आरे देवा! भर कोविडमध्ये संगमनेरात बैलगाड्यांची शर्यत.! 46 जणांवर गुन्हे दाखल.! बैलांसह गाडे जप्त.!


सार्वभौम (संगमनेर) :-

                 संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापुर शिवारात देवीच्या मंदीरासमोर काही व्यक्तींनी बैलगाड्यांची शर्यत आयोजित केली होती. कोरोना संगमनेरच्या मानगुटीवर बसला असून येथे हजारो लोक कोविडने मयत झाले आहेत. यापलिकडे सर्वोच्य न्यायालयाने बैलगाड्याचे शर्यतीवर बंदी घातलेली असतांना देखील या व्यक्तींनी असा उपक्रम आयोजित केला. तर दोन हजार रुपये टोकन घेवुन बैलगाड्याची शर्यत खेळवितांना 46 आरोपी व पाहणारे दिसून आले. हा प्रकार रविवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लक्षात आला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 21 ज्ञात तर 25 अज्ञात अशा 46 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण झाली. तरी देखील येथे मानसांच्या बरोबरीने जनावरांचा देखील स्वत:च्या हितासाठी छळ केला जातो. हे लक्षात आले आहे. विशेष म्हणजे, येथे 75 वर्षानंतर देखील न्यायालयाच्या नियामांचे उल्लंघन होते हे देखील दुर्दैव आहे. त्याचे कारण असे की, संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापुर शिवारात लोकांची गर्दी जमवुन बैलांना लोखंडी खिळ्यांचे टोक असलेल्या बांबुची काठीने मारुन, टोचुन बैलाची शर्यत लावण्यात आली होती. हा प्रकार जेव्हा घारगाव पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांना समजला असता त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा, मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या लक्षात आले की, खरोखर कौठे मलकापुर येथे बैलांची शर्यत सुरू होती.

दरम्यान, पोलीस गाडी घटनास्थळी पोहचताच बैलगाडी चालक आणि बघ्यांची एकच पळापळ सुरू झाली. एकीकडे शर्यत जिंकण्यासाठी जो काही आटापिटा सुरू होता. त्या पलिकडे आता पोलिसांपासून बचाव करण्यासाठी आता शर्यत लागली होती. पोलिसांनी सुचना देऊन देखील ज्यांनी कोणी हा उपक्रम राबविला होता. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली होती. यात घटनास्थळाहुन पोलिसांनी सहा जणांनी अटक केली आहे. तर बाकी लोक पसार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाहून 4 लाख किमतीची बोलेरो, दोन लाख रुपयांची बैलजोडी, 10 हजार रुपयांचा शर्यतीचा छकडा, बैल पळविण्यासाठी टोचण्यासाठी खिळा असलेली बांबुची काठी यासह काही अन्य मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर काही लोक पसार झाले आहेत.

या शर्यतीत आरोपी म्हणून नितीन उत्तम पावडे (रा.पाचघर ता.जुन्नर,जि.पुणे) नितीन उत्तम धोंडकर, अक्षय बबन डुबरे (रा.ओतुर राज लॉन्स) श्रीकांत बाळु मंडलीक (रा.डिंगोर ,ता.जुन्नर जि.पुणे) 5)शिवाजी रामभाऊ कारंडे, सचीन उत्तम पानसरे (रा.ओतुर ता.जुन्नर जि.पुणे) आयोजक-लक्ष्मण गजाबा गिते (रा.कौठे मलकापुर ता.संगमनेर) राकेश खैरे, सुरेश लक्ष्मण चितळकर (रा. चितकळ वस्ती, साकुर ता.संगमनेर) बाळासाहेब बबन महाकाळ (रा.मांदारणे, ता.जुन्नर जि.पुण) राहुल काळे (रा.पाचघर रोड,ओतुर) संजय भागा देवकाते (रा.चितळकर वस्ती,साकुर ता.संगमनेर) चैतन्य पडवळ (रा.ओतुर राज लॉन्स) सतिष गिरजु खेमनर,रा.बिरेवाडी,9) भाऊसाहेब आबु खेमनर(रा.हिरेवाडी) दादासाहेब चिमाजी खेमनर (रा.हिरेवाडी), विशाल सगाजी खेमनर (रा.नान्नर वस्ती), शुभम शंकर नान्नर (रा.नान्नर वस्ती), अमोल साहेबराव (नान्नर, नान्नरवस्ती), बाळु साहेबराव कुदनर (शिंदोडी), प्रतिक संतोष ठोंबरे (रा.जांबुत), राहुल गंभीरे (रा.कौठेमलकापुर ता.संगमनेर) व इतर 20 ते 25 इसम यांना आरोपी करण्यात आले आहेत. 

दरम्यान, यातील पहिल्या सहा जणांना पोलिसांनी अटक केले आहे. त्याच्यावर सरकारी फिर्याद दाखल करुन कलम 188, 269 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119, सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर जे काही बैल पोलिसांनी ताब्यत घेतले आहेत. त्यांना गो शाळेत ठेवण्यात आले आहेत. आता यात किती बैलजोड्या होत्या, कोणकोण या शर्यतीत सामिल होते. हे सर्व माहिती घेण्यासाठी पोलिसांनी सुरूवात केली आहे. तर जे काही बैल पोलिसांनी जप्त केले आहे. ते मालकास ताब्यात घेण्यासाठी आता न्यायालयाचे दार ठोकावे लागणार आहे.