अकोल्यात क्लबवर छापा, नगरसेवकांसह प्रतिष्ठीत 12 व्यक्तींना अटक.! थेट नगरहुन कारवाई.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोल्यात साधे शौकीन माणसे नाहीत. तालुक्यात एका दिवसाला कोट्याधी रुपयांची जुगार वेगवेगळ्या ठिकाणी चालते. त्यात राजकारणी आणि व्यापारी व उद्योगपती यात मशगुल असतात. अशाच एका ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नगर व अकोले पोलिसांनी छापा टाकला. यात नगरसेवक, नगरसेवक त्यांचे पिता अशा अनेकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार दि. 7 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी करण्यात आली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विरगाव फाटा परिसरात भारत गायकवाड आणि अक्षय वाकचौरे ही दोघे तीरट नावाचा जुगार चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी त्यांचे पथन अकोल्याला पाठवून विरगाव फाटा परिसरात सापळा रचला. तर त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांची मदत घेतली. हे संयुक्त पथक घटनास्थळी पोहचले असता गायकवाड व वाकचौरे हे एका कोंबड्याच्या शेडमध्ये 10 जणांना घेऊन तिरट नावाचा जुगार (पत्त्या) खेळवत होते.
दरम्यान, जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा तेथे एकाच पळापळ झाली. मात्र, पोलिसांनी आरोपींवर झडप मारुन सगळ्यांना ताब्यात घेतले. यात अनिल निवृत्ती वाकचौरे (रा. निब्रळ, ता. अकोले), मानिक सखाराम चासकर (रा. बहिरवाडी, ता. अकोले), दिलीप काळु शिंदे (रा. शाहुनगर, ता. अकोले), अचानक दामोदर गायकवाड (रा. इंदोरी, ता. अकोले), भानुदास रावबा गोर्डे (रा. बहिरवाडी, ता. अकोले), संदिप जयराम वैद्य (रा. कुंभारी), मोरेश्वर शांताराम चौधरी (रा. अकोले), राजु तात्या लोखंडे (रा. अकोले), जयराम धोंडू लांघे (रा. शेणीत, ता. अकोले), पुंडलिक देवराम भिडे (रा. अकोले), अक्षय मारुती वाकचौरे (रा. परखतपुर, ता. अकोले), भारत सुखदेव गायकवाड (रा. शाहुनगर, अकोले) अशा 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, ही कारवाई थेट नगरहुन झाल्याने एक आश्चर्य व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे एक महत्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा-जेव्हा पोलीस एकाद्या जुगार आड्ड्यावर छापे टाकतात तेव्हा गाड्या आणि आरोपींचे मोबाईल देखील जप्त करतात. मात्र, दुर्दैवाने यात कोणी नगरसेवक तर कोणी उद्योजक आणि सावकार आहेत. तरी देखील यांच्याकडे मोबाईल मिळाले नाही, यांच्याकडे साधी एक सुद्धा गाडी मिळून आली नाही. म्हणजे हे सवर्र् मोबाईल वापरत नव्हते आणि सर्वजण शहरापासून तब्बल 10 किलोमिटर अंतरावर जुगार खेळण्यासाठी गेले होते. त्यामुळे, ते गाड्यांवर नव्हे तर पायी गेले होते की काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे मिथुन घुगे यांनी अकोल्यात आल्यानंतर पहिलीच रेड याच परिसरात मारली होती. तेव्हा मुद्देमालात दुचाकी आणि मोबाईल देखील होते. मात्र, स्थागुशाने कारवाई केल्याचे तालुक्यातून कौतुक होत आहे. मात्र, अवघा 25 हजार रुपयांचा मुद्देमाल प्रसिद्ध पत्रकात दाखविल्याने अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.