नऊ महिन्याची गरोदर असताना त्याने तिला लग्नास नकार दिला, मग तीने त्याच्यावर गुन्हा ठोकला.! संगमनेरात गुन्हा दाखल.!
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे एका तरुणीला लग्नाचे वचन देऊन त्याने तिच्याशी शरिर संबंध ठेवले. त्यानंतर ती नऊ महिन्यांची गरोदर असताना तिला घराबाहेर काढून देत लग्नास नकार दिला. त्यामुळे, संतापलेल्या तरुणीने तिच्या मानलेल्या पतीवर संगमनेर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2016 ते मंगळवार दि. 20 जुलै 2021 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील राजापूर परिसरात घडला आहे. यात नागेश गुलाब कराळे (रा. चांडोली फाटा, सावली अपार्टमेंट, खेड, जि. पुणे) याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे राहणार्या एका 28 वर्षीय तरुणीची खेड येथील नागेश कराळे या तरुणीशी ओळख झाली होती. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होण्यासाठी ते सोशल मीडियाच्या सहायाने एकमेकांशी बोलु लागले. हाय, हॅलो नंतर त्यांच्यात फोन सुरू झाले आणि दोघे सन 2016 पासून एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवस एकमेकांचा एकमेकावर चांगला विश्वास बसला आणि त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे देखील सुरू झाले. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांच्यात जेव्हा-जेव्हा शरिर सुखाची मागणी झाली तेव्हा मात्र या पीडित तरुणीने त्याच्या मित्राकडे लग्न करण्याचा हट्ट धरला.
दरम्यान, या तरुणाने सांगितले की, तू काळजी करु नको. मी तुझ्यशी लग्न करेल. त्याच्या अश्वासनानंतर दोघांची मने जुळली आणि त्यांच्यातील तारुण्याच्या लिला सुरू झाल्या. हा प्रकार 2016 ते अगदी 20 जुलै पर्यंत सुरू होता. दरम्यानच्या काळात यांच्यात प्रचंड वाद देखील झाले. मात्र, एकमेकांना समजून घेत हा प्रवास पाच वर्षे सुरु राहिला. यावेळी आरोपी नागेश याने पीडित मुलीच्या घरी जाऊन तिला विश्वासात घेतले व मी काही झाले तरी तुझ्याशी लग्न करेल असे अश्वासन दिले. त्यानंतर पीडित मुलीस दिवस गेले असता नंतर यांच्यात त्याहून पुन्हा वाद सुरू झाला. मात्र, लग्न करतो असे म्हटल्यामुळे तरुणीने त्याच्या शब्दाखातर त्रास दिला नाही.
दरम्यान, पीडित मुलीच्या आईने नागेश कराळे यास काही लोकांकडून उसने पैसे घेऊन दिले होते. त्याची मागणी केली असता या आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ केली. तर, पीडित मुलीची वापरती जुपीटर गाडी देखील तो घेऊन गेला. इतकेच काय.! पीडित मुलीने खरेदी केलेल्या गावातील मालमत्तेचे खरेदीखत आणि आधारकार्ड तसेच पॅनकार्ड घेऊन गेला. त्याच्या हा वागण्याचा राग आल्यामुळे पीडित तरुणीने नागेशवर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाले करीत आहे.