शिवसेना विधानसभा उमेदवाराच्या मुलाकडून शेतकर्‍याच्या मुलास गजाने मारहाण.! अमित साहेबराव नवलेसह दोघांवर गुन्हा.!


सार्वभौम (संगमनेर):-

       भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने उत्तर प्रदेशातील लखमीपुर खिरी येथे शेतकर्‍यांच्या अंगावर बेछुट वाहन चालविली. त्यात 8 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. हे प्रकरण ताजे असताना संगमनेर तालुक्यात शिवसेनेचे तत्कालिन उमेदवार साहेबराव नवले यांच्या पुत्राने एका शेतकर्‍याला चक्क गजाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार अनेक माध्यमांकडून दाबला जात असला तरी संगमनेर ग्रामीण पोलिसांनी तो निर्भिडपणे दाखल करुन अशा घटनांना जरब बसविली आहे. केवळ वाहनाचा अपघात झाला, त्याची नुकसान भरपाई दिली नाही म्हणून योगेश सोपान घुले (वय 30 रा. कौठे धांदरफळ, ता. संगमनेर) या शेतकरी तरुणास लोखंडी गजाने मारहाण केली. याप्रकरणी अमित साहेबराव नवले (रा. विठ्ठलनगर, ता. संगमनेर) व रविंद्र सोपान थोरात (रा. वडगाव पान, ता. संगमनेर) अशा दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


याबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी की, योगेश घुले हा तरुण नवले दुध डेअरी धांदरफळ बु येथे गेल्या पाच वर्षापासून वाहन चालक म्हणून कार्यरत आहे. तो शनिवार दि.9 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दुधाची गाडी घेऊन मालेगाव (जि. नाशिक) येथे गेला होता. तेथे दुध पोहच केल्यानंतर त्यांच्या गाडीच किरकोळ अपघात झाला होता. मात्र, तरी देखील तो प्रकार तेथे सॉल करुन घुले माघारी परतला होता. तो दुध डेअरीवर आला असता तेथे त्याला आरोपी अमित साहेबराव नवले हा भेटला. तेव्हा त्याने मालेगाव येथे झालेल्या अपघाताबाबत जाब विचारला. तेव्हा घुले म्हणाले की, तिकडे पाऊस फार पडत होता. त्यामुळे, गाडीचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे किरकोळ अपघात झाला होता.

किरकोळ अपघात म्हणताच अमित नवले याला राग आला आणि त्याने जवळच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून एक लोखंडी गज उचलला आणि डावे हातावर आणि डाव्या पायावर मारहाण केली. तर आरोपी रविंद्र सोपान थोरात याने घुले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ दमदाटी केली. गाडी दुरूस्त करुन दे.! नाहीतर खर्च दे.! असे म्हणत मारहाण करुन खर्च मागत होते. त्यानंतर या मुलास त्यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती त्यांच्या आईस मिळाली असता त्यांनी संबंधित प्रकार थेट सोशल मीडियासोमोर सांगून तो व्हिडिओ व्हायरल केला. काही वेळात संगमनेर आणि नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा प्रकार माहित झाल्यानंतर प्रशासनाने देखील त्याबाबत चौकशी केली.


दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर मुलाच्या हातातून रक्त निघत होते. पायाला देखील लागलेले होते. त्यामुळे, त्याच्या आईने त्यास तत्काळ पोलीस ठाण्यात नेले. मात्र, कायदेशीर दृष्ट्या पोलिसांनी मेडिकल मेमो दिल्यानंतर त्यास घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय संगमनेर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर घुले यांनी संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांनी त्यांचे सोपस्कार पार पाडले असून यात एक दिवसात जामीन मिळेल अशा पद्धतीचा गुन्हा असल्याने फार काही कारवाई होईल असे नाही. मात्र, यात देखील शिक्षेची तरतुद आहे. पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता गुन्हा दाखल केल्याने संगमनेर ग्रामीण पोलिसांचा कारभार हा शहराप्रमाणे नाही, असा प्रकारच्या पोष्ट सोशल मीडियावर फिरत होत्या.

दरम्यान, देशात प्रस्तापित राजकारणी आणि त्यांचे पुत्र काय करीत आहे. हे सांगताने शिवसेनेचे नेते देखील मोठमोठी भाषणे ठोकताना अगदी कालच (भारत बंदमध्ये) पाहिली. त्यामुळे, खरोखर एका विधानसभेच्या प्रबळ उमेदवाराच्या मुलाने अशा पद्धतीने आपल्या कर्मचार्‍यांना मारहाण करावी. हे फार दुर्दैव आहे. एकीकडे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने उत्तर प्रदेशातील लखमीपुर खिरी येथे शेतकर्‍यांच्या अंगावर बेछुट वाहन चालवितो आणि दुसरीकडे साहेबराव नवले यांच्यासराख्या प्रतिष्ठीत राजकारणी तथा उद्योजकाच्या मुलाने अशा पद्धतीने वागणे हे अनेकांना न पटण्यासारखे आहे. त्यामुळे, आज दिवसभर या घटनेचा निषेध सोशल मीडियावर सुरू होता. तर जेव्हा जखमी व्यक्तीशी रोखठोक सार्वभौमच्या प्रतिनिधिंनी संपर्क साधला तेव्हा हे कुटुंब प्रचंड घाबरलेले दिसून आले. त्यामुळे, यांना खर्‍या अर्थाने सपोर्ट आणि संरक्षणाची गरज असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.