पतीन पत्नीकडे गाय घ्यायला 50 हजार मागितले.! बापाला त्रास नको म्हणून मुलीची विहिरीत आत्महत्या.!

    


सार्वभौम (संगमनेर) :- 

              जमीन व गायी घेण्यासाठी पंन्नास ते साठ हजार रुपये घेऊन ये असे म्हणून तिच्या सासरच्यांनी एका विवाहीत महिलाचा शरिरीक व मानसिक छळ केला. मात्र, या वारंवार होणार्‍या वेदना असहाय्य झाल्यामुळे या मुलीने चक्क विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना गुरूवार दि. 9 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील उंबरी येथे घडली आहे. यात मयुरी पवन सारबंदे (वय 24) असे मयत मुलीचे नाव आहे. तर याप्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आश्वी पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अशोक बाळासाहेब वर्पे (रा. कनोली, ता. संगमनेर) यांची कन्या मयुरी हिचा विवाह सन 2017 मध्ये पवन बारकु सराबंदे याच्यासोबत झाला होता. काही काळ यांचा संसार चांगला चालला. मात्र, कालांतराने यांच्यात प्रचंड वाद निर्माण झाले. कारण, सराबंदे हा मयुरीस नेहमी मारहाण करीत असे. तर तुझ्या माहेरहून जमीन व गायी घेण्यासाठी 50 ते 60 हजार रुपये घेऊन ये.! असे म्हणून वारंवार शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करीत होता. त्यानंतर हा प्रकार मुलीच्या घरी समजला असता त्यांनी जावयास सांगितले की, आमच्याकडे सध्या पैसे नाहीत. जेव्हा पैसे येतील, तेव्हा लवकरात लवकर देऊ असे म्हणून शब्द दिला.

दरम्यान, यांना एक मुलगी झाली होती. त्यानंतर यांच्यातील वाद स्थिर होतील असे वाटले होते. मात्र, तसे काही झाले नाही. एकदा या मुलीच्या अंगावर भाजी सांडली होती. त्यात ती भाजली. मात्र, घरच्यांनी हे सर्वखापर मयुरीच्या डोक्यावर फोडलेे. तुझ्यामुळेच परी (मुलगी) भाजली आहे. असे म्हणत वारंवर मानसिक त्रास देण्यात आला. तर, तुझे माहेरचे लोक पैसे देणार होते. त्याचे काय झाले? अशी विचारणा करुन ते त्रास देत होते. त्यांच्या या त्रासापोठी तिच्या घरच्यांनी आरोपी पवन यास 1 लाख दिले होते. मात्र, तरी देखील यांनी आणखी पैशासाठी तगादा लावला होता. त्यामुळे, मयुरी ही पुर्णत: कंटाळली होती. याबाबत ती तिच्या जवळच्या व्यक्तींशी नेहमी बोलत होती.

दरम्यान, दि. गुरूवार दि. 9 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अशोकराव हे शेतात काम करीत होते. त्यांना अचानक काही फोन येऊन गेले होते. त्यामुळे त्यांनी चौकशी केली तर हे फोन मुलीच्या सासरचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचा पाठपुरावा केला असता समजले की.! मयुरीने एका विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. त्यानंतर तिच्या सहनशक्तीचा अंत झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे लक्षात आले आहे. त्यानंतर तिच्यावर मोठ्या शोकाकुल वातावरणात उंबरी येथे अंत्यसंस्कार करर्‍यात आले आहे. तर याप्रकरणी पती पवन बारकु सारबंदे, भाया अरुण बारकु सरावदे, जाव वैशाली उर्फ बाली अरुण सारबंदे अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.