अखेर डॉ. योगेश निघुते यांना अटक.! मार्ग खुंटल्याने सकाळीच पोलिसांना सरेंडर..! एक दिवस कोठडी.!


सार्वभौम (संगमनेर):-

       संगमनेर शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. योगेश निघुते यांची पत्नी डॉ. पुनम निघुते यांच्या आत्महत्या प्रकरणी आज गुरुवार दि. 21 रोजी सकाळी 8:30 वाजता डा. योगेश निघुते यांना अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद हायकोर्टात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. मात्र, आपला जामीन फेटाळला जाणार आहे हे लक्षात येताच त्यांनी जामीन अर्ज विड्रॉल करुन घेतल्याची माहिती रोखठोक सार्वभौमला मिळाली. त्यानंतर कोठेही पळापळ तथा धावपळ न करता डॉ. योगेश निघुते यांनी पोलिसांना शरण येत स्वत:ला पोलिसांच्या ताब्यत स्वाधिन केले आहे. आज त्यांना पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी सकाळी अटक केली असून आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता पुढील तपासासाठी त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बोलरोगतज्ञ डॉ. योगेश निघुते यांच्या पत्नीने त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी संगमनेर न्यायालयात जामीन अर्ज टाकला होता. मात्र, तो फेटाळल्याने त्यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे आपला जामीन अर्ज मांडला होता. त्यांच्या जामीन अर्जावर तारीख पडल्यानंतर दोन्ही बाजुंचा युक्तीवाद झाला होता. त्यामुळे, आता निकालाची प्रतिक्षा होती. मात्र, आपल्याकडे जामीन मंजुर होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सक्षम कारण नाही तथा सक्षम पुरावे नाहीत. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला जामीन अर्ज विड्रॉल (काढून घेतला) केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, अर्ज काढून घेतल्यानंतर त्यांच्या अटकेचा मार्ग खुला झाला होता. त्यामुळे, त्यांच्याकडे दोनच मार्ग होते. पहिला म्हणजे तो जामीन नामंजुर होताच सुप्रिम कोर्टात आपला जामीन प्रोड्युस करणे आणि पसार होणे. तर दुसरा म्हणजे थेट पोलिसांना शरण येणे. मात्र, कोठेही अधिकचे प्रयत्न न करता त्यांनी न्यायालयाला विनंती केली आणि आपला जामीन अर्ज काढून घेतला आहे. आता त्यांना अटक होऊन जरी स्थानिक कोर्टाने पुढील जामीन अर्ज फेटाळला तरी हायकोर्टात त्यांना आपली बाजु मांडताना तपास कामी अटक अशा प्रकारचा युक्तीवाद प्रतिवादी पक्षास करता येणार नाही. तेव्हा तपास पुर्ण झालेला राहिला. त्यामुळे, निघुते यांच्या वकीलांनी जो काही निर्णय घेतला तो योग्य असल्याची चर्चा वकील वर्तुळात सुरू होती.

आता डॉ. निघुते यांना आज सकाळी पोलिस ठाण्यात जाऊन स्वत:ला पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. तपासी अधिकारी पंकज शिंदे यांनी त्यांना अटक दाखविली असून आज दुपारी डॉ. निघुते यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.पुढील तपासासाठी त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. पुनम निघुते यांना ते खरोखर त्रास देत होते का? त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत होते का? त्यांना मारहाण करीत होते का? त्यांचा शरिरीक व मानसिक छळ करुन पुनम निघुते यांच्या माहेरहून यांनी पैसे घेतले का? अशा अनेक बाबींचा तपास करण्यासाठी पोलीस डॉ. योगेश निघुते यांना पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. अनेकदा अटकपुर्व जामीन फेटाळल्याने त्यांनी एक दिवस का होईना पोलीस कोठडी मिळणार होतीच. त्यामुळे, आज एक दिवस निघुते यांचा मुक्काम संगमनेर पोलीस कोठडीत होणार आहे.   

काय आहे प्रकरण.!                        

संगमनेर शहरातील बालरोग तज्ञ योगेश यशवंत निघुते (रा. चिरायु हॉस्पिटल ताजणे मळा, संगमनेर) याची पत्नी डॉ. पुनम निघुते यांनी रविवार दि. 29 आँगस्ट 2021 रोजी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर डॉ. योगेश निघुते यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. लग्नानंतर पाच ते सहा महिन्यापासून ते 29 आँगस्ट 2019 पर्यंत पुनम यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होते. तर, त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करीत होते. त्यामुळे त्यांनी पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर, पुनम यांचे बंधू शरद कमलाकर कोलते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. योगेश निघुते यांच्यावर कलम 306, 304 (ब), 498 व 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.