प्रेमात मेजरने घात केला.! फेसबुकवर मैत्री करुन तिला वार्‍यावर सोडले.! प्रियकरावर प्रेमीका कोपली.! अकोल्यातील घटना.!

 सार्वभौम (राजूर) :-

            अकोले तालुक्यातील कोहंडी येथील एका तरुणाने एका मुलीशी फोसबुकवर हाय करुन ओळख काढली होती. कालांतराने दोघांमध्ये मैत्री झाली व त्याचे रुपांतर प्रेमात झाले. यांच्यातील प्रेम अधिक वृद्धीगत होत गेले आणि दोघे वेळोवेळी एकमेकांना भेटू लागले. या दरम्यान त्यांच्या ठरले होते की, आपण एकमेकांसोबत लग्न करायचे. मात्र, आर्मीत नोकरीस असलेल्या या तरुणाने पीडित तरुणीवर वारंवार अत्याचार केले आणि आज उद्या करुन त्याने भलत्याच मुलीसोबत लग्न केले. या दरम्यान, पीडित तरुणीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र, यात पोलिसांनी तिला फारसे सहकार्य केले नाही. असे म्हणत तिने संबंधित तरुणावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. तर, तिच्यासाठी काही भारतीय ट्रायबल पार्टीच्या जिल्हाध्यक्षा डॉली डगळे व तालुकाध्यक्ष संकेत सामेरे यांनी आवाज उडविला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील कोंडी येथे किरण सुरेश दिघे (रा. दिघे वस्ती राजूर जवळ, ता. अकोले)हा आर्मीत कार्यरत आहे. त्याची ओळख सातेवाडी येथील एका मुलीशी फेसबुकवर झाली होती. त्यांच्यात मैत्री झाली आणि काही कालावधीनंतर दोस्तीचे रुपांतर प्रेमात झाले. ही दोघे प्रेमात इतके वाहावत गेले की, दोघे हवे तेथे फिरु लागले होते. त्यामुळे, किरण याने पीडित मुलीच्या घरच्यांना शब्द दिला होता की, काही झाले तरी मी हिच्यासोबत लग्न करेल. त्यामुळे, होणारा जावई विश्वासघाती निघेल अशी त्यांना देखील अपेक्षा नव्हती.

दरम्यान, यांच्यातील प्रेम वाढत गेले आणि दोघांनी एकमेकांच्या संमतीने शरिर संबंध ठेवले. हे नाते चांगले फुलत असताना अचानक किरण दिघे याने एकदा तिला सांगितले की, झाले ते झाले.! आता मला लग्न करण्यास जमनार नाही. त्याच्या या निर्णयाचा राग आल्यानंतर तरी देखील तीने त्यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यात जी काही बचाबाची झाली होती. त्यामुळे, तो त्याच्या मतावर ठाम झाला होता. त्यामुळे, पीडित तरुणीने तडक अकोले पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा ठोकला. त्यानंतर पोलिसांनी यास अटक देखील केली होती. मात्र, त्यानंतर त्यास जामीन मिळाला. त्यामुळे, प्रेमात घात करुन देखील तो मस्त फिरतो आहे याचे शल्य तिला बोचते आहे. या सर्व प्रकारामुळे पीडित तरुणीने त्याच्या विरोधत पुन्हा बंड पुकारले असून तीने डॉली डगळे यांच्याशी संपर्क साधून न्यायाची अपेक्षा केली आहे. डगळे यांनी हा खटला फास्ट्रॅक न्यायालयात चालवावा, घटनेचे दोषारोपपत्र प्रबळ करण्यात यावे अशा वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. 

मुलींनो सावधान.!

जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाले आहे. तेव्हापासून घरा-घरात रिकामटेकड्या मजनुंची संख्या वाढत चालली आहे. तर फसवणुक तथा हनीट्रॅप करणार्‍या महिलांची संख्या देखील काही कमी नाही. त्यामुळे, व्हाट्सअ‍ॅप किंवा फेसबुक आणि इन्स्टाग्राम अशा काही ठिकाणी जर तुम्हाला कोणी हाय-बाय करीत असेल तर त्यांना उत्तरे देण्याच्या भानगडीत पडू नका. हे लोक तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे अमिष दाखवतील इतकेच काय.! सोशल मीडियावर हाय करुन तुम्हाला नको त्या चित्रफिती दाखवतील. त्या मोहात पडू नका. उगच आपण अत्याचाराचे बळी पडू शकतात. त्यामुळे, विशेषत: वयात आलेली मुली आणि मुले यांनी सोशल माध्यमे वापरताने अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे. तर पालकांनी देखील याकडे लक्ष दिले पाहिजे.

 - संकेत सामेरे (बीटीपी तालुकाध्यक्ष)

अशीही एकाची फसवणुक

एका मुलीने एका मुलास फेसबुकवर हाय केले. दोघांमध्ये चर्चा सुरू झाली आणि ती व्हाट्सअ‍ॅपवर आली. कालांतराने मुलीने त्यास चांगलेच मोहात पाडले आणि तीने ज्या पद्धतीने त्याला शारिरीक ऊत्प्रेरीत केले. तसे तो करत गेला. काही वेळाने या तरुणाला समोरच्या मुलीने त्याचे काही अर्धनग्न फोटो टाकायला सांगितले. त्यानुसार त्याने देखील टाकले आणि हा प्रकार इतका वाढत गेला की, संबंधित मुलीने आपले पुर्ण नग्न फोटो त्या मुलीच्या/महिलेल्या अकाऊन्टवर टाकले. त्यानंतर काही दिवस गेले आणि या तरुणास फोन आला की, तु माझ्या पत्नीच्या मोबाईलवर अश्लिल चित्र का टाकले? तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करतो. आता हाक ना बोंब.! त्यामुळे, अशा प्रकारांना देखील कोणी बळी पडू नये.!