अगस्ति कारखान्याच्या 60 कोटींचा योग्य विनियोग करा. पिचडांच्या चंबुगबाळापाई तालुका गोत्यात आणायचा का.!
सार्वभौम (अकोले) :-
अगस्ति सहकारी साखर कराखाना अडचणीत असताना तो पुढे चालण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जिल्हा बँकेकडून पुन्हा 60 कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. त्या पैशाची आता उधळपट्टी करु नये, त्याचा योग्य विनियोग करावा. तर त्यासाठी आम्हाला देखील विश्वासात घेऊन संचालक मंडळ, कारखाना व्यवस्थापन आणि कर्मचारी मंडळ यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी, आम्ही देखील काही सुचना करु, त्या योग्य वाटल्या तर त्या घ्याव्यात अन्यथा सोडून द्याव्यात अशा प्रकारचे म्हणणे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, माजी प्रशासक बी. जे. देशमुख आणि शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत मांडले आहे. या मागणिसाठी यांनी कारखान्याचे व्हा.चेअरमन सिताराम पाटील गायकर यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, त्यांच्याकडून गेल्या 15 दिवसात कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे, आम्ही माध्यमांचा आधार घेतल्याचे त्यांना स्पष्ट केले.
यावेळी, डॉ. अजित नवले म्हणले की, कारखान्यातील महत्वाच्या विषयांना वाचा फोडण्यासाठी आम्ही एक मोहिम होती घेतली होती. मात्र, मध्यांतरीच्या काळात आमच्यामुळे कारखाना बंद पडू शकतो किंवा कर्ज उपलब्ध होण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. तथा कारखान्याची बदनामी होत आहे. त्यामुळे, आम्ही हा गळीत हंगाम (3 महिने) होईपर्यंत काही बोलणार नाही, असे ठरविले होते. मात्र, कारखाना सुरू होण्यासाठी आमचे सर्वोतपरी सहकार्य राहणार आहे. परंतु मधल्या काळात काही घटना घडल्या त्या सर्वांसमोर येणे अपेक्षित आहे. म्हणून आज पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. आज कारखान्याला जे काही कर्ज मिळाले आहे, त्याचे योग्य नियोजन होते की नाही. याबाबत आम्हाला शंका आहे. त्यामुळे, कर्जचा विनियोग होताना त्यात उस उत्पादक व सभासद अर्थात आमची देखील मते जाणून घ्यावीत. संवादाचा मार्ग आडवू नका. कारण, हा पैसा निघून गेल्यानंतर विचार मांडण्यात आणि चर्चा करण्यात काही एक अर्थ राहणार नाही. त्यामुळे, सभासद, व्यवस्थापन व कमर्र्चारी यांच्याशी संवाद झाला पाहिजे, संवादाची दारे तोडू नयेत असे मत डॉक्टरांनी मांडले.
निवृत्त प्रशासन बी. जे. देशमुख म्हणले की, कारखान्याची व्यवस्था बदलायची कशी? याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्याशी संपर्क केला होता. अकोल्याचे युनिट आपल्याला वाचवायचे आहे. ते कशा पद्धतीने वाचविता येईल? त्यानंतर मी उत्तर दिले की, कारखान्यात जी अतिरिक्त उधळपट्टी होते. ती थांबली पाहिजे. त्यामुळे, अजित पवार यांनी मला पुण्याला बोलावून घेतले होते. त्यानंतर पर्बत नाईकवाडी आणि आम्ही त्यांच्या भेटीसाठी गेलो होतो. जाताना आम्ही कारखान्याचा सर्व लेखाजोखा नेला होता. कारखान्यावरील कर्ज, ईथेनॉल प्रकल्पावरील कर्ज, बाहेरुन येणारा उस, अतिरिक्त कर्मचारी, वाढणारे व्याज, एफआरपी मधील फरक असे काही मुद्दे दादांशी चर्चात्मक पद्धतीने मांडले. दादांच्या 15 मिनिटांच्या बैठकीत जे काही मुद्दे मांडले. त्यानंतर दादांना सांगितले की, साहेब.! तुमच्या हस्तक्षेपाशिवाय हा कारखाना चालणे अशक्य आहे. त्यामुळे, जे 60 कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचा योग्य ठिकाणी विनियोग व्हावा हिच आमची इच्छा आहे. सध्या व्हेंटीलेटरवर असणार्या पेशन्टकडे दुर्लक्ष करू. पिचडांच्या अधिपत्याखाली चाललेल्या या कारखान्याच्या कारभाराला ऐकल्यानंतर अजित दादांनी देखील डोक्याला हात लावला.
तर, राज्याचे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत म्हणले की, आम्ही कारखान्याच्या दृष्टीने तह केला होता. तो आम्ही आजवर पाळला आहे. परंतु, कारखान्याच्या हिताच्या दृष्टीसाठी आम्ही गप्प राहणे योग्य ठरणार नाही. आम्ही सत्य दाखविण्याचा प्रयत्न करतो आहोत, जर सत्य दाखविणे चुक असेल तर आम्ही ती चुक करतो असे समजावे कारखान्याच्या हितासाठी असे आरोप आम्हाला मान्य आहे. येणार्या काळात संचालक मंडळ हे कर्ज कसे घेणार आहे, व्याज कसे भरणार आहे, त्याचे व्यवस्थापन कसे करणार आहे? याची माहिती आम्हाला द्यावी. कारखान्याच्या हिताला जर कोणी बाधा आणली तर आम्ही तेथे बोलणार. हे निच्छित असले तरी आम्ही 3 महिन्याच्या तहाला बांधिल आहोत.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक वेळी 81 कोटी रुपये घालून कारखाना चालवायचा, त्यात व्याज वेगळे त्यामुळे कारखाना चालविणे कसे शक्य आहे? काही झाले तरी कारखाना चालला पाहिजे. हे आमचे देखील म्हणणे आहे. मात्र, तो कसा चालणार? कारण, कारखान्यावर काही दिवसांपुर्वी बुशची चोरी झाली. त्याची किंमत शुल्लक का असेना. पण, त्याबाबत गुन्हा दाखल झाला पाहिजे होता. परंतु तो झाला नाही. त्यामुळे, यात सगळेच मिलीभगत आहेत का? अशी मला शंका येते. खरंतर हा कारखाना वाचला पाहिजे यासाठी आम्ही देखील योगदान दिले आहे. कारण, जेव्हा मधुकर पिचड हे राज्यात मंत्री होते तेव्हा अकोले तालुक्यातील ऊस हा संगमनेरला जात होता. तेव्हा आम्ही अकोल्यात अंदोलन केले होते. त्यावेळी मुंबईहून पिचड आले आणि म्हणले की, तुमच्यामुळे, माझे मंत्रीपद जाऊ शकते. तुम्ही मला माझ्ये चंबुगबाळ गुंडाळायला लावशाल. मात्र, तरी देखील आम्ही कोणाच्या दबावाला बळी पडलो नव्हतो. आम्ही संगमनेरला जाणार्या सर्व गाड्या आडविल्या होत्या. त्यावर ते म्हणाले की, मी जातो आणि मुंबईहून माझे चंबुगाबळ घेऊन येतो. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं. पिचड साहेब.! आम्ही तुमच्या चंबुगबाळासाठी तालुका गोत्यात घालायचा का? अशी माहिती सावंत यांनी दिली.