आरे देवा.! ती कॉलेजला आली अन शिक्षक तिला घेऊन पळाला.! मास्तर गेला पळून, गुन्हा दाखल
एका शिक्षकाचे एका मुलीवर प्रेम जडले आणि त्याने तिच्याशी विवाह करण्याचा निर्धार केला. दुर्दैव असे की, तेव्हा मुलगी अल्पवयीन होती. तरी देखील शिक्षकाला प्रेम अनावर झाले आणि तो तिला तो पळून घेऊन गेला. मग काय.! त्यांना शोधून आणले आणि त्या शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा ठोकला. हे प्रकरण येथेच थांबले नाही. तर, आता ती मुलगी गेल्या काही दिवसांपुर्वी 18 वर्षाची झाल्यानंतर हा शिक्षकाने सोमवार दि. 16 ऑगस्ट 2021 रोजी पुन्हा पळून नेले होते. मात्र, तिच्या पालकांनी मुलीचा शोध घेतला आणि पुन्हा या शिक्षकावर आता अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष असे की, या मास्तरने मुलीच्या चेहऱ्यावर भुलीचा स्पे मारुन तिचे अपहरण केल्याचे समोर येऊ लागले आहे. हा उपद्रव कशीसाठी? तर, पहिला जो बलात्काराचा गुन्हा दाखल होता त्यावर तोडगा काढण्यासाठी. त्यामुळे, पहिला गुन्हा अकोल्यात तर दुसरा गुन्हा आता राजूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून सिताराम वायाळ या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील केळी कोतुळ येथील सिताराम वायाळ हा रहिवासी आहे. त्याचे परिसरात राहणार्या एका मुलीसोबत त्याला प्रेम झाले होते. तो एका आश्रमशाळेवर शिक्षक म्हणून नोकरी करीत होता. तर, ही विद्यार्थीनी दुसरीकडे शाळेत शिकण्यासाठी जात होती. दरम्यान, जेव्हा मास्तरचे प्रेम या मुलीवर जडले तेव्हा ती अल्पवयीन होती. तरी देखील याने तिला पळवून नेले आणि तिच्यावर एका ठिकाणी बलात्कार केला. आपली मुलगी घरी आली नाही. त्यामुळे, तिच्या पालकांनी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. जेव्हा या दोघांना पकडून आणले गेले तेव्हा मुलीच्या जबाबानुसार या शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, हा सर्व प्रकार पुर्वी झाला होता. मात्र, त्यानंतर या शिक्षकाची नोकरी गेली त्याने वैयक्तीक क्लासेस सुरू केलेे होते. एकीकडे प्रेम गेले. त्यात नोकरी गेली, लॉकडाऊन लागल्याने क्लासेस बंद झाले. त्यामुळे, प्रचंड अस्वस्थ असलेल्या या तरुणाला रहावले नाही. त्याने सोमवार दि.16 ऑगस्ट 2019 रोजी पुन्हा मोठी चुक केली. ज्या मुलीवर प्रेम केले होते. ती जेव्हा राजूर येथे कॉलेजला येत होती. तेव्हा याने तिला भोजदरी परिसरात आपल्या ताब्यात घेतले आणि तिला संगमनेर तालुक्यातील बाळेश्वर परिसरात आपल्या आप्तेष्ठांकडे घेऊन जात होता. यावेळी या बहादराने तिच्या तोंडावर भुलीचे स्प्रे मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, ज्या व्यक्तीने या दोघांना गाडीत नेले होते. ती एक भाडे तत्वावर नेलेली गाडी होती. जेव्हा गाडी ठरविली होती. तेव्हा त्यांना सांगण्यात आले होते की, एक पेशन्ट आपल्याला दुसरीकडे न्यायचे आहे. त्यामुळे, गाडी मालकाच्या मनात जरा देखील शंका आली नाही. मात्र, जेव्हा गाडीत ही दोघे बसले तेव्हापासून वाहन चालकाच्या मनात शंकेचा किडा वळवळ करु लागला होता. मात्र, तो काही बोलला नाही. पुढे संगमनेर तालुक्यातील बाळेश्वरकडे गाडी नेल्यावर त्यांच्या काही हलचाली वाहन चालकास शंकास्पद वाटल्या आणि त्याने दोघांना धमकावून मुलीच्या पालकांचा मोबाईल नंबर घेत तिच्या पालकांशी संपर्क साधला.
हा सर्व प्रकार पालकांना समजताच त्यांनी मुलीस आपल्या ताब्यात घेतले. एकदा गुन्हा दाखल होऊन तो न्यायप्रविष्ठ असताना देखील वायाळ याने जो दुसर्यांदा जो काही प्रकार केला. त्यामुळे वैतागलेल्या पालकांनी थेट राजूर पोलीस ठाणे गाठले आणि सिताराम वायाळ याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीची इच्छा नसताना देखील वायाळ याने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तो एका सजग वाहन चालकामुळे हानुन पडला आहे. वाहन चालकाचे मुलीच्या नातेवाईकांनी आभार मानले आहे. तर याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुढील कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे.
एकीकडे शिक्षक असताना अशा प्रकारचे कृत्य करणे हे वायाळ यास अशोभनिय आहे. तर दुसरीकडे ज्या मुलींचे तथा मुलाचे वय 18 वर्षे आहे. त्यांना पळून नेणे हा कायदेशीर गुन्हा असून त्यात न्यायालयाच्या निर्देशाने थेट कलम 363 हा गुन्हा नोंद होतो. अकोले तालुक्यात अल्पवयुीन मुलींना पळवून नेण्याचे प्रमाण हा नगर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तर अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंद देखील अकोले तालुक्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे, तालुक्यात बालगुन्हेगारी, बालविवाह, अल्पवयीन प्रेम संबंध, जातीयता या आणि अशा अनेक विषयांवर समुपदेशन होणे नितांत गरजेचे आहे.