पीआय व डिवायएसपींच्या निलंबनासाठी मंगळवारी पुन्हा येल्गार.! कत्तलखाने उध्वस्त केल्यानंतर घरात मांस तोडणी सुरू, पुन्हा पाच ठिकाणी छापे.!
सार्वभौम (संगमनेर):-
संगमनेर शहरात कत्तलखान्यांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई झाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटना फार आक्रमक झाल्या होत्या. त्यानी 10 तास आंदोलन केल्यानंतर नगरपालिकेने तिसर्या दिवशी संबंधित कत्तलखाने जमिनदोस्त केले होते. तर, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांच्यावर आठ दिवसानंतर देखील कारवाई झाली नाही. त्यामुळे, कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आज अॅड. श्रीराम गणपुले यांनी (दि.9) पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, माझ्या माहितीनुसार काही अधिकार्यांना 27 ते 30 लाख रुपये मलिदा पोहच होत होता. (ते कोण अधिकारी यांची नावे माहित नाही) त्याचा पुरावे आम्ही हा खटला कोर्टात उभा राहिल्यानंतर थेट न्यायालयात सादर करणार आहोत. आता येत्या 12 तारखेपर्यंत तुम्हाला शांतता हवी असेल तर पोलीस अधिकार्यांना निलंबित करा असे ते म्हणाले. तर, ही चळवळ ही कोण्या समाजाच्या विरोधात नाही. ती कत्तलखान्याच्या विरोधातील आहे. याला कोणी जात आणि धर्माचे वलय देऊन नये. मुस्लिम समाजाविषयी आम्हाला आदर आहे. त्यांच्यातील कित्तक लोक मांस खात नाही. तर, बिड येथील शेख नावाच्या इसमाने दुष्काळ कळात शेकडो जनावरांची छावणी उभी केली होती. त्याला सरकारने सन्मानित देखील केले आहे. तर आमच्यातील काही मित्र, आमच्या संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे, आमच्या आंदोलनात काही घुसखोर पाठवून त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न काही व्यक्तीनी केल्याचा आरोप गणपुले यांनी केला. तर येणार्या मंगळवार दि. 12 रोजी मुस्लिम संघटनांनी देखील या आंदोलनात सामिल होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आज पुन्हा संगमनेरात पाच कत्तलखान्यांवर छापे मारण्यात आले. त्यात सगिर बुढण कुरेशी, मुशरफ बशीर कुरेशी, हाजी मुजहीद आब्दुल करीम सय्यद, करीम जलील कुरेशी, हारुन मुलतान कुरेशी (सर्व रा. मोगलपुरा. ता. संगमनेर. जि. अहमदनगर) यांच्या घरात पोलिसांनी छापे टाकले आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी ज्या विश्वासाने कारवाईचे लेखी पत्र दिले होते. त्या विश्वासाने अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे आणि पोलीस अधिक्षक मनोज पाटील हे कारवाई का करीत नाहीत? जनतेच्या प्रक्षोभापेक्षा यांना कोणती गोष्ट अधिक प्रिय आहे? असा प्रश्न आंदोलक विचारत असतात. देशमुख यांना तर लाचलुचपत प्रकरण झाले तेव्हाच नियंत्रण कक्षेत जमा केले होते. मात्र, नंतर ते कोणाच्या आशिर्वादाने आले? पोलीस अधिक्षकांनी त्यांच्या तत्वांना मुरड का घातली? पोलीस उपाधिक्षक मदने यांची उल्लेखनिय कारवाई काय आहे? त्यामुळे, संगमनेरात पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांची नेमणुक करावी. अशा प्रकारची मागणी होऊ लागली आहे. आता येणारी नगरपालिका समोर ठेऊन येथील राजकारण पेट धरु लागले आहे. त्यामुळे, थेट निशाणा कोणी कोणावर करीत नसले तरी, मुस्लिम समाजास संभाळण्यासाठी काँग्रेस किती आटापिटा करीत आहे. याची प्रचिती येत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, जग इकडचे तिकडे झाले तरी चालेल मात्र, संगमनेरात दस नंबर कधी बंदच होऊ शकत नाही.! हे आजच्या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आज संगमनेरात मोगलपुरा येथे तर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी जमजम कॉलनी येथे राज्यातील सर्वात मोठा छापा टाकण्यात आला होता. यावर हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी प्रांत कार्यलयापुढे ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावर सात दिवसात उचित कारवाई करू असे पत्र आंदोलन कर्त्यांना दिले. परंतु, घटना घडून एक आठवडा होईल. पण, कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. खरंतर, 1 कोटी 50 लाख 50 हजार इतक्या मुद्देमालावर नगरचे पथक छापा टाकते आणि हाकेच्या अंतरावर असलेले संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने हे अनभिज्ञ असतात हे म्हणायला देखील अंगी धाडस निर्माण व्हावे लागेल. येवढेच नाहीतर जेव्हा पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला तेव्हा हेच कुरेशी त्यांना भेटण्यासाठी आले असता. त्यांना सर्व अवैध कत्तलखाने बंद करण्यास सांगितले होते. सुरवातीस सर्वांना स्ट्रिक धरले पण, नंतर जे पिकपने जात होते तेच आयशर गाडीत जाण्यास सुरवात झाली. त्यामुळे, येथून कोणा-कोणाला किती मलिदा भेटत असेल हे देवाला माहित.!
इतकेच काय! येथील वर्दीवर 55 लाखांच्या मलिद्या बाबत शिवसेनेच्या पदाधिकार्याकडून टीका होत होती. एव्हाना त्याचे कागदी घोडे देखील रंगविले गेले. मात्र, झाले काय? पुढे हाच विषय गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई व पोलीस महानिरीक्षक, नाशिक यांच्या दालनात जाऊन आजही तो प्रलंबित आहे. तरी देखील कारवाई झाली नाही. त्यामुळे, वरिष्ठांनी नेहमी अधिकार्यांना पाठीशी घातले आहे. इतकेच काय! किरकोळ कारणावरून पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांचे निलंबन केले तर साहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे यांची बदली केली. पण, कोट्यावधीचा छापा टाकुन देखील वरिष्ठांकडुन पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना अभय का? हा प्रश्न संगमनेरकरांच्या व आंदोलकांच्या मनात शंकेचे घर तयार करत आहे.
दरम्यान, संगमनेर शहरला पोलीस निरीक्षक म्हणुन गोकुळ औताडे असताना हे सर्व अवैध कत्तलखाने बंद होते. त्यावेळेस हेच अवैध कत्तलखाने कोपरगाव शहरात सुरू झाले होते. त्यावेळेस तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या पथकाने कोपरगाव शहरला अवैध कत्तलखान्यावर छापा टाकला होता. त्यावेळी कोट्यावधीचा मुद्देमाल मिळुन आला होता. तेव्हा, कोपरगाव शहरला पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांना जबाबदार धरून 4 तासांच्या आत मुख्यालयात जमा केले होते. मात्र, संगमनेरात छापा टाकुन कोट्यवधीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन एक आठवडा उलटुन देखील कुठली कारवाई नाही. एकीकडे, किरकोळ कारणावरून पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांची पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी निलंबन केले. पण, दुसरीकडे लाखो रुपयांचा आरोप व कोट्यावधीचा छापा टाकुन देखील पोलीस निरीक्षकांवर कारवाई का नाही? असा प्रश्न आता संगमनेरच्या सुज्ञ लोकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, संगमनेर व अकोले तालुक्यात चोर्यांचे प्रमाण आजकाल फारच वाढले आहे. मात्र, वर घारगावचे आरोपी सापडतात, शेजारी तालुका पोलीस ठाण्यातील आरोपी सापडतात मात्र, संगमनेर शहरातीलच गुन्ह्याची उकल का होत नाही? असा प्रश्न आता संगमनेर शहरातील जनतेला पडला आहे. या पोलीस ठाण्यात मुकुंद देशमुख यांनी ऐन्ट्री मारली तेव्हापासुन चोरीचे सत्र सुरूच आहे. चैन स्नॅचिंग, घरफोड्या, दरोडे, आणि रोजच्या चोरी जाणार्या दुचाकी याचे प्रमाण देखील वाढले आहे. येथे पोलीस कर्मचार्यांना वेठीस धरले जाते, त्यांच्या फिक्स पॉईहून ते नैसर्गिक विधीस गेले तरी त्यांच्या गैरहजेर्या घेतल्या जातात. पण, आरोपीच्या मुसक्या अवळण्यात पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना अपयशच येत असल्याची टिका शहरातील नागरिक करीत आहेत. त्यामुळे, त्यांनी जेव्हा पासुन पदभार स्वीकारला, तेव्हापासुन पोलीस ठाण्यात फक्त राजकीय लोकांची उटारेटी सुरू असल्याचे आरोप होत आहे. आता कौटुंबिक गुन्हे आणि मारामार्या हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणे साहजिकच आहे. मात्र, प्रोफेशनल गुन्हे आणि चोर्या दरोडे यात मात्र पोलिसांचे अपयश आहे. जर असे प्रकार घडले तरी किमान त्यातील काही गुन्ह्यांचा तपास लागणे अपेक्षित असते. मात्र, गुन्हे दाखल होतच आहे आणि ते कायम तपासावरच जात आहे. यावर मात्र शहरातील जनता फार नाराज असल्याचे दिसुन येते. जेव्हा पोलीस निरीक्षक म्हणुन मुकुंद देशमुख यांनी पदभार स्वीकारला तेव्हापासुन आतापर्यंत कोणतीही उत्तम कामगिरी दिसुन आलेली नाही. उलट दिल्लीनाक्यावर पोलिसांवर समूहाने हल्ला झाला त्याचा व्हिडीओ राज्यभर गेला. पण, साधे पोलिसांच्या मागे देखील उभे राहता आले नाही, असा आरोप झाला.