दारु विक्रेत्याकडून पोलिसांची आई व भाऊ रक्तबंबाळ, पाच जखमी, पोलिसांचेच कुटूंब असुरक्षित.! अकोल्यातील घटना.!
जागेहून वाद झाल्याच्या कारणाहून एका दारु विक्रेत्याने पोलीस कर्मचार्याच्या आईला व भावाला चक्क रक्ताचे स्नान घातले आहे. यात त्याच कुटूंबातील पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना अकोले तालुक्यातील अगस्ति साखर कारखान्याच्या लागत ऐन दसर्याच्या दिवशी घडली. यात विशेष म्हणजे खुद्द सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे याचे निवास अवघ्या हकेच्या अंतरावर आहे. मात्र, पोलीस ठाण्यात जाऊन देखील संबंधित मातेची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. म्हणजे, माळेझाप येथे एकाच घरात दोन पोलीस तरी त्यांच्या घरात चोरी होते आणि आरोपी सापडत नाही, विठे येथे पोलिस अधिकार्याच्या घरी चोरी होते. मात्र, चोर सापडत नाही आणि आता असे हल्ले.! त्यामुळे, अकोल्यात खुद्द पोलीस तरी सुरक्षित आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कारखाना रोड परिसरात एक रत्नपारखी कुटुंब राहायला आहे. एकदम शुन्यातून स्वत:चे अस्तित्व निर्माण केल्यानंतर तेथील एक तरुण पोलीस खात्यात नोकरीला लागला. तो नगर जिल्ह्यात कार्यरत असून घरी आई आणि भाऊ आपली गुजराण करीत असतात. त्यांच्याच परिसरात काही लोक दारु विक्रीचा व्यवसाय करातात. याची अकोले पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांना माहिती नाही असे जर कोणी म्हणत असेल तर अन्य काही पुरावे या युक्तीवादास उत्तर म्हणून पुरक आहेत. मात्र, यांच्या बाबत वारंवार तक्रारी होऊन देखील अर्थपुर्ण मलिद्यापोटी यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे, वर्दीला खिशात घेऊन आम्ही फिरतो अशी त्यांची मिजास असते. त्याचा परिणाम अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये होताना दिसून येत आहे.
आता या रत्नपारखी कुटुंबाने संबंधित दारु विक्री करणार्या व्यक्तींना विनंती केली होती की, तुमच्या मयत आजीची समाधी तुम्ही येथे बांधु नका. रस्त्याच्या बाजुने त्याची विटंबना होऊ शकते. खरकटे पाणी वैगरे पडू शकते. उद्या वाद होण्यापेक्षा थोडी जागा बदलुन घ्या, त्याची आम्हालाही अडचण होऊ शकते. त्यामुळे, या शुल्लक कारणाहून दोन गटात बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे रुपांतर थेट धक्काबुक्की पर्यंत गेले. त्यानंतर हा वाद ऐन दसर्याच्या दिवशी अकोले पोलीस ठाण्यात गेला. दोघांना समज म्हणून त्यांचे अदखलपात्र गुन्हे नोंदुन घेतले आणि त्यांना सायंकाळी घरी काडून दिले होते. मात्र, यांच्यात कोणत्याही प्रकारचा सलोखा झाला नाही. घरी जाताच दोन गटांच्या महिला एकमेकांना भिडल्या आणि त्यांनी शिविगाळ, दमदाटी सुरू केली.
दरम्यान, हा वाद इतक्या विकोप्याला गेला की, दारु विकणार्यांनी त्यांची मुजोरी कायम ठेवली आणि त्यांनी थेट लाठ्या काठ्या घेऊन रत्नपारखी कुठूंबावर हल्ला केला. जेव्हा हा प्रकार घडला होता तेव्हा अक्षरश: रक्ताळलेल्या अवस्थेत काही तास संबंधित महिला आणि तिचा मुलाग पोलीस ठाण्यात बसला होता. मात्र, त्यांची तक्रार घेतली नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मात्र, वास्तवत: त्यांना दवाखाना मेमो देण्यात आला असता त्यांना सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता लक्षात आले की, त्यांना जास्त मार लागलेला होता. त्यामुळे, डॉक्टरांनी त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. आता सरकारी यंत्रणेच्या नादी लागून आपला जीव जाईल हे लक्षात आल्यानंतर जखमींनी थेट डॉ. भांडकोळी हॉस्पिटल गाठले. आता त्यांचा प्रकृती चांगली आहे. मात्र, डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पोलिसांना एमएलसी दिली आहे. अद्याप कोणीही त्यांचे जबाब घेण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे, या पोलीस कुटुंबाला पोलीस न्याय देतील का? की अवैध धंद्यावाल्यांना अभय देतील? हेच पाहणे महत्वाचे आहे.
कर्दनकाळ म्हटलं की हसू येतं.!
अकोले तालुक्यात रोज एक चोरी दाखल होत आहे. ही अतिशयोक्ती नव्हे.! माहिती घ्यावी हे वास्तव आहे. खरंतर चोर येथे अकोलेकरांचे रोज मस्त दिवाळं काढत आहे. मात्र, त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस अपयशी ठरताना दिसतात. चितळवेडे येथील माऊली आरोटे यांच्या घरील चोरी, पोलीस कर्मचारी मंडलिक यांच्या घरील चोरी, येसरठाव येथील खून ह्या अगदी अलिकडच्या घटना आहेत. तरी रोज चोर्या होत आहे. आता तर खुद्द अवैध धंदे करणारे पोलिसांच्या कुटुंबावर हल्ला करत आहेत. त्यामुळेे, मी गुन्हेगारांचा कर्दनकाळ असा शब्द कानावर पडला तरी बोलाचा भात आणि बोलाची कढी असेच प्रतिउत्तर मिळत आहे.