अकोल्यात राष्ट्रवादीच्या अध्यक्षाला पक्षाच्या कार्यकत्यांकडून बेदम मारहाण.! आमदारांचा निष्ठावंत ढसढसा रडला.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोल्यात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यपद्धतीचे काय करावे आणि काय नाही.! हेच कळेणासे झाले आहे. पठारावरील काळे यांचा राडा अजून न्यायप्रविष्ठ असताना आता पुन्हा नवीन एक राडा समोर आला आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष यांना त्याच गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे, नेहमी आमदार डॉ. लहामटे साहेबांच्या गाडीत बसणार्या व्यक्तीला जर गैरसमजाच्या शुल्लक कारणाहून बेदम मारहाण होत असेल. तर खरोखर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी आणि अन्य कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याचा गरज आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील विठे येथे आमदार निधीतून 10 लाख रुपयांचा घाट बांधण्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र, यात गुणवत्ता नसल्याचा आरोप झाला आणि इतका छोटा घाट तो ही 10 लाख रुपयांचा असू शकतो का? असा प्रश्न गावातील अनेकांनी उपस्थित केला. त्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील होते. आता हा बोभाटा एका व्यक्तीने आमदार महोदय यांना जाऊन सांगितला. त्यामुळे, साहेबांनी थेट एका व्यक्तीला विचारणा केली. की, तुम्ही या घाटाबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहे, त्यात भ्रष्टाचार झाला अशी कागाळी केली हे खरे आहे का? त्यावर समोरच्या व्यक्तीने विचारणा केली की, तुम्हाला हे कोणी सांगितले? तेव्हा, साहेबांनी ज्याने सांगितले त्याचे नाव सांगून दिले. परिणामी दोन गटात रोष उभा राहिला.
दरम्यान, सोमवारी घडलेला प्रकार पुन्हा गुरूवारी उद्भवला. डॉ. राजुरहून अकोल्याला येत होते. तेव्हा विठ्यात त्यांना अडविले गेले. खरे काय आणि खोटे काय.! याबाबत विचारणा केली गेली. आमदार साहेब नक्कीच भ्रष्ट नाहीत. मात्र, त्यांच्यावर आरोप होत असेल तर त्यांचा पारा तर चढणारच ना.! त्यामुळे, त्यांनी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावली. या दरम्यान, ज्या कार्यकर्त्यांने गावात तथा डॉक्टरांच्या समर्थकांमध्ये जी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. ती त्यांना वैयक्तीक सांगितली होती. मात्र, डॉक्टरांना त्याबाबत गोपनियता पाळता आली नाही. किंवा माहिती देणार्याचे नाव न सांगता मला बाहेरुन अशी माहिती मिळाली हे खरे आहे का? असे विचारले असते तर, हा सर्व प्रकार टळला असता. मात्र, आमदार महोदयांची ती चुक नाही.! तर तो स्वभावच खुला आहे. त्याचा तोटा आता कार्यकर्त्यांना होऊ लागला आहे.
दरम्यान, जेव्हा आमदारांना ज्या व्यक्तीने माहीती दिली. त्या व्यक्तीला विठ्यातील काही कार्यकर्त्यांनी एक बसमधून उतरविले आणि आमदारांना कानमंत्र का दिला? अशी विचारणा केली. त्यानंतर त्याचे काही एक न एकता त्यास जमावाने मारहाण केली. हा प्रकार इतका विकोप्याला गेला की, पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. मारहाण झालेल्या संबंधित व्यक्तीने गुन्हा दाखल करण्यासाठी आपली मानसिकता केली. मात्र, नंतर रात्री गावातील काही व्यक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी या तरुणाची समज काढली. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. मात्र, या घटनेची तालुक्यात प्रचंड चर्चा होती. तर राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, आरपीआय, शेतकरी संघटना यांच्याकडून वारंवार विचारणा होत होती. त्यामुळे, मारहाण झालेल्या व्यक्तीच्या पाठीशी कोणी राहो, ना राहो, तालुक्यातील तरुणांनी याप्रकरणी मारहाण करणार्यांवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, ज्या व्यक्तीला मारहाण झाली आहे. तो राष्ट्रवादीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार व्हावा, तथा डॉ. लहामटे हे निवडून यावेत यासाठी त्याने फार प्रयत्न केले होते. त्यामुळे, विठे गावातून राष्ट्रवादीला मोेठ्या प्रमाणावर लिड आहे. त्यानंतर या तरुणाची सोशल मीडिया सेलच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर हा पदाधिकारी वारंवार आमदारांच्या गाडीत दिसत होता. दुर्दैवाने त्याच्यावर मार खाण्याची वेळ आली आहे. म्हणजे, जर तुम्ही कोणाचे निष्ठावंत कायर्र्कर्ते होऊ पाहत असेल तर हजारदा विचार करा. तुम्ही तीन वर्ष केलेले काम तीन तासात धुळीत मिसळून जाते, इज्जतीचा पंचनामा होतो. त्यामुळे, आजकाल कार्यकर्त्यांना पाठबळ देणारे नेते राहीलेले नाहीत. ना पक्षनिष्ठ कोणाची जिवंत आहे. हे एकनाथ खडसे आणि पिचड कुटुंब यांना दाखवून दिले आहेे. त्यामुळे, कार्यकर्ते नको.! कर्ते व्हा.!