प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या! तिने विहिरीत उडी मारण्याचे नाटक केले अन याने खरोखर फाशी घेतली.!


सार्वभौम (अकोले) :-

                   लग्न करायचे तर माझ्याशीच करायचे. असे म्हणत तरुणाने त्याच्या प्रेयसिला साद घातली. आपले वय पुर्ण झाल्यानंतर सर्व काही व्यवस्थित करुन आपण एक होऊ असे म्हणत त्याने तिची समजूत घातली. यावेळी त्याने तिला भेटण्यासाठी साद देखील घातली होती. मात्र, दुर्दैवाने ती त्याला भेटण्यासाठी गेली नाही. उलट, मीच आता आत्महत्या करीत आहे. असे म्हणत तिने या तरुणाच्या मोबाईलवर एका विहीरीचे चित्र टाकले. आता आपली प्रेयसी आत्महत्या करते आहे. असे समजताच व्हाटसअ‍ॅपवर आलेले फोटो पाहून याने क्षणाचाही विलंब केला नाही. या तरुणाने गळफास घेऊन आपली जिवणयात्रा संपविली. अचानक असे काय झाले? हे कोणाच्या लक्षात आले नाही. परंतु, मृत्युनंतर जेव्हा या तरुणाचा मोबाईल तपासला असता त्यातून हा सर्व प्रकार उघड झाला. याप्रकरणी तुर्तास अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील कळस परिसरात राहणारा एक तरुण हा त्याच्या मामाच्या गावी गेला होता. यावेळी त्याची ओळख संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी परिसरात राहणार्‍या एका तरुणीशी झाली होती. या दोघांमध्ये पहिल्यांदा मैत्री झाली तर नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. कालांतराने यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि मग सुरू झाला त्यांच्या प्रेमाचा प्रवास. ही दोघे आपापल्या कुटुंबांच्या नजरेआड राहुन एकमेकांशी संवाद साधत होते. मात्र, याची साधी चुनूक देखील कोणाला लागली नाही.

दरम्यानच्या काळात ही दोघे प्रेमाच्या जाळ्यात अधिक फसत गेले. हा तरुण अगदी साधा भोळा असल्यामुळे तो त्या मुलीच्या प्रेमात इतका आकंठ बुडाला की, तीच्यासाठी तो जीव देखील देण्यास तयार होता. मात्र, ही तरुणी लहाण असली तरी सावध होती. म्हणजे, एखादा व्यक्ती आपल्यावर इतके प्रेम करु शकतो याची तिला कल्पना देखील नसावी. मात्र, दुर्दैवाने त्याचे मन त्याच्या ताब्यात राहिले नव्हते. जेव्हा या तरुणाने तिला भेटण्यासाठी विनंती केली तेव्हा नेहमीप्रमाणे तिने तिचा हेका कायम ठेवला. उलट या तरुणास तिने वारंवार झुरविण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारची चर्चा या गावात सुरू होती.

दरम्यान, सोमवारी जेव्हा या तरुणाने तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्याला प्रतिसाद देण्यास टाळाटाळ केली. उलट, तिने त्याला फसवत धमकविण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तो तिच्याशी व्हाटसअ‍ॅपवर बोलत होता तेव्हा तीने त्याला काही फोटो टाकले. ते फोटाच खर्‍या अर्थाने या तरुणाला आत्महत्या करण्यास भाग पाडून गेले. जर या तरुणाचा तिच्याशी योग्य संवाद झाला असता तर आज नुकताच वयात आलेला कोवळा मुलगा आपल्यात असता.

जेव्हा हा तरुण तिच्याशी संवाद साधत होता तेव्हा या तरुणीने त्याला एका विहीरीचे फोटो टाकले होते. आता मी आत्महत्या करीत आहे. त्यामुळे, मला संपर्क करु नको. असे म्हणत त्यांच्यात व्हाटसअ‍ॅपवर काही संभाषण झाले. या तरुणाने आपल्या प्रेयसिचे फोटो पाहिले आणि तो प्रचंड अस्वस्थ झाला. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिच राहिली नाही तर आपण का रहायचे? अशाच काहीसा प्रश्न त्याला पडला आणि त्याने काही वेळानंतर आपली जिवणयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी सकाळी त्याची आई कामासाठी घराबाहेर पडली होती. दिवसभर हा प्रकार घडला असता जेव्हा ती सायंकाळी घरी आली. तेव्हा या तरुणाचा मृतदेह घरात लटकताना दिसला.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. या तरुणाला वडिल नाही. आईने मोठ्या कष्टाने यास उभे केले होते. मात्र, दुर्दैवाने प्रेमाच्या भानगडीत पडल्याने एका चांगल्या तरुणाने आपला देह देवाच्या स्वाधिन केला. आता खर्‍या अर्थाने कायदेशीर विचार केला तर या आत्महत्येची चौकशी होणे गरजेचे आहे. जर असे झाले तर यातून भयानक वास्तव बाहेर येण्याची शक्यता आहे अशा प्रकारची मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेत कायदेशीर काय होईल ते होईल. मात्र, तरूणांनी प्रेम करताना हजारदा विचार केला पाहिजे. हेच  यातून प्रतीत होते.