अखेर सहा दरोडेखोर आणि दोन चोरट्यांना ठोकल्या बेड्या.! मोठी पण असमाधानी कारवाई.!
- आकाश देशमुख
सार्वभौम (राजूर) :-
गेल्या दोन महिन्यांपासून अकोले आणि संगमनेर तालुक्यात जवळजवळ 50 पेक्षा जास्त चोरी आणि चेन स्नेचिंगचे प्रकार घडले आहेत. मात्र, पोलिसांकडून त्याचा छडा लागत नसल्याने पोलीस यंत्रणा ही कुचकामी ठरत असल्याची चर्चा सुरू आहे. अकोले आणि राजूर परिसरात रोज दोन ते तीन चोरीचे गुन्हे दाखल होत आहे. मात्र, मोठ्या गुन्ह्यांचा उलगडा काही होताना दिसत नाही. असे असले तरी राजूर पोलिसांनी तब्बल सात दरोडेखोर पकडून समाधानकारक कामगिरी केली आहे. तर अकोले पोलिसांनी देखील दोन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, चितळवेडे, इंदोरी, रुंभोडी, मेहेंदुरी, बहिरवाडी अशा ठिकाणी झालेल्या दरोड्यांची उकल लावण्यात पोलिसांना अपयश आल्याने तालुक्यात नाराजी व्यक्त केली जात आहे. तर अनेकांचे पैसे घेऊन पसार झालेल फसवणुकीच्या गुन्ह्यातील (चिटफंड) मधील आरोपी देखील पोलिसांच्या हाती लागत नाहीत. त्यामुळे, त्यांच्या कार्यक्षमतेवर खरोखर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
यबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जसे लॉकडाऊन लागले होते. तेव्हापासून अनेकांचा रोजगार गेल्याने चोर्यांचे प्रमाण वाढले होते. अनेक दिवसांपासून केवळ गुन्हे दाखल करून ते कामय तपासावर ठेवण्याची परंपरा पोलिसांना चालु ठेवली होती. मात्र, त्याला खंड देत एक मोठी आणि समाधानकारक कामगिरी राजूर पोलिसांनी केली आहे. कारण, राजूर परिसरात वाहणांच्या बॅटर्या व घरगुती वापराचे बंब चोरणारी सात दरोडेखोरांची टोळी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी गजाआड केली आहे. यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाला हस्तगत केला आहे. तर अन्य गुन्हा देखील उघड होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राजूर पोलीस ही रात्री आपल्या हाद्दीत गस्त घालत होते. तेव्हा त्यांना गोपनिय माहिती मिळाली की, सुदाम सखाराम बादड (रा. पाचनई, ता. अकोले) यांने एका ठिकाणी बॅटरीची चोरी करून ती बॅटरी त्याच्या घरात लपवुन ठेवलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घराची घरझडती घेतली. त्यात एक चोरीची बॅटरी मिळुन आली. त्यामुळे, हे काम तो एकटा करु शकत नाही. हे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्यात अन्य सहकार्यांविषयी विचारणा केली. मात्र, याने पोलिसांना उडवाउडविची उत्तरे दिली. मात्र, त्याला पोलीस ठाण्यात आणले असता, पाहे प्रसादाची वाट आणि आमचा रामराम घ्यावा हे पट्ट्याचे बोल बोलले असता तो पोपटासारखा बोलला.
हे कुकर्म करण्यासाठी तो एकटाच नव्हे.! तर त्याने सांगितले की, समिर विठल भारमल (रा. पाचनई, ता. अकोले) अजय उर्फ लाला विष्णु भांगरे, दिलीप विष्णु भांगरे, मचिंद्र बुधा डोंगिरे, मिलींद भिमा मडके, अनिल भिमा मडके (सर्व रा. राजुर, ता. अकोले) यांची देखील मदत होत होती. आता पोलिसांनी त्या दिवशी एक कोंबिंग ऑपरेशनच केले आणि या सर्व गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांनी प्रसाद ग्रहण केले असता सातही जणशंना सांगितले की, आम्ही राजुर परिसरात अनेक चोर्या केल्या आहेत. त्यांच्या कबुलीनंतर मुद्देमालाची विचारणा केली असता त्यांच्याकडून आयशर टेम्पोची बॅटरी, टॅक्ट्ररची बॅटरी, ताब्यांचा बंब, सोलर पॅनलची प्लेट, मारुती व्हॅन असा एकुण 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांचेकडून जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, कैलास नेहे, विजय मुंढे, अशोक गाडे, वाडेकर, फटांगरे, वरपे, ढाकणे, पांडुरंग पटेकर आदि पथकाने केली.
दरम्यान, अकोले शहर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक केली आहे. राजू ठमा मेंगाळ व विलास लक्ष्मण गावंडे (रा. ढोकरी, ता. अकोले) अशी दोघांची नावे आहेत. यांनी अनेक ठिकाणी चोर्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. तर काही ठिकाणी मंदीर चोरी केल्याचे उघड झाले आहे. ही कारवाई सामाधानकारक असली तरी अकोले व राजूर पोलिसांनी चिवळवेढे येथील दरोडा उघड करुन त्यातील मुद्देमाल रिकव्हर करणे हिच त्यांची खर्या अर्थाने कौतुकास्पद कामगिरी राहिल. एकाच दिवशी 14 ठिकाणी दरोडे होणे म्हणजे अकोल्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. तर चोरीच्या हेतून एका महिलाचा जीव देखील गेला आहे. त्यामुळे, हा अतिरेख टाळण्यासाठी पोलिसांनी या चोरांच्या बरोबरीने ते कुख्यात दरोडेखोर जेरबंद करणे फार महत्वाचे आहे. अशा प्रतिक्रिया अकोलेकरांनी दिल्या आहेत.