आरे देवा! चक्क माजी नगरसेवकावर हनीट्रॅप.! भाऊ बहिनीवर गुन्हा.! अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर.!
सार्वभौम (अहमदनगर) :-
एका महिलेची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे असे म्हणून तिला पाच लाख रुपये दिले. मात्र, कालांतराने प्रेमाची लगट करुन संबंधित व्यक्तीचा त्या महिलेने अश्लिल व्हिडिओ तयार केला. संबंधित महिलेकडे पाच लाख रुपये मागितले असता तीने ब्लॅकमेलींग करण्यास सुरूवात केली. आता पैसे वैगरे काही मिळणार नाही, उलट आम्ही तुझे अश्लिल फोटो घेऊन त्याचा व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर टाकू असे म्हणत दोन व्यक्तींनी पीडित पुरूषाकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. हा व्यक्ती पनवेल (हल्ली, कोडगाव, जि. अ.नगर) येथील माजी नगरसेवक असून त्याच्यावरच हनीट्रॅप झाल्याची धक्कादायक घटना दि. 8 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी दोन व्यक्तींवर (भाऊ बहिन) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपुर्वी पनवेल येथील एक माजी नगरसेवक हे केडगाव परिसरात आले होते. तेव्हा एका महिलेने त्यांच्याशी ओळख केली. त्यानंतर त्यांच्यात सलोख्याची मैत्री झाली असता गोड बोलणे सुरू झाले. यावेळी पीडित व्यक्तीस गंडा घालण्यासाठी आरोपी महिलेने तिच्या भावाचा आधार घेतला. त्याने देखील या माजी नगरसेवकासोबत बोलणे सुरू केले. कालांतराने तो म्हणला की, माझी बहिन फार अडचणीत आहे. तिची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे असे म्हणून प्रांजळ वातावरण निर्माण केले. त्यानंतर एक मदत म्हणून पीडित पुरुषाने तिला पाच लाख रुपये हातउसणे दिले. मात्र, काही दिवसानंतर त्यांच्यात लागट सुरू झाली आणि दोघांमधे घनिष्ठ मैत्री झाली.
दरम्यान, कालांतराने पीडित व्यक्तीने आरोपीला जे काही पाच लाख रुपये दिले होते. ते पुन्हा मागितले असता तीने पैसे देण्यास नकार दिला. जर पैसे मागितले तर मी तुला खोट्या गुन्ह्यात अडकवेल अशी धमकी दिली. तर आरोपी महिलेकडे पीडित मा. नगरसेवकाचे अश्लिल फोटो असल्यामुळे, त्या जीवावर ती उड्या मारत होती. या अश्लिल फोटाचा व्हिडिओ तयार करुन मी सोशल मीडियावर टाकून देईल अशी ती वारंवार धमकी देत होती. त्यामुळे, काय करावे हे पीडित व्यक्तीस कळेनासे झाले होते. एकीकडे पैसे गुंतले तर दुसरीकडे इज्जत टांगणीला लागली होती. त्यामुळे, काही झालं तरी आपले पैसे परत घेण्यासाठी त्यांनी महिलेकडे तगादा लावला. मात्र, धमकी सोडून त्यास काहीच मिळाले नाही.
दरम्यान, ही घटना घटना दि. 8 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडली असली तरी दरम्यानच्या काळात पीडित व्यक्तीच्या गाडीवर जो वाहन चालक आहे. त्याला देखील आरोपी यांनी शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. तर फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन, युनीयक बँकेचे एटीएम, स्टेट बँकेचे एटीएम जबरदस्तीने काढून घेतले. जर हा व्हिडिओ आणि फोटो डिलीट करायचे असेल तर आणखी पाच लाख रुपये दे.! अन्यथा ते सोशल मीडियावर शेअर करुन बदनामी करू. अन्यथा खोटे गुन्हे दाखल करू. या ब्लॅकमेलिंग पद्धतीला वैतागून पीडित व्यक्तीने थेट कोतवाली पोलीस ठाणे गाठले आणि थेट दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रनदिवे करीत आहेत.
दरम्यान, नगर जिल्ह्यात हनीट्रॅपने लोक प्रचंड वैतागले आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी रोखठोक सार्वभौमने ऑनलाईन सेक्स यावर वास्तव लिखाण केले होते. त्यांनी जवळ-जवळ 30 ते 40 मेसेज येऊन त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. पोलीस केवळ तक्रार दाखल करुन घेतात. ना गुन्हा ना आरोपी.! त्यामुळे, तक्रार करुन आणखी इज्जत का घालवायची? अशा प्रकारची मानसिकता पीडित व्यक्तींची होऊ घातली आहे. यात भलेभले राजकारणी, पदाधिकारी एव्हढेच काय.! चक्क पोलीस अधिकारी देखील या प्रकाराचे बळी पडले आहेत. त्यामुळे, घर बसल्या संपुर्ण महाराष्ट्रात पुरूषत्वाला भुरळ घालणार्या या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश येईल का? की असेच हनीट्रॅपच्या माध्यमातून लाखो आणि हजारो रुपयांचे आता लुटमार होत राहणार आहे.!
काय करावे.!
फेसबुकवर अज्ञात व्यक्तीची फे्रन्ड रिक्वेस्ट स्विकारु नका.
फेसबुक मेसेंजरवर अज्ञात तरुणीशी चॅट करु नका.
अॅनलाईन वापरात व्हाटसॅअॅप नंबर कोणाला देऊ नका.
अचानक कोणाचा व्हिडिओ कॉल्स आल्यास तो घेऊ नका.
जर फोन उचलला गेला तर तोंडाला आपल्या रुमाल बांधा.
जरी कोणी आपला एडीट व्हिडिओ करून व्हायरलची धमकी देत असेल तर त्याला पैसे देऊ नका.
संबंधित व्यक्तीला व्हाटसअॅप आणि फेसबुकहून ब्लॅक करा.
हीच माहिती आपल्या मित्रांशी शेअर करा.