मुंडकं कापलेलं धड विहिरीत सापडले.! तालुक्यात एकच खळबळ, मुंडके अद्याप गायब.! आत्महत्या की घातपात.! शोध सुरु.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे धांबोडी फाटा परिसरात एका ४५ वर्षीय व्यक्तीचे मुंडके नसलेले धड विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लक्षात आली. याबाबत स्थानिक पोलीस पाटील यांनी अकोले पोलिसांना माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भर पावसात विहिरीतून ते धड आणि मुंडके काढण्याचे काम सुरु होते. ही नायलॉन दोरीने केलेली आत्महत्या आहे की, घातपात.! याबाबत पोलिसांमध्ये साशंकता होती. त्यामुळे, धड आणि मुंडकं पोष्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात आणल्यानंतर आता वैद्यकीय अहवालात याबाबत असणारे तर्क वितर्क व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. मात्र, दुपारी ३ वाजता मयत व्यक्तीचे धड बाहेर काढण्यात पोलिस व नागरिकांना यश आले. मात्र, विहिर खोल असल्याने मुंडके तळाला गेल्याने ते अद्याप मिळून आले नव्हते. गोताखोराच्या माध्यमातून ते शोधण्याचे काम सुरु होते. या घटनेबाबत तुर्तास अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. भाऊसाहेब दाजीबा तोरमल (वय ४५, रा. पिंपळगाव निपाणी, ता. अकोले, जि. अ. नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे धांबोडी फाटा परिसरात भाऊसाहेब तोरमल हे गृहस्त राहत होते. व्यसनाधिनतेमुळे त्यांच्यात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती. त्यामुळे, त्यांनी आत्महत्येचे प्रयत्न केल्याची चर्चा सुरु होती. रविवार दि. १७ रोजी सकाळपासून त्यांच्या मनात फारच घालमेल सुरु होती. त्यामुळे, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या घराच्या जवळच असणाऱ्या विहिरीच्या कठड्याला एक नायलॉन दोरी बांधली. विहीर ही ६० ते ७० फुट खोल असल्यामुळे, त्यांनी कठड्यावर बसून गळ्याला दोर बांधला आणि थेट विहिरीत उडी मारली. त्यामुळे, १२ ते १५ फुट असणारी दोरी ही तिला मोठा झटका बसला आणि दोर पक्की असल्यामुळे, ती न तुटता थेट गळ्याभोवती काचली आणि झटक्यामुळे थेट मुंडके आणि धड वेगवेगळे झाले. काही वेळानंतर हा प्रकार तेथील नागरिकांनी पाहिला असता त्यांनी विहिरीकडे धाव घेतली आणि त्यांनी विहिरीत डोकून पाहिले तर त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. त्यावेळी संबंधित दोर हा विहिरीच्या कडेला लटकलेला होता. तर, त्या रक्त लागलेले होते. त्यामुळे, हा प्रकार अशाच पद्धतीने घडला असावा अशा प्रकारचा तर्क पोलिसांनी लावला आहे.
दरम्यान, घडला प्रकार स्थानिक नागरिकांनी पोलीस पाटील यांना सांगितला आणि त्यांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी पाहिलेली परिस्थिती संदिग्ध असो वा नसो, त्यांनी घटनेची सखोल चौकशी सुरु केली आहे. मयत तोरमल यांचा मृतदेह बाहेर काढला असून त्याचे नुकतेच धड पोलिसांच्या हाती आले आहे. शरिरात पाणी घुसल्यामुळे धड वरती तरंगले होते. मात्र, मयतचे मुंडके तळाला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे, ही आत्महत्या असो वा नको.! पंचनाम्यासाठी मुंडके शोधने पोलिसांना क्रमप्राप्त आहे. त्यामुळे, पंचक्रोशीतील काही व्यक्तींनी विहिरीत बुड्या घेऊन तळाला गेलेले मुंडके शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना रात्री उशिरापर्यंत अपयश आले होेते. त्यामुळे, आता मुंढी सकाळी शोधण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली. तर, जे काही धड सापडले होते. ते पोलिसांनी ताब्यात घेऊन अकोले ग्रामिण रुग्णालयात ठेवले आहे. त्यामुळे, जोवर मुंढी सापडत नाही. तोवर ही आत्महत्या की घातपात यावर प्रश्नचिन्ह कायम राहिले आहे.
आता संपुर्ण तालुक्यात या घटनेची चर्चा सुरु होती. कारण, धड वेगळे आणि मुंडके वेगळे असे ऐकल्यानंतर खरोखर ही आत्महत्या आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे, याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आत्महत्या करताना दोरी कशी तुटली नाही? मुंडके पाण्यात आहे का? काहीही झाले तरी खरच मुंडके तुटून पडेल अशी परिस्थिती निर्माण होईल का? तुटलेच मुंडके तर ते अद्याप कसे सापडले नाही. अशा प्रकारे कोणी नियोजनबद्ध प्लॉन करु शकतो का ? हा प्रकार व्यसनातून झाला असावा का ? त्यांची कोणासोबत दुष्मणी होती का? त्यांनी आत्महत्या करण्याचे इतके प्रबळ कारण काय असावे? त्यांच्यावर कर्ज होते का? सावकारी प्रेशर होते का? अशी अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे, ही तुर्तस आत्महत्या म्हणून घोषित झाली तरी त्यावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे, उद्या काही गोताखोर किंवा काहीतरी उपायोजना करुन पाण्यातून मुंडके काढले जाईल. त्यानंतर त्याचे पोष्टमार्टम होईल आणि वैद्यकीय अहवालात ही हत्या की आत्महत्या या प्रश्नाचे उत्तर मिळेल. त्यामुळे, तुर्तास उद्या मुंढी सापडत नाही. तोवर वेट & वॉच.!