चोरट्यांनी सोन्यासाठी केली महिलेची हत्या.! दोघे ताब्यात, अकोल्यातील घटना, दरोड्याचे सत्र सुरूच..!
सार्वभौम (अकोले) :-
ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी अशी म्हण आहे. मात्र, येथे या म्हणीची उलट प्रचिती दिसून आली आहे. ज्या महिलेने दोन तरुणांना रोजगार दिला. त्यांनीच या महिलेची अवघ्या काही सोन्याच्या दागिन्यासाठी हत्या केल्याचे धक्कादायक घटना उघड झाली आहे. हा प्रकार अकोले तालुक्यातील आंभोळ येथे शुक्रवार दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी पहाटेच्या सुमारास घडली. जेव्हा ही महिला मयत झाल्याचे लक्षात आले तेव्हा पोलिसांना माहिती कळविली असता हा अकस्मात मृत्यू नसून खून असल्याचे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे, याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रीयाने नोंद करण्यात आली असून एकास अकोले पोलिसांनी तर दुसर्या व्यक्तींस राजूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात कांताबाई तुकाराम जगधने (रा. आंभोळ, ता. अकोले) असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कांताबाई जगधने ही महिला आंभोळ परिसरात वास्तव्यस होती. दुर्दैवाने त्यांना मायेचे छत्र नसल्याने त्या एकट्याच राहत होत्या. गेल्या काही दिवसांपुर्वी तालुक्यात चांगलाच पाऊस झाल्याने त्यांचे घर टपटप गळत होते. त्यामुळे, या माय माऊलीचे प्रचंड हाल होत होते. म्हणून तीने एका व्यक्तीस घरावरची कौले बसविण्याची विनंती केली होती. आता ज्याला रोजगार दिला होता. त्याने आजीचे घर शेकारले खरे. मात्र, तेव्हापासूनच त्याची नजर तिच्या गळ्यात असलेल्या फुटक्या मन्यांवर पडली होती. त्याने कौले बसविल्यानंतर आजीकडून त्याला शंभर रुपये घेणे बाकी होते.
आता हे जे दोघे ताब्यात घेतले आहेत. ते आजीच्या घरापासून रहायला काही फार दुर नव्हते. आजी एकटी असल्याची यांनी पुर्णत: माहिती होती. त्यामुळे, त्यांनी सायंकाळी कोतुळ येथे मद्य प्रशन केले. त्यानंतर आणखी मद्य प्राषण करण्यासाठी हे रात्री आजीच्या घरी गेल्याचे बोलले जाते. तेथे त्यांनी आजीकडून दारुत ओतण्यासाठी पाणी मागितले आणि जेव्हा यांनी ढोसल्यानंतर यांची नजर आजीच्या गळ्यावर गेली आणि अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी आजीची हत्या केली व दोघेही तेथून चालते झाले. म्हणजे, ज्यांना विश्वासातले म्हणून निवारा दिला. त्यांनीच आजीच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिची हत्या केल्याची समोर येऊ लागले आहे.
आता जेव्हा याबाबत सकाळी काही व्यक्तींना माहिती समजली तेव्हा त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिली. यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आजी जरी वयस्कर असली तरी त्यांना फार काही मारहाण किंवा जखमा झालेल्या नव्हत्या. त्यामुळे, हा नैसर्गिक मृत्यू आहे की, कोणी हत्या केली आहे.! याबाबत पोलिसांमध्ये साशंकता होती. त्यामुळे, पोलीस उपाधिक्षक राहुल मदने, सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्यासह अन्य पथकाने घटनास्थळी पहाणी केली. मात्र, संबंधित प्रकार हा शंकास्पद होता. त्यामुळे, पोलिसांनी मयत कांताबाई जगधने यांचा मृतदेह लोणी येते शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला होता. त्यानंतर प्राथमिक अहवालानुसार आजीची हत्या झाल्याचे सामोर आले आहे. तर यातील अधिक शंका म्हणजे, मयत झालेल्या कांताबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने गायब झालेले होते. त्यामुळे, पोलिसांचा संशय अधिक बळावला होता.
यात एक गोष्ट आणखी अधोरेखीत झाली की, कांताबाई यांचे सावत्र मुले आहेत. ते मुंबई येथे कामाला असल्यामुळे, आईसाहेब ह्या आंभोळ येथे एकट्या राहत होत्या. त्यामुळे, वयाची 60 ओलांडली तरी त्यांचे हाल काय होते हे त्यांनाच माहित होता. तर जेव्हा कांताबाई यांचा मृतदेह लोणी येथे पाठविण्यात आला होता. तेव्हा त्याचे पोष्ट मार्टम झाल्यानंतर त्यांना गावी न आणता त्यांचा अंत्यसंस्कार देखील लोणी येथेच करण्यात आला. तर हा आकस्मात की घातपात याबाबत पोलिसांनी तेथील वैद्यकीय अधिकार्यांना विचारणा केली असता त्यांनी हा घातपात असल्याची माहिती दिली. तसा पोलिसांनी दुजोरा दिला आहेे. त्यानंतर पोलिसांनी तेथे बाहेर गावाहून आलेल्या दोघांना ताब्यात घेतले असून आज याबाबत संपुर्ण कायदेशी प्रक्रिया पुर्ण होऊन आरोपींना निच्छित करण्यात येणार आहे.
दरम्यान, अकोले तालुक्यात गेल्या महिन्यापासून रोज चोर्या-दरोडे होत आहेत. या दोघांनी जे काही कृत्य केले ते चोरच्या उद्देशानेच केले आहे. त्यामुळे, तालुक्याच चालु असलेल्या चोर्यांच्या मागे यांचा काही हात आहे का? किंवा आपण असा प्रकार करायचा आणि जे तालुक्यात दरोडे टाकत फिरत आहेत. त्यांच्या माथी टाकायचा.! असाच काहीसा प्लॅनिंग यांचा होता का? याची सखोल माहिती पोलीस समोर आणतील. मात्र, या गुन्ह्याच्या अनुषंगाने तालुक्यात चोर्या नव्हे तर जे काही झाले आहे ते बहुतांशी दरोडे आहेत. हे सीसीटीव्हीतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे, या दरोडोखोरांच्या देखील मुसक्या पोलिसांनी आवळाव्यात अशी मागणी आता होऊ लागली आहे. कारण, एका माहिण्यान 30 ते 40 चोर्या किंवा प्रयत्न होणे. अशी तालुक्यात पहिल्यांदाच घडना घडली आहे आणि आता तर चोरट्यांनी थेट खूनच केला आहे. त्यामुळे, दहशत माजविणार्यांना पोलिसांनी गाजाआड करावे अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.