक्तीने त्यास ओढून नेले आहे.

दरम्यान, हे शब्द कानी पडताच पीडिताच्या आईने बालवाडीकडे धाव घेतली. मात्र, तोवर उशिर झाला होता. तेव्हा पीडित मुलगा त्यांना रस्त्यात भेटला. तो रडत असताना आईने विचारले की, बाळा काय झाले? त्यावर तो म्हणाला की, संबंधित व्यक्तीने मला ओढत-ओढत बालवाडीच्या मागे नेले. माझी पॅन्ट काढून अत्याचार केला. मी त्यास नकार दिला असता त्याने मला काठीने मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार त्याच्या आईने मुलाच्या वडिलांना फोन करुन सांगितला. त्यानंतर, जेव्हा रात्री ते घरी आले तेव्हा त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली. त्यात खरोखर तत्थ्य आढळून आल्यानंतर या कुटुंबाने दुसर्‍या दिवशी थेट पोलीस ठाणे गाठले आणि कायदा व सुव्यवस्था हाती न घेता पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खरंतर जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाले, तेव्हापासून अनेक प्रेमविरांच्या वाटा विखुरल्या गेल्या. कोणाला विरह सहन झाला नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. तर कोणाचे कुटूंब तयार नाही म्हणून पळून गेले. ज्यांना समाजमान्यता मिळाली त्यांनी विवाह केला तर काही जोडप्यांनी आपली जीवणयात्रा संपविली. आज शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे, अनेकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या असून काही नराधमांच्या भावना कोठून कोठे चालल्या आहेत यावर न बोललेले बरे.! पण, त्यामुळे, एकंदर मानसशास्त्रीय दृष्ट्या विचार करता पालकांनी सजग राहिले पाहिजे. आपल्या पाल्याचा मित्र म्हणून वावर केला पाहिजे. तर, जे कोणी संशयित आणि टावाळखोर वाटला तर तत्काळ पोलिसांशी संपर्क केला पाहिजे. तर शाळा महाविद्यालयांमध्ये पुस्तकी किडे घडविण्यापेक्षा समुपदेशन व मार्गदर्शन करणारे सेमिनार आयोजित करणे ही आजच्या काळाची फार मोठी गरज आहे.