सावकारी असहाय्य मृत्यू.! संगमनेर बस स्थानकात बसमध्येच गळफास.! मृत्युनंतर पैसे येतील ते त्यांना द्या.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील बस स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, बस स्थानकात उभ्या असणार्या गाडीतच बस चालकाने गळफास घेऊन आपली जीवणयात्रा संपविल्याचे आज मंगळवार दि. 21 रोजी पहाटेच्या सुमारास लक्षात आले आहे. सुभाष शिवलिंग तेलोरे (वय 42, रा. कोल्हार कोल्हुबाई ता. पाथर्डी. जि. अ.नगर) असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. ही आत्महत्या सावकारांच्या कर्जाला कंटाळून केल्याचे समोर येऊ लागले आहे. तर तोलोरे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यात म्हटले आहे की, माझ्या मृत्युनंतर जे काही पैसे मिळतील ते माझ्या घरच्यांना द्या मग ज्याचे हातउसणे घेतले होते. ते त्यांना देऊन टाकतील. अशा या धक्कादायक प्रकारामुळे, सावकरीपेशा आणि सरकारी कर्मचार्यांवर तोडक्या पगारामुळे येणारा ताण तणाव, वाढीव ड्युट्या, अल्प मोबदला, लांब पल्ल्याची वाहन क्षमता, तोडक्या पगाराने कुटुंबाची होणारी ताणाताण, व्यसनाधीनता आणि आरोग्य असे अनेक विषय पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.
याबाब सविस्तर माहिती अशी की, सुभाष शिवलींग तेलोरे हे मुळ पाथर्डी तालुक्यातील रहिवाशी आहेत. त्यांचे एक बंधू नगर येथील बस डेपोत अधिकारी पदावर आहेत. तर घरी चांगली शेती असून दोन मुले, पत्नी आणि आई असा परिवार आहे. काल सोमवार दि. 20 रोजी ते नियमित प्रमाणे कामावर हजर झाले होते. पाथर्डी ते नाशिक असा त्यांचा प्रवास असल्याने त्यांनी काल एम.एच.14 बी. टी 4887 ही गाडी आपल्या ताब्यात घेतली आणि ते मार्गस्त झाले. खरंतर डोक्यात इतका तणाव असून देखील आपल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात जायला नको. त्यामुळे, त्यांनी दिवसभर सावध रितीने गाडी चालविली. आपल्या वैयक्तीक आयुष्याचा ट्रेस त्यांनी कोठेही आपल्या कामात दाखविला नाही. त्यामुळे, तेलोरे यांच्या सोबत असणार्या वाहकाच्या देखील लक्षात आले नाही की, चालक प्रचंड तणावात आहे.
खरंतर तेलोरे यांनी पाथर्डी तालुक्यातील आणि अन्य मित्रांकडून सहा लाख रुपये हातऊसणे पैसे घेतले होते. त्यांना वायदे करुन करुन आता ते देखील दमले होते. मात्र त्यांच्याकडून वारंवार होणारे त्रास आणि स्वत: पैसे घेऊन देखील ते आपण देऊ शकत नाही. याची खंत त्यांना होती. त्यामुळे, तेलोरे हे प्रचंड तणावाखाली होते. दरम्यान, रात्री त्यांची बस संगमनेर स्थानकावर येऊन थांबली होती. त्यांनी काही काळ तेथे आराम केले. त्याच्या सोबत असणारा व्यक्ती देखील गाडीत मागच्या शिटावर झोपला होता. पहाटे सोबत असणारा व्यक्ती नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेला असता तितक्यात तेलोरे यांनी एकांत पाहून गाडीतच स्वत:ला संपवुन घेतले.
दरम्यान पहाटे 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास जेव्हा त्यांचे सोबती जावळे हे गाडीत आले तर त्यांनी घडलेला प्रकार समोर पाहिला. अगदी काही वेळापुर्वी सोबत असणारा व्यक्ती गाडीच्या छतावर लटकतो आहे. हे पाहिल्यानंतर त्यांना धडकी भरली. त्यांनी हा प्रकार तेथील काही व्यक्तींना सांगितला असता अनेकांनी गाडीत जाऊन तेलोरे यांच्याकडे पाहिले असता ते तोवर मयत झाले होते. त्यानंतर हा प्रकार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कळविण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात म्हटले आहे की, मी मेल्यानंतर मला शासनाकडून जी काही रक्कम मिळेल. ती माझ्या घरच्यांकडे द्या. मी ज्यांचे-ज्यांचे पैसे घेतले आहेत. ते त्यांचे पैसे देऊन टाकतील. अशा या सुसाईट नोटने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आता, एकतर सावकरी व्यक्तींकडून पैसे घेणे हेच मुळात चूक आहे. मात्र, सरकारने जर तत्काळ कर्ज उपलब्ध करून दिले तर सामान्य मानसांना अशा पद्धतीने कोणाच्या पायावर मस्तक ठेवण्याची गरज पडणार नाही. तत्काळ आपली गरज भागली पाहिजे हा हेतू व्यक्तीचा असतो. तर जर सावकार तथा कोणी वेळेवर पैसे दिले नाही तर गरजवंतांची गरज भागणार नाही. कोरोनाच्या काळात ना सरकार होते का मित्र परिवार, ना बँका कर्ज देत होते ना नातेवाई. अशा वेळी हजारे आणि लाखो रुपयांची दवाखाण्यातील बीले भरणार तरी कसे? असा प्रश्न असताना अनेकांनी सावकरांकडून कर्ज घेतले होते. म्हणजे, द्यावे तरी चुक आणि नाही द्यावे तरी हाल. त्यामुळे, सावकारी म्हणजे मोठ्या अडचणीत सापडलेला विषय आहे. काही झालं तरी, सावकारांनी पैसे घेणार्यांच्या बोकांडी बसू नये. सध्या अकोले तालुक्यात राजकीय सावकारी ही फार मोठ्या प्रमाणात बोकाळली असून त्याबाबत खर्या अर्थाने आवाज उठविणे गरजेचे आहे. या लोकांचे अवाजवी व्याजदर आणि यांच्याकडून प्रचंड हरॅशमेंट होताना दिसत आहे. विशेष म्हणजे यांच्याकडे फार मोठे रोजगार उपलब्ध होत आहे. कारण, व्याजाचे पैसे जमा करण्यासाठी अनेक मुलांना यांनी रोजाने काम दिले आहे. इतके महाण काम ही लोक करीत आहेत. फक्त लोकांनी आत्महत्या करोस्तोवर त्यांच्या मागे लागू नये.! हीच अपेक्षा.!