डॉ. योगेश निघुते यांचा जामीन फेटाळला.! कोणत्याही क्षणी अटक होणार.! कोणते मुद्दे घातक ठरले.!


सार्वभौम (संगमनेर) :-

संगमनेर शहरातील बालरोगतज्ञ डॉ. योगेश निघुते यांची पत्नी डॉ. पुनम यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्पुरता जामीन मिळालेल्या डॉ. योगेश यांना न्यायालयाने चांगलाच धक्का दिला आहे. आज सोमवार दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे, आता पोलिसांनी ठरविले तर डॉ. योगेश निघुते यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तर त्यांना शोधण्यात अपयश आले तर, डॉ. निघुते यांना उच्च न्यायालय औरंगाबाद येथे पुन्हा जामीन टाकण्यात वेळ मिळणार आहे. त्यामुळे, आता पोलीस त्यांचा शोध घेतात की, आता हायकोर्ट त्यांना दिलासा देते याकडे संपुर्ण संगमनेरचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, जेव्हा डॉ. निघुते यांचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला. तेव्हा त्यांना पोलीस कोठडीची काही गरज नाही असे त्यांच्या बचावासाठी युक्तीवाद करण्यात आला होता. मात्र, फिर्यादी शरद कोलते यांच्या वतीने अ‍ॅड. आनंदसिंह बायस व अ‍ॅड. राजु बबन खरे तसेच सरकारी वकील अ‍ॅड. गौते यांनी प्रबळ युक्तीवाद केला होता. त्यामुळे, डॉ. निघुते यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या महत्वाच्या आदेशात म्हटले आहे की, या गुन्ह्यात 306 व कलम 498 (अ) या गुन्ह्यांचे स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. त्यांनी दिलेल्या कारणांची चौकशी करणे आवश्यक आहे. फिर्यादी पक्षाकडून जे काही कॉल डिटेल्स दिले आहे. त्याची चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच घरात डॉक्टर आणि त्यांची पत्नी यांचे जे काही वाद झाले होते. ते सीसीटीव्हीमध्ये आलेले आहे. त्यामुळे, प्रथमदर्शनीय विचार करता त्याच कारणाने डॉ. पुनम निघुते यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, त्याची चौकशी होणे आवश्यक आहे.

दरम्यानच्या काळात या गुन्ह्याचा युक्तीवाद करणारे पाहिले सरकारी वकील बदलुन अ‍ॅड. गौते यांची नियुक्ती करण्यात आली होती. मयत व्यक्तीला पैशासाठी दबाव टाकल्याचे दिसते आहे. त्याची चौकशी व्हावी, तर पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर दाम्पत्याला आठ वर्षाचा मुलगा असून तोच खर्‍या अर्थाने महत्वाचा व्यक्ती आहे. तो डॉ. निघुते याच्या ताब्यात असून त्या मुलाकडे चौकशी करणे आहे. डॉ. निघुते हा संगमनेर शहरातील एक नामांकीत डॉक्टर असून तो तपास करताना साक्षिदार आणि अन्य यंत्रणेवर प्रेशर आणू शकतो. अशा प्रकारे काही मुद्दे सरकार पक्षातर्फे मांडण्यात आले होते. हा सर्व युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा सत्र न्यायाधिश एस. वाय. भोसले यांनी डॉ. योगेश निघुते यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.  

आता पुढे काय.! 

आता जिल्हा सत्र न्यायालयात जामीन फेटाळल्यानंतर डॉ. निघुते यांना येथील सत्यप्रत कॉपी घेऊन थेट हायकोर्ट औरंगाबाद येथे अपिल करावे लागणार आहे. किंवा त्यांनी पोलिसांना सरेंडर होऊन न्यायालयात हजर झाल्यानंतर पोलिसांची पुढे कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावताच जामीन अर्ज टाकला तर न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना जामीन मिळू शकतो. अन्यथा हायकोर्टानंतर पुन्हा सुप्रिम कोर्टात देखील डॉ. निघुते यांना दाद मागता येते.त्यानंतर देखील जर ते हजार झाले नाही. तर त्यांच्या संपत्तीवर न्यायालय गदा आणू शकते. त्यामुळे, आता डॉ. निघुते काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


काय आहे प्रकरण.!                        

संगमनेर शहरातील बालरोग तज्ञ योगेश यशवंत निघुते (रा. चिरायु हॉस्पिटल ताजणे मळा, संगमनेर) यांच्या सौभाग्यवती डॉ. पुनम निघुते यांनी रविवार दि. 29 आँगस्ट 2021 रोजी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर डॉ. योगेश निघुते यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. लग्नानंतर पाच ते सहा महिन्यापासून ते 29 आँगस्ट 2019 पर्यंत पुनम यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होते. तर, त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करीत होते. त्यामुळे त्यांनी पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर, पुनम यांचे बंधू शरद कमलाकर कोलते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ. योगेश निघुते यांच्यावर कलम 306, 304 (ब), 498 व 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडी.! 

 जेव्हा पुनम यांनी आत्महत्या केली. तेव्हा, हा घातपात असल्याची शंका त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात सीसीटीव्हीच्या निगरानीखाली शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला होता.त्यात ही आत्महत्याच असल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले होते. या दरम्यान, पीडित मुलीच्या नातेवाईकांनी डॉ. पुनमचे शवविच्छेदन कॉटेज हॉस्पिटल संगमनेर येथे करु नये. असे म्हणत येथील प्रशासकीय यंत्रणेवर अविश्वास दाखविला होता. त्यानंतर थेट निष्पक्ष अहवाल त्यांच्या हाती लागला. तर, गुन्हा घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी असताना डॉक्टर देखील तेथेच होते. तरी देखील योगेश निघुते अचानक पसार कसे झाले? याबाबत अनेकांनी साशंकात उपस्थित केली. म्हणून तर डॉक्टरांना नियम व अटींच्या अधिन राहून नंतर तात्पुरता जामीन मिळाला होता.