अकोल्यात तरुणाई हनीट्रॅपच्या जाळ्यात.! गुन्हा दाखल न करण्यासाठी प्रेयसीने मागितले ५० हजार रुपये.! पोलीस चौकशी सुरु.!

 

सार्वभौम (अकोले) :- 

                              अकोले तालुक्याला हनीट्रॅपचे ग्रहण लागले आहे की काय.? हे समजत नाही. पुर्वी संगमनेरच्या महिलांनी अकोल्याच्या एका राजकीय व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकविले होते. त्या पाठोपाठ संगमनेरातच अकोल्याचा व्यक्ती याच महिलांच्या जाळ्यात अडकला. हे होते कोठे नाहीतर एक अकोल्याचा व्यापारी या प्रकाराला पीडित झाला मात्र, तो पुढे आला नाही. त्यानंतर, अजून पोलिसांच्या ताब्यात अटक असणाऱ्या महिलेस जामीन देखील झाला नाही. तोच, पुन्हा अकोले तालुक्यातील कळस बु येथे राहणारा सुमित शिर्के (वय २४) हा तरुण हनीट्रॅपचा बळी ठरल्याचे बोलले जात आहे. त्याने ज्या मुलीवर प्रेम केले, तिनेच गद्दारी करीत आपल्या प्रेमाला लिलावात काढल्याचे समोर येऊ लागले आहे. आपल्या मुलीच्या प्रेमाचा फायदा घेत तिच्या आईनेच सुमीतडून ५० हजार रुपये मागितल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. याबाबत चर्चा होत असली तरी, पोलीस ठाण्यात अद्याप साधी तक्रार देखील दाखल झालेली नाही. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, पोलीस त्याबाबत तपास करण्यास इच्छुक असून त्यांनीच अशा हनीट्रॅपच्या प्रकारांवरील पडदा उघडा केला आहे. त्यामुळे, याप्रकरणी तक्रार अर्ज आल्यास यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

               गेल्या 15 दिवसांपासून सुमित शिर्केच्या मृत्युने तालुक्यात दु:खाचे वातावरण होते. वडिलांच्या नंतर मोठ्या कष्टाने उभा राहु पाहणाऱ्या सुमितने स्वत:च्या आयुष्याला पुर्णविराम का दिला? याचे गुपित भल्याभल्यांना उमगले नाही. त्यामुळे, अचानक निघुन गेलेल्या मित्राचे रहस्य जाणण्यासाठी त्याचे नातेवाईक आणि मित्रांनी आपली कसोटी पणाला लावली होती. तेव्हा सुमितच्या मृत्युचे गुढ़ उलगडले. खरंतर ही एडी (अकस्मात मृत्यू) दाखल झाली होती. परंतु, हा अकस्मात प्रकार नसून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे, सुमितला न्याय देण्यासाठी आता अनेकांनी कंबर कसली आहे. जर कोणी स्री असल्याचा गैरवापर करुन हनीट्रॅप करु पाहत असतील तर त्यांचे देखील अन्य हनीट्रॅप करणाऱ्या महिलांप्रमाणे केल्याशिवाय राहणार नाही. अशी भुमिक सामाजिक संघटनांनी घेतली आहे. यात एक दुर्दैव असे की, ज्यांनी हनीट्रॅप करणाऱ्या महिलांना वेसन घालण्यास पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ते एकही महाशय अद्याप का पुढे आले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

                 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुमित हा घुलेवाडी येथे त्याच्या मामाच्या गावी गेला होता. तेथे तो एका मुलीच्या जाळ्यात अडकला. वारंवार भेटी आणि जवळीकचे सानिध्य त्यामुळे दोघांचे प्रेम झाले. आता हे खरे प्रेम होते की, प्रेमाचा बनाव.! यावर तुर्तास भाष्य करणे योग्य ठरणार नाही. ते तक्रार दाखल झाल्यास पोलीस चौकशीत उघड होऊ शकते. मात्र, हा प्रेमाचा सिलसिला तब्बल अनेक महिने सुरु होता. अर्थात असे बोलले जाते की, जोवर हा प्रकार मुलीच्या पालकांस माहित नव्हता. तोवर बरेच काही अलबेल सुरु होते. परंतु, जेव्हा यांच्या प्रेमाला वाचा फुटू लागली तेव्हा या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. आता मुलगी ही अल्पवयीन, त्यात त्याला जातीय रंग, त्यात अन्य गंभीर कलमे. त्यामुळे, जाळ्यात आयता मासा घावलाय तर तो कापणारच ना.! अशीच परंपरा आजकाल रुढ़ होत चालली आहे. त्यामुळे, या प्रकरणावर पडदा टाकायचा तर कसा? तर यांनी हनीट्रॅपची योजना आखली.! आणि तेथून खऱ्या अर्थाने प्रेमाला आर्थिक तडजोडीची किनार लागली. पण, काही झाले तरी असे प्रकार चुक आहेत. ही लालसा लागलेल्या व्यक्तींना सांगणार कोण? म्हणजे, गेल्या कित्तेक दिवसापासून हनीट्रॅपमध्ये काही महिलांना व पुरुषांना देखील आरोपी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्या संगमनेरच्या असून देखील काही व्यक्तींना त्याचे अकलन होत नाही. ही किती विशेष बाब आहे.

                   खरंतर जेव्हा या मुलाचे प्रेम उघड झाले तेव्हा मुलगी आणि तिच्या पालकांनी या मुलास ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्याचे आरोप होत आहे. या मुलाकडून काही रकमा देखील यांनी उकळल्याचे बोलले जाते. आता कोरोनामुळे या तरुणाकडे जॉब नव्हता, त्यामुळे, वारंवार होणारे चोचले पुरविणार तरी कसे? तरी देखील या प्रकारावर सुमितने कोणाशी भाष्य केले नाही. कोठे मन मोकळे केले नाही, आपली समस्या कोणाला सांगितली नाही. तो होणारा अत्याचार निमुटपणे सहन करीत राहिला. खरंतर, ही समस्या त्याने कोणाकडे कथन केली असती तर आज सुमित आपल्यात असता. दुर्दैवाने त्याच्या घरात पत्रकार आणि समाजात वावरणारे व्यक्ती असून देखील सुमीत डोळ्याची पाते लवते ना लवते तोच या दुनियेतून चालता झाला. हे शल्य भल्याभल्यांना बोचणारे आहे. प्रेमात झालेला घात पाचविण्यासाठी सुमितचा एकही मित्र कामी आला नाही. संबंधित व्यक्तींकडून होणारी मागणी पुर्ण करण्यासाठी तो कधी आईचा तर कधी भावाचा आधार घेत होता. परंतु, त्याचा हा आधार फार काळ टिकू शकला नाही. जेव्हा, समोरकडून एकसोबत ५० हजार रुपयांची मागणी झाली तेव्हा मात्र सुमित पुर्णत: हतबल झाला होता. पंन्नास हजार रुपये नाही दिले तर गुन्हा दाखल होईल या भितीपोटी तो प्रचंड अस्वस्थ होता. अशात या रकमेचा तगादा लागला आणि जिच्यावर प्रेम केलं. तिच आता त्याच्या मुळावर उठली होती. पैसे हवेत म्हणून या मुलीने त्याच्या व्हाटसअॅपवर काही मेसेज केल्याचे बोलले जात आहे. तर, तिने त्यास एका विहिरीचे फोटो टाकून, मी आत्महत्या करते आहे. असे म्हणत त्याला ब्लॅकमेल केले होते. दुर्दैवाने तिने कट रचला परंतु हा त्याचा बळी ठरला आणि तेथे सुमितने आत्महत्या केली.

         एकंदर, अकोले तालुक्यात सुमित सारखे अनेक तरुण असे आहेत. जे यात अडकले आहेत. परंतु, पलकांच्या भितीपोटी किंवा बदनामी पोटी समोर येत नाहीत. खरंतर, अशा तरुणांनी स्वत:ची घुसमट न करता माध्यमे किंवा थेट पोलिसांशी संपर्क साधून स्वत:च्या भावनांना वाट मोकळी करुन देणे अपेक्षित आहेत. खरंतर, लोक आपली समस्या रडून ऐकतात आणि बाजुला जाऊन खदाखदा हसून सांगतात. अशा देखील प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यामुळे, कोणी असे प्रकार सांगण्यास टाळाटाळ करतात. या अपरोक्त, जेव्हा, अकोल्यात दोन हनीट्रॅपचे गुन्हे दाखल झाले. तेव्हा काही व्यक्तींनी मोठ्या दिमाखात हनीट्रॅप पीडित व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र, आज सुमितचे कुटुंब काही दबावाखाली आहे. त्यांनी काहीशी भिती आहे, त्यांच्याकडे कायदेशीर आणि सामाजिक बळ नाही. तरी देखील माध्यमांपुढे मीडियाबाजी करणारे लोक साधे विचारणा देखील करायला आले नाही. अशी खंत सुमितच्या नातेवाईकांनी सार्वभौमकडे व्यक्त केली. इतकेच काय.! चिंचावणे येथील प्रकार देखील काहीसा हनीट्रॅप सारखा आहे. त्यात दोन जणांनी आत्महत्या केली. केवळ, दोन लाख रुपये मागतात आणि बदनामी होत आहे म्हणून. त्यांची साधी कोणी चौकशी देखील केली नाही. अर्थात, बोलाचा भात आणि बोलाची कढ़ी. वास्तवत: आता पोलीस देखील या प्रकरणात हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे, समितला न्याय देण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी कोणताही विचार न करता पुढे यावे. आता पोलीस चौकशीतच त्यास न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. अन्यथा.....