छी.! घाणेरड्या तोंडाचा शिक्षक.! डॉक्टर असून विद्यार्थीनीला म्हणतो, तू येथे....आली का? सिद्धकला हॉस्पिटलमधील प्रकार.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

               संगमनेर खुर्द येथील सिद्धकला हॉस्पिटल येथे शल्यतंत्र शिकविणार्‍या एक डॉक्टर शिक्षकाने आपल्या विद्यार्थीनीशी अश्लिल बोलुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे घृणास्पद शब्दप्रयोग केले. तू येथे हलवायला आली आहे का? तू येथे हजामत करायला आली आहे का? असे अनेक अपशब्द बोलुन विद्यार्थीचा विनयभंग केले. त्यामुळे, विद्यार्थीनी आजारी पडली आणि तरी देखील तिला तीन वर्षाचा कोर्स पाच वर्षे करायला लावतो की नाही बघ.! अशा प्रकारचा दम दिला. हा प्रकार मे 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी पीडित विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. डॉ. नैमिश सराफ (रा. संगमनेर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

याबाबत फिर्यादीनुसार सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथील 26 वर्षीय तरुणीने सिद्धकला हॉस्पिटल येथे 1 एप्रिल 2021 रोजी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. त्यामुळे, पीडित तरूणी सध्या सिद्धकला होस्टेल येथे राहत होती. पहिल्याच वर्षात त्यांना शल्यतंत्र शिकविण्यासाठी आरोपी डॉ. नैमिश सराफ याची नेमणुक होती. कॉलेज चालु झाल्यापासून 3 ते 4 दिवसानंतर नैमिश हा पीडित तरुणीला नेमही घालुन पाडून बोलत होता. नको-नको ते टोमणे देत होता. त्यामुळे, त्याचे नेमकी काय दुखणे आहे. हे विद्यार्थीनीस समजले नाही. या त्याच्या वागण्याने तिला फार मानसिक त्रास होत होता.

दरम्यान, मे 2021 रोजी पीडित विद्यार्थीनी ओ.पी.डी मध्ये काम करीत असताना डॉ. नैमिश सराफ हा तेथे आला आणि म्हणला की, तू ओ.पी.डी मध्ये कशाला हालवायला आली का? इकडे कशाला हजामत करायला आली का? असे म्हणत त्याने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तर, तु येथून निघुन जा, तुझी गरज नाही आम्हाला. तुला 3 वर्षाचे पाच वर्षे कोर्स करायला लावणार अशा प्रकारची तो नेमही धमकी देत होता. त्यामुळे, पीडित तरुणी त्यास फार घाबरत होती. तर त्याच्यामुळे होणार्‍या मानसिक त्रासामुळे ती फार अजारी पडली होती. जवळ पालक नसल्याने तिने हा प्रकार तिच्या मैत्रीणींना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्लक्ष करण्यापलिकडे कोणाकडून काही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे, ती अधिक अजारी पडली आणि उपचारासाठी तिने 17 सप्टेंबर 2021 रोजी थेट मुंबई गाठली.

दरम्यान, पीडित विद्यार्थीनीस बरे वाटल्यानंतर ती दि. 11 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कॉलेजमध्ये हजर होण्यासाठी गेली होती. तेव्हा नैमिश सराफ हा पुन्हा तिला भेटला आणि म्हणला की, तु येथे कशाला हजामत करायला आली का? तु माझ्या तोंडासमोर येऊ नको असे म्हणून पुन्हा अश्लिल शब्दांचा वापर करीत लज्ज उत्पन्न होईल असे कृत्य केले. आता हा सर्व प्रकार तिला सहन होईनासा झाल्याने तिने थेट आपल्या आई वडिलांना फोन करुन घडला प्रकार कथन केला. आपल्या मुलीची आवस्था पाहून पालकांनी संगमनेर गाठले आणि दि. 22 आक्टोबर 2021 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात डॉ. नैमिश सराफ याच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.

आता, संगमनेर शहरात नुकतीच डॉ. पुनम निघुते यांची आत्महत्या आणि त्या पाठोपाठ डॉ. योगेश निघुते यांची अटक हे प्रकरण चर्चेत असताना पुन्हा नव्याने एका वैद्यकीय क्षेत्राची बातमी येऊन धडकली आहे. त्यामुळे, संगमनेरात वैद्यकीय क्षेत्राला ग्रहण लागले की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, काही झाले तरी एखाद्या उच्चशिक्षित डॉक्टर आणि त्यात शिक्षक म्हणून कार्यरत असताना अशा पद्धतीने विद्यार्थीनीशी बर्ताव करणे हे वैद्यकीय पेशाला नाही आणि शिक्षकी पेशाला देखील न शोभणारे आहे. या प्रकाराचा संगमनेरकरांनी निषेध व्यक्त केला आहे.