तलाठी झुरळे आणि कोतवाल तांबे लाचलुचपतच्या जाळ्यात.! शेतकऱ्याला लुटताना रंगेहाथ पकडले.! दोघांना ठोकल्या बेड्या.!
सार्वभौम (संगमनेर) :-
वारसा हक्काची नोंद करण्यासाठी तलाठी व कोतवाल अशा दोघांना चार हजार रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज शुक्रवार दि. १७ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला. यात तलाठी स्वाती बबनराव झुरळे व कोतवाल संदिप लक्ष्मण तांबे (रा. निमगाव जाळी, ता. संगमनेर) या दोघांना नाशिक लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. लाचखोर तांबे याने रक्कम स्विकारली आहे. तर, ही रक्कम तलाठी बाई यांची असल्याचे त्याने सांगितले आहे. त्यामुळे, महसुल मंत्र्यांच्या तालुक्यात अशा पद्धतीने लाचखोरी होणे. ही राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी आता दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची संपत्ती, बँक खाते, घरझडती यासाठी पुढील प्रक्रिया सुरु केली आहे. यात दोघांवर संगमनेर तालुक्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर, जेव्हापासून पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे यांनी नाशिक लाचलुचपत विभागाचा पदभार घेतला आहे. तेव्हापासून भल्याभल्या लाचखोर भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे, मालेगावचा कोरोना नष्ट करण्यात कडासणे यांनी सिंहाचा वाटा उचलला तसेच भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणून त्यांची ख्याती झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, निमगावजाळी येथे एका तक्रादाराच्या नातेवाईकाच्या वारस हक्काची नोंद करायची होती. त्यामुळे, तक्रारदार तलाठी कार्यालयात वारस हक्काची नोंद करण्यासाठी वारंवार चकरा मारत होता. परंतु, रोज नवे कारण सांगुन तलाठी बाईसाहेब या नोंद करण्यास टाळाटाळ करत होत्या. ती वारसहक्काची नोंद करण्यासाठी लाचखोर स्वाती झुरळे व तिचा हस्तक लाचखोर संदिप तांबे यांनी तक्रादाराकडे 4 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रादार म्हणाले की, ज्यांच्या नावावर जमीन आहे फक्त त्यांच्या वारस हक्काची नोंद करायची आहे. त्यात पैसे कशासाठी द्यायचे? मात्र, ऐकतील ते तलाठी कसले? त्यांनी 4 हजार रुपयांसाठी कोतवाल मध्यस्ती घातला. त्यामुळे, पुन्हा या पैश्यांची मागणी केली. मात्र, तक्रारदार यांच्या वारंवार मागणीला वैतागल्याने त्यांनी थेट नाशिक लाजलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर आज दुपारी त्यांनी थेट संगमनेर गाठले.
दरम्यान, तक्रादार हे त्यांच्या मतावर ठाम होते. त्यामुळे, जसा लाजलुजपत विभागाने सापळा पडला असता कोतवलाची झाडाधडती घेतली असता त्यांच्याकडे 4 हजार रुपये आढळुन आले. यावेळी पांडे आणि झुरळे यांच्या मागणीनुसार जे काही घडले, त्यानुसार सापळा रचुन या दोघांना लाचलुचपतच्या पथकाने बेड्या ठोकल्या. आज दुपारी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू होती. यात आणखी कोण आहेत का? यांनी यापुर्वी कोणाकडे अशा प्रकारची मागणी केली आहे का? यांच्या घरात तसेच बँकेत किती मालमत्ता आहे. आशा प्रकारची पुढील कारवाई सुरू झाली आहे. संगमनेर तालुक्यात किती भ्रष्टाचार बोकाळला आहे. याची प्रचिती आता येऊ लागली आहे. पोलीस खात्यात अधिकाऱ्यांपासुन ते कर्मचाऱ्यांपर्यंत लाजलुजपतचे छापे आपल्याला पाहायला मिळत आहेत. येथील हप्तेखोरीवर अनेकदा अधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच काय! सर्कल पासुन ते तलाठी यांच्यावर कितीवेळा ट्रॅप होताना दिसत आहे. तर मागील दोन महिन्यांपूर्वी वन खात्यातील अधिकारी विशाल बोऱ्हाडे यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले होते. म्हणजे, या वर्षात जिल्ह्यत संगमनेर लाजलुजपतच्या रडारवर दिसले आहे.
दरम्यान, जेव्हापासून पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे यांनी नाशिक परिक्षेत्राचा पदभार घेतला आहे. तेव्हापासून खऱ्या अर्थाने लाचलुचपत या विभागास उर्जीत अवस्था आली आहे. त्यांच्या काळात सामान्य लोकांचा लाचलुचपत विभागावरील विश्वास वाढला आहे. लोक निर्भिडपणे तक्रारी घेऊन पुढे येत आहेत. खरंतर, अधिकारी हे आपल्या सेवेसाठी असतात. मात्र, शुल्लक कामांचे लाखो रुपये घेऊन लोकांना वेठीस धरले जाते. त्यामुळे, कोणीही अशा प्रकारे लाच न देता. थेट लाचलपचपत विभागाकडे तक्रार केली पाहिजे. जे कोणी अशा पद्धतीने पुढे येतात त्यांचे कडासणे साहेबांनी कौतूक केले असून लच देऊ नका, थेट तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जसे नाशिक आणि नगरचे पोलीस उपाधिक्षक खेडकर हे काम करीत आहे. तसे राज्यात काही ठिकाणी लाचलुचपत विभाग काम करताना दिसून येतो आहे. विशेष म्हणजे मुंबई येथे लचलुचपत विभागाचे पोलीस महानिरिक्षक लखमी गौतम यांनी देखील कोट्यावधी रुपयांचे सापळे यशस्वी केले आहेत. तर, मुंबईतील आरे ट्रॅप तसेच परभणीचा डिवायएसपी ट्रॅप अशा अनेक कारवायांनी राज्यात लाचलुचपत विभागाची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे, असे निर्भिड अधिकारी पोलीस खात्याला लाभणे म्हणजे वर्दीचे भाग्यच मनावे लागेल.