संगमनेरात तणाव.! फेसबुकवर धार्मिक भावना दुखावल्या, 34 जणांवर गुन्हा दाखल.! पोष्ट आणि कमेंट करणं महागात पडलं.!
वाच्चाळवीर आणि धर्म कोणताही असो त्याच्या नावाखाली दोन जातीत तेढ निर्माण करणारे समाजकंठक हे भारतीय संस्कृतीला लागलेली किड आहे. येथील राजकारण, भ्रष्टाचार, अन्याय आणि एकवेळी अदृश्यरित्या चालणारा व्यक्तीभेद परवडला. मात्र, जात आणि धर्माच्या नावाखाली दंगे व बम ब्लास्ट हे स्वातंत्र्य भारताला फार घातक ठरले आहे. त्यात धर्माच्या नावाखाली चालणार्या काही कट्टर संस्था यांच्यावर न्यायालयाने बंधने घातली. मात्र, तरी देखील कोणीतरी नतदृष्ट व्यक्ती येतो आणि गुण्या गोविंदाने नांदणार्या दोन समाजात तेढाची ठिणगी टाकून निघुन जातो. नकळत समाजात उद्रेख होतो आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने तणावाचे वातावरण निर्माण होते. हे देशात विविध ठिकाणी चालते. आता मात्र, ते संगमनेर शहरात देखील पहायला मिळाले आहे. कारण, संगमनेरमध्ये एका फेसबुक पेजवर मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारचा मचकुर व्हायरल करण्यात आला होता. तो एका मुफ्ती यांना पाहिला आणि खरोखर अतिशय निच आणि दर्जाहीन तथा अश्लिल भाषेचा वापर करुन ती पोष्ट शेअर केल्याने त्यांना वाईट वाटले. हा प्रकार थेट पोलीस ठाण्यात गेला आणि दि. 12 नोव्हेंवर रोजी रात्री हजारो लोकांच्या समुदायाने संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर शहर पोलिसांनी तत्काळ दखल घेत आयटी अॅक्ट, धार्मिक भावना दुखावने अशा कलमांखाली 34 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी, संगमनेर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, पोलीस ठाण्याला अक्षरश: छावणीचे स्वरुप आले होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंतोनिया मोईनो या व्यक्तीने पश्चिम बंगाल येथील एक लग्नासंबंधिची बातमी फेसबुकवर पोष्ट करुन ती व्हायरल केली. त्या बातमीला कॅप्शन देत इतके गलिच्छ शब्दप्रयोग करण्यात आले होते की, त्याच्यातील धर्मा-धर्मातील तेढ त्यातून प्रतीत होत होती. ही पोष्ट एका मुस्लिम बांधवाने पाहिल्यानंतर सहाजिक त्यांच्या भावना दुखावणे गैर नाही. ते एक जबाबदार व्यक्ती असल्याने त्यांनी त्यांच्या काही सहकार्यांना घेऊन थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. बोलबोल करता ही पोष्ट संगमनेरात इतकी व्हायरल झाली की, काही मिनिटात संगमनेर शहरातील मुस्लिम बांधव पोलीस ठाण्याकडे निघाले. हजारो जणांचा जनसमुदाय पोलीस ठाण्यात पोहचला असता त्यांनी संबंधित व्यक्तीवर तसेच ज्यांनी-ज्यांनी धार्मिक भावना दुखावतील अशा पोेष्ट केल्या आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. हो-नाही करता करता संगमनेर पोलीस ठाण्याच्या संपुर्ण परिसरात नागरिकांची ओलेट गर्दी जमा झाली. त्यामुळे, पोलीस उपाधिक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आलेल्या व्यक्तींना समजुन सांगितले. जे काही आहे ते कायदेशीर घेऊन आरोपींना अटक केले जाईल. त्यानंतर सर्वांनी सलोख्याची भूमिका घेत शांतता पाळली आणि त्यानंतर तिव्र भावना शब्दात व्यक्त करण्यात आल्या. मात्र, शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी संगमनेरच्या आजुबाजुला असणार्या सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अन्य काही पोलीसबळ मागवून रात्रभर गस्त घालण्याचे काम सुरू होते.
संबंधित प्रकार घडल्यानंतर संगमनेर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या 10 दिवसांपुर्वी (दि.2) सय्यदबाबा चौक येथे एका मुलीची छेडछाड करण्यात आली होती. तेव्हा देखील मोठा जनसमुदाय रस्त्यावर आला होता. मात्र, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि एका तरुणावर गुन्हा दाखल करुन वादावर पडदा पडला. तर, संगमनेर शहरात आता असे प्रकार वारंवार होऊ लागले आहेत. त्यामुळे, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र, येथील सर्व समाज हा सलोखा राखणारा आहे. त्यामुळे, आज सायंकाळी भलेही व्यापार्यांनी आपली दुकाने पटपट बंद करीत घरी जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस रस्त्यावर उतरली. मात्र, घडल्या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करतील. कोणीही अफवा पसरवू नये, प्रक्षोभक बोलुन लोकांना भडकवू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करु नये अशा प्रकारचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोण आहेत हे आरोपी
अंतोनिया मोईनो, विनय राठोर, दादा पवार, आदी गोस्वामी, विद्रोही जनक हेपतुल्ला, महाबली दुर्मुख, अर्जुन देशखुम, पियुष-पियुष, सुनिता गायकवाड, पोलिटिकल बोका, द ट्रोलर, ऋषी ठाकरे, शशिकांत कनाशेट्टी, एजेएवाय, आऊल बाबा, बालकी अनिल, विकी गौरव, विनय राठोर, अजय वर्मा, योगेश देशमुख, धर्मविर भारद्वाज, हरिष पाटील, जितेंद्र पाटील, गणेश दान्डडे, डॉ. कप्तान जॅक, श्रीनिवास मुंडे, जयदेव सिंग धुदानी, अमित भोंडवे, पार्थ डी. हिंदु, मच्छिंद्र देवकाते, श्रेयश चंदनशिव, दिपक शरद चन्ने, दशरथ गाडे, राजु भाझ्या अशा 34 जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सोशल मीडिया....
खरंतर वरील आरोपी यांच्यात अनेक असे काही तरुण वाटतात. की, ज्यांनी अद्याप धर्म सोडा, दोन रुपये कमविण्याची अक्कल नसेल. मात्र, आज अशा प्रकारचे नको ते उपद्रव करुन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा ठेका यांना घेतला आहे. त्यामुळे, खरंतर पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. तर महात्वाचे म्हणजे सोशल मीडियावर अशा पद्धतीने तेढ निर्माण करण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा काम करते आहे का? याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. तर आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे. त्याला एक रिर्चार्ज नंतर नेट फुकट असले तरी त्याचा वापर करताना कोठे करावा याचे भान ठेवले पाहिजे. एखादी पोष्ट अक्षेपहार्य वाटली तर त्यावर तक्रार करता आली नाही तरी चालेल पण, त्यावर नको त्या प्रतिक्रिया देणे टाळले पाहिजे. भारतीय परंपरेला रस्त्यावर उतरुन चळवळ करण्याचा इतिहास आहे. सोशल मीडियावर वळवळ करण्याचा नाही. त्यामुळे, या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.