डॉ. योगेश निघुते दोन दिवस व्हेंटीलेटरवर.! एक तास प्रबळ युक्तीवाद, जामीन मंजूर की नामंजूर.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील डॉ. पुनम निघुते यांच्या आत्महत्येने संपुर्ण तालुक्यात खळबळ माजली होती. हा घातपात नसून हा गळफास आहे. यावर आता शिक्कामुर्तब झाला आहे. मात्र, त्यानंतर देखील पोलिसांनी आरोपी डॉ. योगेश निघुते यास अटक केली नव्हती. या दरम्यानच्या काळात याच संधीचा फायदा घेत डॉ. निघुते यांना कोर्टाकडून तात्पुरता दिलासा दिला होता. मात्र, आज शुक्रवार दि. 18 सप्टेंबर 2021 रोजी त्यांच्या जामिनावर अंतीम सुनावणी झाली आहे. दोन्ही पक्षाच्या वतीने प्रबळ युक्तीवाद करण्यात आले आहेत. हे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या जामीनावरील सुनावणी सोमवार दि.20 सप्टेंबर होईल असे आदेश सुनावले आहेत. त्यामुळे, डॉ. योगेश निघुते हे आणखी दोन दिवस तरी मानसिक दृष्ट्या व्हेंटीलेटवर असणार आहेत. आता एकीकडे तज्ञ वकील अॅड. अतुल आंधळे तर दुसरीकडे विधीतज्ञ आनंदसिंह बायस त्यामुळे तब्बल 1 तास चाललेल्या युक्तीवादाचे फलित काय होते, याची प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे. त्यामुळे सोमवारी या प्रकरणावर काय होईल याची संपुर्ण वैद्यकीय फिल्ड आणि संगमनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे. यात फिर्यादीच्या वतीने अॅड. राजू खरे यांनी देखील मोलाची भूमिका पार पाडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 29 ऑगस्ट 2021 रोजी डॉ. पुनम निघुते यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आणि तालुक्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर डॉ. योगेश निघुते यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांना पोलीस तत्काळ ताब्यात घेतील असे वाटत असताना ते अचानक कोठे गायब झाले. हे असे म्हणतात की, पोलिसांना देखील माहित नाही. त्यामुळे, डॉ. निघुते यांना अटी व शर्तीच्या अधिन राहून तात्पुरत्या स्वरुपाचा जामीन मिळाला होता. आपण निर्दोष कसे आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांना पुरेपुर वेळ मिळाला होता. त्यामुळे, निच्छितच त्यांच्या बाजुने प्रबळ युक्तीवाद अपेक्षित होता. तो झाला देखील. परंतु त्याच तोडीस फिर्यादी पक्षाच्या वतीने देखील काही महत्वाचे पुरावे आणि माहिती न्यायालयाच्या समोर मांडण्यात आले. या नाजुक प्रकरणाला न्यायालयात नक्कीच न्याय मिळेल. यात तिळमात्र शंका नाही. मात्र, त्यासाठी सोमवार पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
फिर्यादी शरद कोलते यांच्या वतीने अॅड. बायस म्हणाले की, डॉ. पुनम ही एक एम.डीचे शिक्षण घेणारी हुशार मुलगी होती. त्यामुळे, तिची आत्महत्या ही संगमनेर तालुक्यातील गंभीर बाब आहे. एकीकडे आरोपी म्हणतो की, डॉ. पुनम ही एक अॅम्बीशन असणारी मुलगी होती. तर दुसरीकडे म्हणतात की, ती डिप्रेशनमध्ये होती. त्यामुळे, त्यांच्यात किती विरोधाभास दिसून येतो आहे असे मत बायस यांनी मांडले. पुनम ही कॉलेज करीत होती, पेशन्ट तपासत होती. हुशार देखील होती. त्यामुळे, ती डिप्रेशनमध्ये कशी असू शकते? वास्तवत: डॉ. योगेश निघुते यांच्याकडून तिला फार हरॅशमेंन्ट होत होती. टॉर्चर केले जात होते. तर प्रचंड प्रमाणात मारहाण केली जात होती. विशेष म्हणजे, पुनमला मारहाण केल्यानंतर तीने तिच्या आईला अनेका सांगितले आहे. तर, मारहाणीनंतर तिला जे काही व्रण उठत होते. त्याचे फोटो देखील ती आईला दाखवत होती. त्यामुळे, जर अशा व्यक्तीला सुट मिळाली तर समाजात वेगळा संदेश जाईल. अशा प्रकारचे लेखी म्हणणे देखील न्यायालयात सादर केले आहेत.
विशेष म्हणजे, संगमनेरसारख्या शहरात एका उच्चशिक्षित व्यक्तीचा जीव जातो आणि तिला न्याय मिळत नाही. हे संदेशच चुकीचा जाऊ शकतो. त्यामुळे, जोवर या गुन्ह्याचा सखोल तपास होत नाही. तोवर आरोपीला जामीन देण्यात येऊ नये. कारण, एका कमी वयाच्या सज्ञान मुलीचा जीव हा आरोपी डॉ. निघुते यांच्या घरात असताना अनैसर्गिक रित्या गेला आहे. त्यामुळे, या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. यात पोलीस यंत्रणेने देखील कोणाच्या दबावाला बळी न पडता तपास केला पाहिजे. जर यात योग्यतो तपास झाला तरच मयत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळू शकतो. आता हीच वेळ आहेे डॉ. पुनम यांना न्याय देण्याची. कारण, आताच सखोल तपास होऊ शकतो. नंतर यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. साक्षिदारांवर दबाव आणला जाऊ शकतो. असा युक्तीवर फिर्यादीच्या वकीलांनी मांडला.
दरम्यान, आरोपीच्या वकीलांनी जामीन मिळण्यासाठी जे काही म्हणणे सादर केले आहे. त्यावर काहीसे भावनिक व सबळ पुराव्यानीशी उत्तर फिर्यादीकडून लेखी स्वरुपात सादर करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, मोठ्या कष्टाने मुलीस वाढवून, तिला डॉक्टर केले हे तिला मरण्यासाठी केले नव्हते. त्यामुळे, डॉ. योगेश निघुते यांच्याकडून जो काही त्रास होत होता. याचे काही पुरावे कोर्टात जमा करण्यात आले आहेत. काही संभाषण देखील न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे, दोन्ही गोष्टी पडताळून पाहिल्यानंतर न्यायदेवता यावर सोमवारी निकाल देणार आहेत.
एकंतर आरोपी पक्षाच्या वतीने अॅड. आंधळे यांनी युक्तीवाद केला. की, डॉक्टर हे फार आदरतित्थ्य व्यक्तीमत्व आहे. संगमनेर शहरातील मोठे डॉक्टर आहेत. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त त्यांचे टर्नओव्हर आहे. लाखो रुपयांचा ते इन्कम टॅक्स भरतात, शहरातील ते प्रतिष्ठीत नागरिक आहेत. त्यांची पत्नी डिप्रेशनमध्ये होती. त्यातुनच तिने आत्महत्या केली आहे. यात डॉ. योगेश निघुते यांची काही एक चुक नाही. आरोपीला पोलीस कोठडीची काही एक गरज नाही. डॉ. योगेश हे कोठे पळून जाणार नाहीत. ते पोलिसांना तपास कार्यात सहकार्य करतील. अशा प्रकारे अॅड. आंधळे यांनी युक्तीवाद मांडला. त्यानंतर दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुण घेतल्यानंतर त्यावर सोमवारी निर्णय होईल असे आदेश दिले आहेत. त्यामुळे, आता जामीन मंजूर की नामंजूर यासाठी 48 तासाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.