एका मुलीस वाचविताना DYSP संदिप मिटके यांच्यावर PI कडून गोळीबार.! जीवघेणार थरार, तीन पिस्तुलांसह पीआय अटक.!

 

सार्वभौम (राहुरी)  :- 

                       जे पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके श्रीरामपूर यांनी गेल्या चार दिवसांपुर्वी संगमनेर येथे कत्तलखान्यावर सर्वात मोठा छापा टाकला. त्या संदिप मिटके यांच्यावर एकी बडतर्फ पोलिस निरीक्षकाने जिवघेणा गोळबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अपहरण प्रकारातील मुलीस डांबून ठेवल्याची माहिती मिळताच मिटके तेथे आज दि.7 अॉक्टोबर 2021 रोजी 9 वाजेच्या सुमारास दाखल झाले होते. संबंधित मुलीस आमच्या ताब्यात द्या, तिच्या जिविताला धोका पोहचवु नका. असे समजून सांगत असताना पीआय सुनिल लोखंडे (पुणे) याने मुलीच्या डोक्याला पिस्तूल लावला आणि पुढे आलात तर मुलीच्या मस्तकात गोळ्या झाडून तिला ठार करु अशी धमकी दिली. तोच लोखंडेने मिटके यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी पिस्तुलची पुढील बॅरल हातात धरुन ती जमिनिच्या दिशेकडे करताच त्यातून फायर झाली. हा सर्व प्रकार कोठे चित्रपटात नव्हे.! तर, खुद्द अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मधील डिग्रस या गावी घडला आहे. आता मुलगी,  धाडसी डिवायएसपी मिटके साहेब ही दोघे सुखरुप असून आरोपी लोखंडे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून तीन पिस्तूल व काही काडतूसे जप्त करण्यात आली आहे.

           याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे एका मुलीला एका पोलीस अधिकाऱ्याने डांबून ठेवल्याची माहिती पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांना मिळाली होती. मिटके मुळत: अन्य काही पोलीस अधिकार्यांप्रमाणे भित्रे नसून प्रचंड धाडसी आहेत. मुळात पोलीस अधिकारी आणि वर्दी म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. मिटके यांना माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. थेट आपले पथक घेऊन त्यांनी सकाळी ९ वाजता डिग्रस गाठले. दरम्यान तेथे गेल्यानंतर त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला. हा सर्व प्रकार नियोजित असून हत्यारबंद असू शकतो असे त्यांच्या लक्षात आले असावे. त्यामुळे, थेट छापा टाकण्यापुर्वी त्यांनी सलोख्याने लोखंडे यास आवाज दिला. तेव्हा पोलीस आल्याचे समजताच त्यांने थेट मुलीच्या डोक्याला पिस्तूल लावूनच बाहेर आणले. तेव्हा, मिटके यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर सर्वांना सावधानतेचा व संयमाचा इशारा दिला. पुढे कोणी आले तर मुलीच्या मस्तकातून गोळ्या आर पार घालेल. त्याच्या या धमकीने काय करावे काय नाही. हे मिटके यांच्या लक्षात येईना. मात्र काही झाले तरी मुलीचा प्राण वाचला पाहिजे. त्यामुळे, त्यांनी बडतर्फ पोलीस अधिकारी यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आपण, पोलीस आहोत, जनतेची सेवा हिच आपले उद्दीष्ठ आहे. आपल्या ज्या काही समस्या असतील. त्या आपण बसून आणि चर्चेतून सोडवू. मात्र, अशा पद्धतीने कोणाच्या जिवाशी खेळून न्याय मिळविणे हा त्यामागिल मार्ग नाही. मात्र, लोखंडे याने त्यांचे काही एक एकले नाही. कोणी पुढे येऊ नका. नाहीतर मुलीचा जीव घेईल या पलिकडे त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.


           दरम्यान, आरोपी लोखंडे हा काही एकत नाही. हे समजताच त्याच्याशी चर्चा करुन त्याचे लक्ष विचलित करणे हाच अंतिम पर्याय मिटके यांना सुचला. अखेर बोलबोल करता लोखंडे याने मुलीस मारण्याचा अंतिम निर्णय घेतल्याने करो या मरो अशा स्थितीत संदिप मिटके यांनी आरोपी लोखडे याच्या पिस्तुलवर झेप घेतली आणि पिस्तुलच्या समोरचा बॅरल हातात घट्ट धरुन तो जमिनिच्या दिशेने केला. त्याच काही क्षणात लोखंडेने गोळ्या झाडल्या, मात्र, त्या प्रचंड वेगाने जमिनित घुसल्या. हा थरार सुरु असतानाच अन्य कर्मचाऱ्यांनी लोखंडे यास घट्ट मिठी मारली आणि त्याचे हात दाबून धरले. त्यामुळे, त्याने अन्य गोळ्या फायर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला ते शक्य झाले नाही. त्यानंतर, त्यास बेड्या ठेकण्यात आल्या तर ज्या मुलीस त्याने वेठीस घरले होते. तिची देखील सुखरुप सुटका करण्यात आली. हा सर्व थरार पाहणार्या पोलिसांच्या देखील अंगारव शहारे आल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून आल्या आहेत. तर, जेव्हा लोखंडे याची अंगझडती व घरझडती घेतली असता त्याच्याकडून अन्य तीन पिस्तुले व काही जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

             खरंतर, गेल्या काही दिवसांपुर्वी नगर तालुक्यातील शेंडी येथे पोलिसांनी एका बँक दरोडा प्रकाराचे मॉकड्रील केले होते. अर्थात हा दरोडेखोरांना पकडण्याचा डेमो होता. मात्र, तो व्हिडिओ राज्यभर पसरला आणि पोलिसांचे बिन कामाचे कौतूक झाले. पोलिसांची जिगरबाज कारवाई, धडाकेबाज कारवाई वैगरे म्हणत डंके बाजविला. येथे मात्र, मिटके यांनी खरोखर स्वत:ची जीव धोक्यात घालून एका मुलीचा जीव वाचविला आहे. त्यामुळे, खऱ्या अर्थाने पोलीस अधिक्षकच नव्हे, पोलीस महानिरिक्षक, संचालक आणि खुद्द गृहमंत्री वळसे पाटील यांनी त्यांचे स्वागत करणे अपेक्षीत आहे. कारण, एकीकडे त्याच खात्यातील बडतर्फ पोलीस अधिकारी अशा पद्धतीने लोकांचा जिव घेऊ पाहतात, अवैध एक नव्हे, तीन तीन पिस्तुले हाती बाळगतात. तर, दुसरीकडे मिटके यांच्यासारखे अधिकारी लोकांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालुन कारवाई करतात. बरं ही मिटके यांची पहिलीच कारवाई नाही. तर त्यांनी नगर शहरामध्ये देखील मोठमोठ्या कारवाया केल्या आहेत. इतकेच काय.! तर, अगदी काल परवा संगमनेरचे पोलीस उपाधिक्षक राहुल मदने हे सुट्टीवर गेले आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात येऊन मिटके यांनी राज्यातील सर्वात मोठी कारवाई केली. आता दुर्दैव इतकेच की, संगमनेरच्या कार्यकर्त्यांनी साधा एक बुके देऊन देखील त्यांचा सत्कार केला नाही. म्हणजे, मलिदा खाऊन पलिदा पाळणारे येथे गोड लागतात, मात्र, कारवाई करणाऱ्यांचा साधा सत्कारही होत नाही. आता काही झाले तरी, एकीकडे पिस्तुल पाळळारे अधिकारी, दुसरीकडे करवाई सोडून सुट्ट्यांवर जाणारे अधिकारी तर तिसरीकडे स्वत:चा जीव गेला तरी बेहत्तर पण, वर्दीचे ब्रीज जोपासणारे अधिकारी. त्यामुळे, मिटके यांचे कौतूक गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी करावे. अशीच अपेक्षा तमाम नगरकरांनी व्यक्त केली आहे.