जनतेसाठी कोरानाशी झुंजणारे कुटुंब.! जिल्ह्यात सोडा, राज्यात असे कोणी काम नाही.!

 


- सुशांत पावसे

सार्वभौम विशेष :- 

                        देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला. त्यानंतर डोळ्यांची पाते लवते ना लवते तेच भारतभर त्याचा फैलाव झाला. यात अहमदनगर जिल्हा आजही देशात नंबर वन आहे. त्यामुळे त्याचा येथे किती उद्रेख झाला हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तेव्हा पहिली लाट आटोक्यात येते ना येते तेच दुसर्‍या लाटेने जिल्ह्यात हाहाकार घातला होता. यामध्ये सर्वसामान्य माणसांना बेड देखील उपलब्ध होत नव्हते. पण, जिल्ह्यात अशी अद्यावत सेवा  कुठं नाही ती फक्त ‘प्रवरा हॉस्पिटलमध्ये’ पाहायला मिळाली. एकीकडे लोकांचे खाजगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये जात होती तर दुसरीकडे प्रवरा हॉस्पिटलमध्ये जनसामान्य माणसांना मोफत उपचार होत असल्याने दिलासा मिळत होता. प्रवरा कोविड सेंटरमध्ये व विळद घाट येथील डॉ. सुजय विखे यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये 2 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी यशस्वीपणे उपचार घेतले. त्यामुळे, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना विखे कुटुंबाचा आधार मिळाला. कारण, खाजगीमध्ये एका रुग्णाचे लाखो रुपये बिल येत होते. पण, इथे दोन हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी मोफत उपचार घेतल्याने कोट्यवधी रुपये वाचले. त्यामुळे, विखे पाटील कुटूंबाची आणि जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांची कशी नाळ जोडली आहे. हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे.


 राज्यात एकीकडे कोवीडचे संकटाचे आव्हान उभे असतानाच दुसरीकडे मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर नविन संकट समाज घटकांपुढे उभे राहिले होते. मात्र, सामाजिक बांधिलकीने या दोन्ही संकटात समाजाच्या पाठीशी विखे पाटील खंबीरपणे उभे राहून 50 टक्के फी माफ करण्याचा निर्णय करून दायित्वाची भूमिका बजावणारे भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनमानसांनमध्ये आपला वेगळा ठसा उमठवला आहे. जिल्ह्यात नव्हे राज्यात प्रस्थापित नेते आहे. त्यांचे मोठ-मोठे कॉलेजस शिक्षण संस्था आहेत. पण, अडचणीच्या काळात कोणी एकही पुढे आले नाही. हा निर्णय राज्यातुन फक्त एकट्या विखे पाटील कुटुंबानेच घेतला होता. त्यामुळे, त्यांचे मराठा व ओबीसी जनतेने देखील आभार मानले आहे. कोविड संकटाच्या भीषण परीस्थीतीवर मात करण्याचे मोठे आवाहन स्विकारतानाच, मतदार संघातील भयग्रस्त समाज घटकांनाही दिलासा देण्याचे शिवधनुष्य माजी मंत्री आ.राधाकृष्ण  विखे पाटील यांनी सर्व आरोग्य सुविधा निर्माण करून पेलले. रुग्ण संख्या अटोक्यात आणतानाच मागील एक वर्षापासून महामारीत सुरू असलेल्या या मदत कार्याचा प्रवरा पॅटन लक्षवेधी ठरला आहे.

 कोविड संकटाचे आव्हान समाजासमोर उभे असतानाच मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर या समाज घटकांसमोर आणखीनच संकट उभे राहीले. आशा परिस्थितीत केवळ आंदोलन मोर्चे काढून वेळ काढू धोरण स्विकारण्यापेक्षा काहीतरी ठोस कृती त्यांनी केली. या दोन्ही समाजातील विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा देण्याचा यशस्वी प्रयत्न आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. त्यामुळे, फी माफीचा नवा प्रवरा पॅटर्न देखील राज्यात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. वास्तविक आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकरनेच मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती जाहीर करून दिलासा देण्याची गरज होती. परंतू   सरकार कोणतेच निर्णय करीत नसल्याने अस्वस्थ झालेल्या या समाजातील विद्यार्थ्यांना आधार देण्याची गरज होती. याची मुळ सुरूवात आ.विखे पाटील यांनी स्वत:पासून केली. कारण, सरकारकडे मागण्या  आणि समाजाला सूचना करत बसण्याचा स्वभाव आ.विखे यांचा नाही. एक कृतीशील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. धडाडीने निर्णय करण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची हातोटी संपूर्ण राज्याला ज्ञात आहे. त्यामुळेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍या शिर्डी मतदार संघातील मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना 50 टक्के फी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेवून टाकला. यामध्ये संस्थेचे किती अर्थिक नूकसान होतय याचा विचार करत न बसता, कोविडचे अर्थिक संकट आणि आरक्षणाच्या प्रश्नामुळे समाजापुढे निर्माण होणार्‍या समस्यांची जाणीव त्यांनी ठेवून हा निर्णय घेतला. कोणताही विद्यार्थी फी भरायला पैसे नाहीत म्हणून शिक्षणापासून वंचित राहाणार नाही हाच त्यामागील व्यापक आणि सामाजिक दृष्टिकोन होता. 

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा नावलौकिक मिळवला आहे. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण शिक्षणाचा पाया रचला. पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या दूरगामी विचाराने या शैक्षणिक संकुलाला जगाच्या ज्ञानकक्षेत नेवून ठेवले. तीच परंपरा आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोपासत सामाजिक बांधिलकीने या संस्थेचे समाजाशी नाते घट्ट बांधून ठेवले. फी माफीच्या निर्णयातून या नात्याची बांधिलकी अधिकच अधोरेखित झाली असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही. आज ग्रामीण भागातील मुल गुणवतेच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात यशस्वी होत आहेत. मिळालेल्या संधीचे सोन करण्याची हिंमत या पिढीकडे दिसते. परंतू या विद्यार्थ्यांच्या वाटचालीत येणारी संकट अडसर ठरू नयेत हा विचार वास्तविक सरकारी व्यवस्थेने करायला हवा पण तसे होताना दिसत नाही. म्हणून आ.विखे पाटील यांच्या फी माफीच्या निर्णयाचे महत्व अधिक वाटते.

राज्यातील सर्वच शैक्षणिक संस्थांनी असा निर्णय करण्याचे आवाहन आ.विखे पाटील यांनी केले आहे. अनेक शैक्षणिक संस्था राज्यात काम करतात एखाद्या वर्षी असा निर्णय केला तर यातून विद्यार्थी पालक यांना दिलासा मिळेल ही भूमिका या निर्णयामागची दिसते. नाहीतरी कोविड संकटामुळे अर्थिक आव्हान उभी आहेत. शेती आणि शेतकर्‍यांच्या समस्या कमी नाहीत. नैसर्गिक आणि मानवी संकटाचा सामना त्यांना करावा लागतच आहे. आशा परिस्थितीत आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, ही भूमिका घेवून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा पन्नास टक्के फी माफ करण्याचा निर्णय हा समाजिक दायित्वाचा वाटतो. कोविड संकटाच्या दुसर्‍या संक्रमणात मात्र आरोग्य सुविधांवर मोठा ताण आल्याचे आपण पाहातोय, सुविधां अभावी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची  होणारी ससेहोलपट थांबविणे गरजेचे होते. आ.विखे पाटील यांनी शिर्डी राहाता येथील सरकारी आणि खाजगी रूग्णालयात बेडची संख्या वाढवितानाच लोणी येथे प्रवरा ग्रमीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून  पी.व्ही.पी महाविद्यालयात सुमारे पाचशे बेडचे प्रवरा कोव्हीड सेंटर सुरू केले. यामाध्यमातून कमी लक्षण असलेल्या रुग्णांबरोबरच ऑक्सिजन बेडची आवश्यकता असेलेल्या रुग्णाकरीता 90 बेडची व्यवस्था करण्यात आली.

       लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्वच संस्थाना सध्या महाविद्यालयांना सुट्या आहेत.होस्टेलही बंद असल्याने या खोल्यांचा उपयोग करून व असलेल्या पायाभूत सुविधाच्या सहकार्याने अवघ्या आठ दिवसात प्रवरा कोव्हीड सेंटरची उभारणी झाली. प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि डॉ विखे पाटील फौडेशनच्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचे मोठे सहकार्य यासाठी मिळाले.रुग्णांसाठी होस्टेलमधील पलंग होतेच. पण, त्या गाद्या न वापरता नव्याने चारशे गाद्याची उपलब्धता आणि ऑक्सिजन बेडसाठी सर्व यंत्रणा नव्याने विकसीत केली. सेंटरमध्ये रुग्णांना खा.डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपचार मोफत दिले जात असून ओ टू बेडच्या सुविधेसह महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभही रुग्णांना या कोव्हीड सेंटरमध्ये मिळाल्याने आरोग्य सेवा खूप कमी खर्चात मिळू लागल्या.आशी सुविधा देणारे प्रवरा कोव्हीड सेंटर एकमेव ठरले. यामुळे राहता तालुक्यातील नागरीकांना दिलासा मिळाला. जेवण चहा नाष्टा दूध हळद  या व्यतिरिक्त कोविड सेंटरमध्ये रुग्णांकरीता योग आणि प्राणायामचे  प्रशिक्षण सुरू करण्यात आल्याने रूग्णांमधील प्रतिकारशक्ती वाढवितानाच त्यांच्या मनातील नकरात्मक भावना काढण्यास मोठी मदत झाली. आ.विखे पाटील यांनी यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे कोविड रुग्णांच्या मदतीसाठी समाजाचे मदतीचे हातही पुढे सरसावले आहेत. आरोग्य सुविधांसह सर्वच साहित्यांची मदत समाज घटकांकडून होत असल्याचे पाहायला मिळाले. प्रवरा कोव्हीड सेंटर सुरू झाल्याने सरकारी आरोग्य यंत्रणेचा मोठा ताण कमी होऊन डोक्यावरील ओझे खांद्यावर आल्या सारखे झाले. कारण, यापुर्वी रुगांना प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि शिर्डी संस्थांनच्या रुग्णालयाने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये पाठविण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आता चारशे रुग्णांच्या व्यवस्थेचा प्रवरा पॅटर्न कार्यरत झाल्याने दुसर्‍या संक्रमणात तरी शिर्डी मतदार संघात कोविडची लढाई जिंकण्यासाठी बळ मिळाले.

कोणत्याही सेवाभावी कार्यासाठी प्रवरा पॅटर्न हा अहमदनगर जिल्ह्यात परीचीत आहे. या पॅटर्नच्या सहकार्याने वयोश्री योजनेची सुरूवात प्रत्येक तालुक्यात झाली. यासाठी नोंदणी शिबीराचे आयोजन केले गेले. प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यात आला. प्रत्यक्ष नोंदणी शिबीराच्या दिवशी जेष्ठ नागरिकांसाठी वाहनांची सुविधा होती. आलेल्या प्रत्येक जेष्ठ नागरिकांची विचारपूस करून शिबीरात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः आ.राधाकृष्ण विखे पाटील प्रत्येक शिबीरात थांबून कार्यकर्त्यांची भूमिका बजावत होते.

         आज समाजाची मानसिकता पाहीली तर जेष्ठ नागरीकांचे प्रश्न बिकट बनले आहेत.वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. कोविड संकटामुळे या जेष्ठ नागरीकांच्या आरोग्याचे प्रश्न अधिकच गंभीर झाले आहेत. ग्रामीण भागात उपचारांच्या असलेल्या मर्यादा लक्षात घेता शासन योजनांचा लाभ आशा गरजू लोकांना मिळवून देण्याचे दायित्व विखे पाटील परीवाराने नुसते स्विकारले नाहीतर तेवढ्याच जबाबदारीने ते पूर्ण करण्याचे उद्दीष्ट देखील ठेवले.आज जिल्हयातील 35 हजाराहून अधिक जेष्ठ नागरीकांनी आधार साहीत्यासाठी नोंदणी करून घेतली हे वयोश्री योजनेचे खरे यश म्हटले पाहीजे.

          आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शिबीर यशस्वी होण्याचे कारणही विखे कुटुंबांच्या कार्यप्रणालीवर लोकांचा असलेला विश्वास. यापुर्वी जिल्ह्यातील 208 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना विखे परिवाराने दतक घेतले. या कुटुंबांपर्यंत आरोग्य शैक्षणिक आणि मुलीच्या लग्नापर्यंतची जबाबदारी या परीवाराने आता पर्यंत स्विकारली आहे. त्यामुळे, त्यांचा जिल्ह्यासाठी कर्णा सारखा दानशुर पणा ही दिसुन येत आहे.

 शिर्डी विधानसभा मतदारसंघात मोफत अपघात विमा योजना मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.अपघाताच्या घटनेत कोणत्याही कुटूंबातील व्यक्ती दगावल्यानंतर सांत्वनपर भेटी नुसत्या करण्यापेक्षा या कुटूंबाला अर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही विमा योजना सुरू केली. मतदार संघातील सर्व नागरीकांचा विमा हप्ता स्वतः विखे पाटील भरतात. त्यामुळे, आत्तापर्यंत 130 कुटुंबांना 2 लाख रुपयांचे अर्थ सहाय्य या योजनेतून मिळाले आहे.

 सरकारच्या योजनापेक्षाही विखे पाटील परीवार स्वतः सामाजिक योगदानातून करीत असलेले कार्य  राजकारणाच्या पलीकडेचे आहे. यामध्ये सामाजिक बांधिलकी लोकांप्रती असलेली आत्मियता पहायला मिळते. त्यामुळे, जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या हृदयात विखे पाटील हे नाव आहे.!