अ‍ॉनलाईन सेक्सच्या नादात 15 विद्यार्थांवर हनीट्रॅप.! कॉलेजची तरुणी म्हणून फेसबुकवर मैत्री आणि नंतर अश्लिल व्हिडिओ व्हायरल.!

    


सार्वभौम (अकोले) :- 

              ऑनलाईन सेक्स करण्याच्या नादात अकोले व संगमनेर तालुक्यातील 10 ते 15 विद्यार्थी आणि अनेक तरुण एका तरुणीच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकारणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्या असून अद्याप हा अ‍ॅपलाईन हनीट्रॅपचा प्रकार सुरूच असल्याने अनेक तरुणांची फसवणूक होत आहे. जोवर पीडित व्यक्ती समोरच्या तरुणीस हवे तितके पैसे टाकत नाही. तोवर त्यास ब्लॅकमेल करुन त्याचा काढलेला अश्लिल व्हिडिओ त्याच्या फ्रेन्डला सेंड केले जातात. त्यामुळे, कोणी पैसे देते तर कोणी हा अनैतिक प्रकार गप गुमान सहन करीत आहेत. त्यामुळे, पोलिस केवळ सायबर तक्रारी दाखल करुन घेतात आणि पुढे त्याचे काहीच होत नाही. एकीकडे पैसे जात आहेत तर दुसरीकडे इज्जतीचा पंचानामा होत आहे. त्यामुळे, अशा व्यक्तींचा शोध घ्यावा. अशी मागणी पीडित तरुणांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपुर्वी अकोले संगमनेरात ही प्रतिष्ठीत व्यक्तींवर काही महिलांना हनीट्रॅप केले होते. हे प्रकरण मिटते कोठे नाहीतर आता ऑनलाईन सेक्स करण्याचा फंडा पुढे आला आहे. हे प्रकरण इतक्या प्रकर्षाने मांडण्याचे कारण इतकेच की, यात अनेक विद्यार्थी अडकत आहेत. कारण, ही तरुणी अकोले शहरातील एका मोठ्या कॉलेजची विद्यार्थीनी आहे. असे भासवून तसे फेसबुक स्टेटसच्या माहितीत टाकले आहे. त्यामुळे, इतकी सुंदर मुगली आणि ती आपल्या कॉलेजला होती म्हणजे अकोल्यातीलच असणार. त्यामुळे, अनेक तरुण तिची फ्रेंन्ड रिक्वेस्ट स्विकारतात. काही काळ फेसबुक मेसेंजरवर हाय हॅलो होते. आणि नंतर बोलता-बोलता व्हाटसअ‍ॅप मोबाईला मागितला जातो.

दरम्यान, फेसबुकची मैत्री व्हाटसअ‍ॅपवर आल्यानंतर तेथे रंगिला गप्पा होतात आणि लागेच आय लाव यू किंवा मीस यू अशा प्रकारचे मेसेज येतात. कालांतराने हे प्रकारण थेट व्हिडिओ कॉलवर जाते. आता आयता मासा सापडतो त्यामुळे, समोरची व्यक्ती पुर्णत: नग्न होते आणि हीच अश्लिलता तरुणाच्या अंगलट येते. जेव्हा हा सर्व प्रकार सुरू होतो. तेव्हा या तरुणाचा व्हिडिओ कॉलमध्ये चेहरा दिसतो. त्यामुळे, त्याचे मुंडके वगळता खालचे शरिर पुर्णत: नग्न करण्याचे एक अ‍ॅप आहे. त्यानुसार ते एडिट केले जाते. परिणामी तरुणीची अश्लिलता पाहता-पाहता याचा देखील असाच व्हिडिओ तयार होतो. मात्र, हे या तरुणाच्या लक्षात येत नाही. सर्व काही चित्रफित तयार झाल्यानंतर या तरुणाचे जरी समाधान झाले असले तरी जो काही खरा प्रकार होतोे. तो काही वेळानंतर. मग त्याचा चेहरा खर्‍या अर्थाने पाहण्यासारखा असतो. 

हा कॉल झाल्यानंतर काही वेळातच एका फोनहून त्याला फोन येतो. तुझा आम्ही एक व्हिडिओ काढला आहेत. तो डिलीट करण्यासाठी आम्हाला एक लाख रुपये द्यावे लागतील. अन्यथा तुझ्या फेसबुकमध्ये जे काही तुझे मित्र आहेत. त्यांना तो पाठविला जाईल. त्यानंतर काही काळात हे ब्लॅकमेरल त्याच्या काही मित्रांना मेसेंजरमध्ये हा व्हिडिओ देखील सेंड करतात आणि त्याचा स्क्रिनशॉट पीडित व्यक्तीच्या व्हाटसअ‍ॅपवर सेंड करतात. तेव्हा खर्‍या अर्थाने काही वेळापुर्वी गुलक्या टाकणारा हा विद्यार्थी/तरुण हा प्रचंड तणावाखाली जातो. कोठून कसे का होईना.! हा तरुण हजारो रुपयांची तजबिज करतो. जितके शक्य आहे. तितके पैसे तो फोन पे किंवा गुगल पे वर सेंड करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरी देखील संबंधित तरुणीची भूक भागत नाही. तेव्हा बदनामी पोटी कोणी आत्महत्या करतो तर कोणी प्रचंड तणावाखाली जातो.

आता जी कोणी व्यक्ती समोरून नग्न होते. ती खरंतर एक तयार केलेली अश्लिल व्हिडिओ आहे. त्यामुळे, अशा अमिषाला कोणी बळी पडू नका. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, हे लोक काही करत नाही. त्यामुळे, हजारो आणि लाखो रुपये देण्याच्या भानगडीत पडू नका. कितीही धमक्या आल्या तरी त्यांना बळी पडू नका. ते अनेक फोनचा वापर करतात, त्यामुळे, येणारे प्रत्येक फोन नंबर ब्लॅक करा. संबंधित तरुणीला फेसबुकहून ब्लॅक करा. घडलेला प्रकार आपल्या मित्रांशी शेअर करा आणि अशा व्यक्तीला बळी पडू नका. असे सांगा. तसेच न घाबरता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. विशेष म्हणजे आयुष्य संपविणे किंवा तणावर जगण्याचा मार्ग स्विकारु नका.

अकोले संगमनेरसह संपुर्ण महाराष्ट्रात असे प्रकार सुरू आहेत. एक सामाजिक हित म्हणून बातमीच्या स्वरुपातून आपल्याला जागे करण्याचे काम केले आहे. अशा प्रकरणात अनेक तक्रारी दाखल आहेत. मात्र, हे लोक बाहेर राज्यातील आहेत, त्यांच्याकडे अनेक मोबाईल आहे. ते ही सर्व यंत्रणा एका जंगलातून चालवितात, हे हाय प्रोफाईल क्राईम आहे. यांना पकडणे शक्य नाही. अशा प्रकारची उत्तरे पोलिसांकडून येतात. त्यामुळे, गुन्हेगार पोलिसांच्या किती पुढे आहे. याचे दर्शन होते. या प्रकारामुळे, तरुणांचे आयुष्य बरबाद होत असून या टोळीचा शोध सायबर पोलिसांनी घेतला पाहिजे. अशा प्रकारची प्रतिक्रिया या घटनेतील पीडित एका महाविकास आघाडीत असणार्‍या एका पदाधिकारी प्रतिष्ठीत तरुणाने दिली आहे.