भाजी विकताना प्रेम झाले अन चार वेळा गर्भपात केला.! बलात्कारचा गुन्हा.! अचानक बिंग फुटले.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरात जनतानगर परिसरातील महिला आणि मोहिनीनगर परिसरातील तरुण, या दोघांमध्ये भाजी विकताना मैत्री झाली आणि त्याचा रुपांतर नकळत प्रेमात झाले. नंतर, यांनी एकमेकांशी लग्न करण्याचे ठरविले मात्र, तरुणाने पीडित महिलेवर पाच वर्षे वेळोवेळी अत्याचार करुन तिला अचानक लग्नास नकार दिला. ही घटना शुक्रवार दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी पुर्वी घडली. जेव्हा या दोघांनी पीडित महिलेच्या घरी रंगेहात पकडले तेव्हा याच्या प्रेमाचे बिंग फुटले आणि नंतर पाच वर्षातील सर्व प्रकार समोर आला. आता याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार किरण बाबासाहेब खांडरे (रा. माहिनीनगर, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित महिला आणि तीचे पती यांच्यातील वाद न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे, पीडित महिला ही उपजिविकेसाठी भाजीपाला विकण्याचे काम करते. या दरम्यान तिची ओळख ही किरण खंडारे याच्यासोबत झाली होती. आता हा देखील संगमनेरात भाजी विकतो. त्यामुळे, सहाजिक त्याने या महिलेसोबत लगट केली आणि तिच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्तापित केले. हळुहळु यांची मैत्री इतकी घट्ट झाली की, त्याचे रुपांतर प्रेमात कधी झाले. हे त्यांना देखील कळले नाही. दोघांचा हाय हॅलो.! आणि या पलिकडे त्यांच्या घरी ये जा देखील सुरू झाली होती. त्यामुळे, पुढे प्रश्न वाढण्यास या दोघांनी एकमेकांना प्रोत्साहित केले होते.
दरम्यान, पीडित महिला ही तिच्या नवर्यापासून पोटगीसाठी लढत होती. त्यामुळे, किरण याने तिला सांगितले की, तुझा त्याच्यापासून घटस्पोट झाला की, मी तुझ्यासोबत लग्न करतो. असे म्हणल्यानंतर या दोघांचा एकमेकांवर विश्वास वाढला. पीडित महिलेला पहिल्या पतिपासून एक मुलगी आहे. तिचे लग्न आणि शिक्षण करुन देण्याचा शब्द त्याने तिला दिला होता. त्यामुळे, हे दोघे लग्न करतील असे शास्वत झाले होते. त्यामुळे, किरण हा राजरोस पीडित महिलेकडे जात होता. त्याच्या शरिर संबंध देखील होत होते. त्यातून पीडित महिला ही चार वेळा गरोदर राहिली होती. मात्र, आरोपीने तिला प्रत्येक वेळी गर्भपाताच्या गोळ्या देऊन त्याची विल्हेवाट लावली असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, 2021 मध्ये पीडित महिला ही तिच्या पालकांकडे राहण्यास गेली होती. तरी देखील खांडरे हा त्याच्या घराभोवती घिरट्या घालत होता. त्याची घरातील ये-जा ही काही व्यक्तीच्या लक्षात आली होती. तर दि. 14 जुलै 2021 रोजी किरण हा पीडित महिलेच्या घरी गेला होता. त्याने घरातील सर्वांची नजर चुकवून पीडित महिलेची इच्छा नसताना शरिर संबंध करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, या दोघांची कुजबुज सुरू असताना त्यांना तेथेच पकडण्यात आले. त्यावेळी, घरातच यांचे वादंग झाले. तेव्हा पीडितेच्या कुटुंबातील एका महिलेला या आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ दमदाटी केल्यामुळे, त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
आता हा प्रकार थेट पोलीस ठाण्यात गेल्यानंतर एक महिन्यानंतर पीडित महिलेने त्यास लग्नास विचारणा केली. मात्र, पहिल्या प्रकाराचा राग मनात असल्याने त्याने पीडितेस लग्नास नकार दिला. त्यामुळे, याच्यातील वाद फारच टोकला गेले आणि तु माझा झाला नाही तर तुला जेल दाखविल्याशिवाय राहणार नाही. असा निच्छय करुन तिने थेट पोलीस ठाणे गाठले. उपरोक्त मचकुरान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महाले करीत आहेत.