कोंबड्या चोरल्याचे सरपंचाला सांगितल्याने दारु पाजून पुलाहून लुटून देत दोघांनी केला शातीर पद्धतीने खून.! दोघांना बेड्या.!
सार्वभौम (अकोले):-
पोल्ट्री फार्ममधून कोंबड्या चोरुन नेल्यानंतर एका व्यक्तीने संबंधित माहिती आपल्या गावच्या सरपंचांना दिली होती. त्याचा राग आल्याने दोघांनी एक मास्टर प्लॅन करुन पोल्ट्र फार्म मालकास अकोल्यात आणले आणि त्यांना दारु पाजून थेट पुलाहून ढकलुन देत खून केला. ही घटना गांधी जयंतीच्या दिवशी दि. 2 ऑक्टोबर रोजी अकोले तालुक्यातील नदीच्या छोट्या पुलावर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यात अनुसया दशरथ मडके (रा. गर्दनी, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी देवजी दशरथ खोडके व कावजी संतू मेंगाळ (दोघे रा. गर्दनी. ता. अकोले) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत फिर्यादी दिलेली सविस्तर माहिती अशी की, जुलै 2021 रोजी आरोपी देवाजी खोडके हा मडके यांच्या पोल्ट्रफार्मवर गेला होता. मला कोंबड्या विकत घ्यायच्या आहेत असे म्हणून त्याने कोंबड्यांची चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा अनुसया मडके यांनी त्यास हटकले आणि त्यास हुसकावून लावले. त्यानंतर अनुसया यांनी घडला प्रकार त्यांचे पती दशरथ मडके हे घरी आल्यानंतर त्यांना सांगितला. हा प्रकार थेट पोलीस ठाण्यात नेण्यापेक्षा त्यांनी तंटा मुक्ती म्हणून गर्दणी गावचे सरपंच यांना सांगितला. त्यानंतर पुढे काही विपरीत घडायला नको म्हणून सरपंचांनी देवाजी खोडके यास समज दिली होती. त्यानंतर पुन्हा असे काही होणार नाही. असे त्याने सांगताच या प्रकारावर पडदा पडला होता.
मात्र, त्यानंतर दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी दशरथ मडके हे बाजरीचे दाणे काढण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांच्या मळ्यात गेले होते. तेव्हा आरोपी क्रमांक दोन काऊजी संतू मेंगाळ हा देखील तेथेच होता. हेे काम अटपून रात्रीचे 10:30 वाजून गेले. तरी देखील दशरथ हे घरी गेले नव्हते. त्यांची पत्नी त्यांची वाढ पाहत होती. त्यामुळे, तिने काऊजी मेंगाळ याच्या मुलाच्या मोबाईलवर फोन करुन विचारणा केली असता तो म्हणाला की, माझे वडील देखील अद्याप घरी आलेले नाही. त्यामुळे, नक्कीच ही दोघे सोबत होती हे खात्रीशीर आहे. त्यानंतर दि. 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 12:45 वाजण्याच्या सुमारास पुन्हा अनुसया मडके यांनी मेंगाळ यांच्या मुलास फोन केला. तेव्हा देखील तो म्हणाला की, माझे वडील अद्याप घरी आलेले नाही. आणि दशरथ मडके हे देखील आमच्या घरी नाही.
दरम्यान, पती घरी आले नाही. त्यामुळे, अनुसया यांनी सकाळी 9 वाजता गर्दणी गाव गाठले. तेव्हा गावात त्यांना काऊजी संतू मेंगाळ हा समोर उभा दिसला. तेव्हा फिर्यादी महिलेने त्यास विचारले की, माझे पती काल तुला सोडविण्यासाठी तुझ्या घरी आले होते. तेव्हापासून ते घरी आलेले नाहीत. तेव्हा तो म्हणाला की, मी 10 वाजता घरी गेलो होतो. मला काहीच माहित नाही. त्यानंतर पतीचा शोध लागेना म्हणून पत्नी अस्वस्थ झाली होती. तेव्हा त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र, तरी देखील दशरथ मडके यांचा शोध लागला नाही. त्यामुळे, अनुसया यांनी थेट अकोले पोलीस ठाणे गाठले. रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास दशरथ यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली.
त्यानंतर दि. 4 ऑक्टोंबर 2021 रोजी अनुसया यांचे भाऊ आणि अन्य नातेवाईक यांनी काऊजी मेंगाळ यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली. तेव्हा तो म्हणाला की, 2 ऑक्टोबर रोजी बाजरीचे दाने काढल्यानंतर देवजी खोडके, दशरथ मडके व मी आम्ही अकोल्याला जाऊन दारु विकत घेतली होती. ती घेऊन आम्ही अकोल्याच्या लहान पुलावर पीत बसलो होतो. तेव्हा दशरथ मडके याचा पाण्यात तोल गेला आणि तो नदीत पडून वाहून गेला. त्यानंतर पोलीस आणि मयताचे नातेवाईक यांनी दशरथ यांची पाण्यात शोधाशोध सुरू केली. तेव्हा दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह हा शेकेईवाडी परिसरातील डोहात मिळून आला होता. त्यानंतर मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कार झाल्यानंतर आज दोघांच्या विरोधात संशयाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.