प्रेमात जात आडवी आली, लग्न नाही तर जगणे नाही, प्रियसिने घेतले औषध.! प्रियकरावर ठोकला बलात्काराचा गुन्हा.!


 सार्वभौम (संगमनेर) :- 

                             दिल्ली आणि मुंबई प्रमाणे नगर जिल्ह्यात देखील अत्याचाराच्या भयानक घटना समोर येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे, राज्यात गुन्हेगारीत अव्वल स्थानी असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये फक्त महिलांवरच नव्हे.! तर, पुरुषांवर देखील तितक्यात प्रमाणात अत्याचार होत असल्याचे उघड होऊ लागले आहेत. मात्र, यात अल्पवयीन मुलींवर जे काही प्रकार होतात. त्यांच्या बाकी तत्काळ मुसक्या आवळल्या पाहिजे. आता गेल्या काही महिन्यात प्रतिष्ठीत पुढाऱ्यांवर हनीट्रॅपची प्रकारे घडली होती. त्या पाठोपाठ अगदी काल परवा औयाश पत्नीमुळे तरुणाने तिच्या घरी जाऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे येथे केवळ स्री केंद्रीत गुन्ह्यांचे प्रमाण नसून संमिश्र प्रकारची गुन्हेगारी असल्याचे दिसते आहे. तर काल, रविवार दि. १२ सप्टेंबर २०२१ रोजी पुन्हा अनोखा प्रकार संगमनेरमध्ये घडला आहे. तो असा की, अकोले नाका परिसरात राहणाऱ्या एका मुलाने मुलीस आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाची लालसा दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. विशेष म्हणजे हा मुलगा २१ वर्षाचा असून मुलगी अवघ्या १८ वर्षाची आहे. जेव्हा आपण एका व्यक्तीवर प्रेम केले आणि त्याने आपला वापर करुन घेत लग्नास नकार दिला. हे तिच्या मनाला फार वेदनादायी वाटले. त्यामुळे, तिने विषारी औषध प्राषण करुन स्वत:चे जीवण संपविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने तिचा जीव वाचला असून काल सहायक पोलीस निरिक्षक कोकाटे यांनी दवाखाण्यात जाऊन तिचे जबाब नोंदविले आहेत. त्यानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अरबाज पठाण (रा. अकोले नाका, संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचे व घोडेकर मळा येथील एका तरुणीचे एकमेकांवर प्रेम झाले होते. अकोले नाका व घोडेकरमळा ही दोन्ही ठिकाणे फार काही दुर नाहीत. त्यामुळे, येे-जा होत असताना यांच्यातील वारंवार होणाऱ्या नजरानजर त्यांना एकमेकांकडे अकर्षीत करुन गेल्या. त्यानंतर मैत्री, प्रपोज आणि प्रेम हे सर्व सोपस्कर यांच्यात पार पडले. मात्र, दोघांची जात विभिन्न असल्यामुळे, त्यांना येणाऱ्या काळात काय अडचणी येतील. याची कल्पना नव्हती. तरी देखील यांच्या प्रेमाचे संबंध अधिक वृद्धींगत होत गेले आणि एक निवांत वेळ मिळताच यांनी प्रेमाची हद्द पार केली. जेव्हा पीडित मुलीच्या घरील लोक बाहेर जात असे. तेव्हा आरोपी हा तिच्या घरी जायचा आणि पीडितेवर अत्याचार करायचा. हा प्रकार गेल्या दोन तीन महिन्यांपासून वारंवार सुरुच होता. मात्र, या दोघांचा हा उपद्व्याप फार काळ टिकला नाही. घडला प्रकार जेव्हा पीडित मुलीच्या पालकांना समजला तेव्हा कुटुंबात मोठा कलह निर्माण झाला. मुलीस पालकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, डिप्रेशन सोडून तिच्या वाट्याला काही आले नाही.

          दरम्यान, जेव्हा मुलाचा प्रश्न आला तेव्हा दोघांच्या विभिन्न जाती आणि स्वत:च्या पायावर तो उभा आहे का? याबाबत मुलगी देखील अनुरुत्तरीत होती. हाच प्रकार जेव्हा मुलाच्या कुटुंबास समजला तेव्हा त्याच्या घरुन देखील या प्रेमास विरोध झाला. मात्र, जेव्हा या दोघांचे प्रेम जमले होते. तेव्हा अरबाज ने पीडित मुलीस सांगितले होते की, काहीही झाले तरी मी तुझ्याशी लग्न करेल. तेथे जात आणि धर्म आडवा येऊ देणार नाही. त्यानंतर त्यांच्यात शरिर संबंध झाले होते. मात्र, वास्तवत: जेव्हा पीडित मुलीच्या घरी यांच्या नात्याविषयी कुणकुण लागली तेव्हा तिने अरबाजपुढे लग्नाचा प्रस्ताव मांडला. मात्र, आज-उद्या असे म्हणून त्याने तिच्याकडे वारंवार दुर्लक्ष केले. अशा परिस्थितीत पीडित मुलगी प्रचंड अस्वस्थ झाली होती. मात्र, त्यानंतर जेव्हा हा प्रकार घरी समजला त्यानंतर घरातून या प्रकाराला प्रचंड विरोध झाला. तेव्हा मुलीची द्विधा मनस्थिती झाली. कारण, ज्या मुलावर प्रेम केले तो लग्नास नाही म्हणतो आहे. तर, ज्या कुटुंबाने आपले लालन पालन केले, त्यांच्या नजरेत आपण आपराधी झालो आहोत. त्यामुळे, प्रचंड तणावाखाली आलेल्या पीडित तरुणीने दि. १० सप्टेंबर २०२१ रोजी विषारी औषध घेऊन स्वत:ला संपवून घेण्याचा निर्णय घेतला.

        दरम्यान, घडलेल्या प्रकाराचा पश्चाताप झाल्यामुळे, पीडितेने औषध घेऊन आयुष्याला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र, तिने औषध घेतल्याचे माहित होताच तिच्या पालकांनी तिला तत्काळ संगमनेरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिने तीन ते चार दिवस मत्युशी झुंज दिली, डॉक्टरांच्या यशस्वी प्रयत्नानंतर तिचा जीव वाचला. त्यानंतर, घडलेला प्रकार जेव्हा पोलीस ठाण्यात माहित झाला तेव्हा पोलीस अधिकारी कोकाटे यांनी पीडितेचे जबाब नोंदविले आहेत. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. आता अरबाज पठाण याच्यावर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्यास अटक केली आहे. त्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधिक्षक राहुल मदने, पोलीस निरिक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित मुलीशी चर्चा केली आहे. आरोपीला कठोर शिक्षा कशी होईल यासाठी प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे, या घटनेनंतर  कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.