तू फार छान दिसते असे म्हणत पर्यटकाने तिला घट्ट मिठी मारली.! विरोध करताच अंडे फोडून स्टॉल उध्वस्त केला.! सहा जणांवर गुन्हा दाखल.!
- आकाश देशमुख
सार्वभौम (राजूर) :-
प्रती जम्मु कश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्या अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, मद्यपी आणि व्यसनाधिन पर्यटकांमुळे, स्थानिक नागरिक, पोलीस आणि छोटे-मोठे दुकानदार यांच्यावर जिवघेणे हल्ले देखील होऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी पोेलिसांवर हल्ला झाला होता. तर आता पुन्हा दोन हॉटेल चालक आणि एका महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तू फार चांगली दिसते म्हणून श्रीरामपूर तालुक्यातून आलेल्या पर्यटकांनी थेट एक महिलेला मिठी मारुन विरोध केल्याने तिचा बुचूडा धरुन समोरच्या टेबलावर अपटला. इतकेच काय.! तर, टपरीतील अंड्याचे ट्रे, बिसलेरी बॉक्स, कढाईतील तेल, दुधाचा कॅन, गॅसची शेगडी व इतर साहित्य फेकून देत स्टॉलमधील सामानाची नासधूस केली. याप्रकरणी सहा जणांवर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवार दि 23 जुलै 2021 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास एक महिला व तिचे पती आपल्या कुटुंबाची गुजरान करण्यासाठी एक स्टॉल चालवत होते. ही पीडित महिला हॉटेलमध्ये आलेल्या काही ग्राहकांना चहा बनवत होती. तोच अचानक तेथे एक तवेरा गाडी येऊन थांबली. काही क्षणात त्यातून सहा तरुण मुले खाली उतरले. आम्हाला अंडाभुर्जी भेटेल का? असे म्हणत त्यांनी विचारणा केली. त्यावर होय उत्तर देत या महिलेना त्यांची ऑर्डर देखील स्विकारली. यावेळी त्या सहापैकी एका मुलाने संबंधित महिलेच्या पतीस सिगारेटची मागणी केली. त्यावेळी, त्या गृहस्थाने सांगितले की, साहेब.! आम्ही येथे सिगारेट विकत नाही. त्यानंतर या तरुणाने स्टॅल चालकास शेजारच्या दुकानातून सिगारेट आणण्यासाठी सांगितले, परंतु स्टॉल मालक म्हणले की, मी सिगरेट आणायला जात नाही. त्यांच्या प्रतिउत्तराचा राग आल्याने एक तरुण थेट स्टॉलच्या काऊंटरमध्ये शिरला. आम्हाला नकार देतोस का?: असे म्हणत त्याने थेट मालकास मारहाण करण्यास सुरूवात केली.
दरम्यान, हा प्रकार काही क्षणात येथे थांबेल असे वाटत होतेे. मात्र, दुर्दैवाने त्यातील एका तरुणाची नजर स्टॉलवर असणार्या महिलेवर गेली. त्याने या वादाचा फायदा घेत महिलेचे स्वेटर जोराने ओढले. तू फार चांगली दिसते असे म्हणत त्याने तिचा हात धरून जोरात मोठी मारली. त्याच्या असल्या कृत्याने महिलेस लज्जा उत्पन्न होऊ लागल्याने पीडित महिलेने त्याच्या मिठीतुन सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला ते शक्य झाले नाही, तिच्या आक्रोशाचा आकांत वाढल्यामुळे तीने त्याला झटका देत बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिच्या केसांचा बुचडा धरून समोरील टेबलावर अदळविले आणि तिला दाबून धरले. त्यांच्या आरडाओरडीने शेजारी जे दुकानदार होते. त्यांनी तत्काळ आवाजाच्या दिशेने धाव घेतली आणि या छेडछाड करणार्यांना धडा शिकविण्याचा प्रयत्न केला. यावेळी, पीडित महिलेची सुटका झाली खरी. मात्र, जे लोक त्यांना सोडविण्यासाठी आले होते. त्यांना देखील या सहा तरुणांनी बेदम मारहाण केली.
मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आणि छेडाछेडी यामुळे भंडारदरा परिसरात एकच गलबला झाला. या पर्यटकांनी त्यांची हद्द येथेच थांबविली नाही तर अगदी फिल्मी स्टाईलने या तरुणांनी जोरजोरात अराडाओरड करीत पीडित महिलेच्या स्टॉलमधील अंड्याचे ट्रे, बिसलेरी बॉक्स, कढाई मधील तेल, दुधाचा कॅन, गॅसची शेगडी व इतर साहित्य फेकून देत स्टॉल मधील सामानाची नासधूस केली. तर जे लोक पीडित महिलेला सोडविण्यासाठी आले होते. त्यांच्या देखील स्टॉलवर जाऊन त्याच्या स्टॉलमध्ये असलेल्या सर्व वस्तू जमिनीवर फेकून दिल्या आणि हे सहाजन त्यांच्या एम एच 20 बी. एन 6192 या तवेरा गाडीतून निघून गेले. त्यांचा हा उन्माद अती झाल्यामुळे, भंडारदरा परिसरात असणारे सर्व स्टॉलवाले एकत्र झाले आणि त्यांनी थेट भंडारदरा फॉरेस्टच्या चेक पोस्ट गाठला. त्यांनी तेथील अधिकारी आडे साहेब यांना घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचार्यांनी सफेर रंगाची तवेरा गाडी अडविण्यास सांगितली.
दरम्यान, फॉरेस्ट खात्याने स्टॉल चालकांना संपुर्ण सहकार्य केले. गाडी आडविल्यानंतर तेथे राजूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना माहिती दिली. साहेबांनी तत्काळ घटनास्थळी घाव घेत सहा जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना राजूर पोलिस ठाण्यात आणले गेले. तेथे जाताच पोलिसांकडून त्यांचा यथेच्छ सन्मान करण्यात आला. पाहेे प्रसादाची वाट या सपाट्याची त्यांनी चांगलीच ओळख करुन देण्यात आली. तर या घटनेत आरोपी श्रीराम केशव जंगले (वय 26 रा. पुर्णवाद नगर वार्ड क्रमांक 07 श्रीरामपुर) अक्षय प्रभाकर गाडेकर (वय 28 रा. श्रीरामपूर) उमेश अशोक धनवटे (वय 31, रा. श्रीरामपुर), सुमित दत्तात्रय वेताळ (वय 27, रा. श्रीरामपूर) वैभव किशोर हिरे (वय 24, रा श्रीरामपूर), विशाल रामकृष्ण वेताळ (वय 24 रा. श्रीरामपूर) अशा सहा जणांना आरोपी करण्यात आले आहेत.
पर्यटकांनी भंडारदारा किंवा निसर्गाच्या सानिध्यात मद्य प्रशन करुन येऊ नये. अनेक तरुण आपल्या घरी देखील सांगून येत नाहीत. इकडे येऊन ते मौजमजा करतात. कोणीतरी एक व्यक्ती अतिरेख करतो. मात्र, त्याची शिक्षा सर्वांना भोगावी लागते. त्यामुळे, येणार्या प्रत्येक व्यक्तीने संयम बाळगला पाहिजे. येथील आदिवासी बांधव कोणला त्रास देत नाहीत. ते प्रमाणिक व प्रांजळ तसेच कष्टाळू स्वाभावाचे असून त्यांच्या सहनशिलतेचा अंत कोणी पाहू नये. निसर्ग ही आपल्याला लाभलेली देणगी असून ती जपली पाहिजे. पर्यावरणाचा र्हास होईल किंवा आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असे कोणी वागू नका. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
सपोनि.नरेंद्र साबळे (राजूर पोलीस)