पिचड साहेब.! तुम्ही आमच्या पक्षात चला.! राजकीय बोंबाबोंब आणि मोर्चेबांधणी.! मोठा भुकंप होणार.!



- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

                    आयुष्यात चुका होत नाही असा कोणी माणूस नाही. मात्र, झालेले चुक जर कोणी सुधारत नसेल तो सजन माणूस नाही. असे विचारवंत म्हणतात. आता हा विचार अकोले तालुक्याच्या राजकारणात अगदी तंतोतंत लागू होतो. कारण, पिचड यांनी राजकीय स्थैर्य असणारा राष्ट्रवादी पक्ष सोडला आणि भाजपत गेले. आता जनता त्यांना स्विकारते आहे. मात्र, त्यांनी भाजपचा पाढा वाचला तर पुन्हा काय होईल हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे, शिवसेनेचे दोन तरुण पदाधिकारी त्यांना गेल्या काही दिवसांपुर्वी जाऊन भेटले.तेव्हा त्यांनी पिचडांना भगवा हाती घेण्यास विनंती केली. त्या पाठोपाठ आता राज्यात जे महाविकास आघाडी सरकार आहे. त्यांनी जर पाच वर्षे यशस्वी पुर्ण केले. तर, राज्यात प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणुका लढवेल. यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे, काँग्रेसने देखील त्यांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जर असे झाले तर, मधुकर नवले यांच्या माध्यमातून उद्याच्या काळात पिचड काँग्रेसमध्ये दाखल झालेले पहायला मिळतील. त्यामुळे, तशा प्रकारच्या व्युव्हरचना आजच पहायला मिळत आहेत.

खरंतर 2019 मध्ये अकोले तालुक्यात राजकीय परिवर्तन पहायला मिळाले. अनपेक्षितपणे डॉ. किरण लहामटे यांची लॉटरी लागली आणि येतील राजकीय गणिते पुर्णत: बदलुन गेली. एकवेळी असे वाटत होते की, डॉ. लहामटे हे येणारी 40 वर्षे जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतील. मात्र, अवघ्या दोन वर्षात जनतेने त्यांच्या कार्यपद्धतीपुढे हात टेकले. आज त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात की, जर आज निवडणुका लागल्या तर आमचा उमेदवार कोठे पहायला मिळणार नाही. तर कोणी म्हणते की, जर एक तृतीअंश जनता विरोधात गेल्याने आमदारकी रद्द होत असती तर आम्हीच रस्त्यावर उतरलो असतो. म्हणजे घरचा भेदी आणि लंका दहन. हा असाच प्रकार झाला आहे. मात्र, कारणार तरी काय? पाच वर्षे हाक ना बोंब.! तरी देखील आमदारांनी त्यांच्या स्वभावात बदल केला तर त्यांच्याइतका प्रंजळ माणूस कोणी नाही. परंतु, त्यांना मार्गदर्शन शकुनी मामासारखे लाभतात. त्यामुळे, त्यांचे साम्राज्य जायला वेळ लागत नाही.

जर, मध्यावधी किंवा 2024 च्या निवडणुका लागल्या. तर तालुक्यात कधी नव्हे इतके उमेदवार आणि पैशांचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही. यात यावेळी, अशोक भांगरे, वैभव पिचड, मारुती मेंगाळ, डॉ. किरण लहामटे, सतिष भांगरे, मधुकर तळपाडे, मारुती शेंगाळ यांच्यासह अन्य काही निवडक व्यक्तींची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र, काही झाले तरी पिचड आणि भांगरे यांच्यात जी काही लढत होईल ती काही औरच असणार आहे. मात्र, यात आणखी एक गोष्ट नमुद करावी लागेल. की, जे काही मतांचे विभाजन होणार आहे. त्याचा सर्वस्वी फायदा पिचड यांना होणार आहे. त्यामुळे, जर पिचडांचा पक्ष आणि त्यावेळचा निर्णय योग्य असला तर त्यांना पराभव सोडा, त्यांना मंत्री होण्यापासून देखील कोणी आडवू शकत नाही. अर्थात अजून बरेचसे पाणी पुलाखालुन जायचे आहे. त्यामुळे, ते सुद्धे वेट अ‍ॅण्ड वॉच हीच भूमिका घेणार आहेत. मात्र, काही झाले तरी ते भाजपतून निवडणुक लडवतील यात फार साशंकता आहे.

खरंतर, यावेळी भांगरे कुटुंबाला आमदार होण्याची संधी जनतेने देणे अपेक्षित आहे. खरंतर डॉ. लहामटे यांनी जर थांबून घेतले आणि पिचड जर भाजपतून लढले. तर मात्र भांगरे कुटुंबात पुन्हा आमदार होणे शक्य आहे. मात्र, दुर्दैव असे की, आजकाल अमित भांगरे जसे जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवडून गेले आहेत. तेव्हापासून त्यांच्या डोळ्यावरचा चष्मा उतरत नाही आणि त्यांच्या देखील गाडीची काच खाली होत नाही. इतकेच काय.! आमदार होण्याची जिद्द आणि चिकाटी ही काय असते ही मारुती मेंगाळ या व्यक्तीमत्वकडून अभ्यासली पाहिजे. भलेही आर्थिक पाठबळ नसुद्या. काल अकोल्याला बिना इस्त्री केलेले शर्ट परिधान करुन इनवर तालुक्यात भटकणारा तरुण आज पंचायत समितीचा उपसभापती झाला. त्यांचे गावोगावी होणारे दौरे पाहिले तर तरुणांची मोठी फौज त्यांची उभी केली आहे. त्यामुळे, येणार्‍या विधानसभा निवडणुकीत मतांच्या विभाजनात मेंगाळ यांनी आमदार म्हणून वर्णी लाभली तर नवल वाटायला नको.!

आजकाल जे डॉ. लहामटे यांना करता आले नाही. ते अशोक भांगरे यांनी सुरू केले आहे. गावोगावी जाऊन पक्षाचे संघटना बांधणीचा वसा त्यांनी हाती घेतला आहे. अशोक भांगरे यांचा स्वभाव आणि त्यांना स्विकारणारी जनता फार आहे. मात्र, त्यांना जर वाटत असेल की, आपण संघटन उभे करु आणि अचानक अमित भांगरे यांचा नाव पुढे करु. तर ते त्यांच्यासाठी घातक ठरणार आहे. गेल्या नऊ विधानसभेत त्यांच्या जे पदरी पडले तेच पुन्हा पडेल हे त्यांना समजून घ्यावे. कारण, आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा जमाना आता गेला आहे. लोक सुज्ञ झाले आहेत. त्यामुळे, त्यांनी देखील नियोजनबद्ध काम करणे अपेक्षित आहे. नाहीतर, कष्ठ भांगरेंचे आणि फळ नेहमी भलताच खावून जातो. हाच इतिहास या कुटुंबाचा आहे. म्हणून त्यांनी काही धेय्य डोळ्यासमोर ठेऊन काम केले पाहिजे. असे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे मत आहे. तसेही आज बहुतांशी लोक म्हणतात की, चुक झाली. तेव्हाच भांगरे पाहिजे होते. त्यामुळे, या सहानुभूतीचा त्यांना आजच फायदा घेतला पाहिजे. कारण, आता नाही तर पुन्हा कधीच नाही.!

तसे पाहिले तर पिचड आणि भाजप हे सुत्रच फार कोड्यात टाकल्यासारखे वाटते. त्यामुळे, श्याम वाकचौरे यांनी त्यांच्या फेसबुक वॉलहुन पिचड आणि काँग्रेस अशा प्रकारचे सुचक विधान केले होते. त्यावर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रीया द्यायला सुरूवात केली. मात्र, त्यांच्या पोष्टचा मतितार्थ काढला, तर तो काही चुकीचा वाटत नाही. कारण, येणार्‍या काळात शक्यतो प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे, पठार भागाचे 46 हजार मतदान, त्यात तेथील जनार्दन आहेर यांचे प्राबल्य, प्लस तालुक्यात त्यांचे स्वत:चे 50 हजार मतदान प्लस काँग्रेसच 30 ते 40 हजार मतदान (सरासरी आकडेवारी) असे पहाता बाळासाहेब थोरात यांनी जर पिचडांना ताकद दिली तर अकोले तालुक्यात पुन्हा काँग्रेस उभारी घेईल. इतकेच काय! ते राज्यात मंत्री देखील होतील. अर्थात हे र वर लिहीले असले तरी वास्तवत: आकडेवारी देखील यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे, जर येथे अजित पवारांनी सिताराम पाटील गायकर यांना पाठबळ दिले नाही. तर, ज्या मधुभाऊ नवले यांना राष्ट्रवादीने प्रवेश देण्यास मागेपुढे पाहिले. तेच नवले येथील राष्ट्रवादीला धुळ चारल्याशिवाय राहणार नाही. हे देखील तितके सत्य आहे. अर्थात येणारा काळ असाच काहीसा असू शकतो. फक्त काही एक पत्ता क्लेअर झाल्याशिवाय गेम दाखविण्यात अर्थ तरी काय? त्यामुळे, त्या पत्त्याची आणि योग्य वेळेची आपण वाट पाहुयात....!