बाप रे.! खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पोलीस उपाधिक्षकाने मागितली 2 कोटींची लाच.! दोघांना अटक, सर्वात मोठी कारवाई.!



- सागर शिंदे

सार्वभौम (मुंबई) :-

                    परभणी जिल्ह्यातील सेलु पोलीस ठाण्याच्या हाद्दीत एक अपघात झाला. त्यात एक मयत तर एक जखमी झाला होता. या संदर्भात मयत व्यक्तीची पत्नी व त्याचा मित्र यांच्यात फोनहून काही आक्षेपहार्य बोलणे झाले होते. या दरम्यान ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली की, हा अपघात नसून तो खून आहे. या असल्या आरोपामुळे, परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर ही क्लिप तेथील पोलीस उपाधिक्षक राजेंद्र रामकरण पाल व पोलीस नाईक गणेश लक्ष्मणराव चव्हाण यांच्या हाती लागली. जाळ्यात सावज सापडल्याने त्यांनी या व्यक्तीला ब्लॅकमेल करीत तब्बल दोन कोटी रुपयांची मागणी केली. काही एक चुक नसताना पोलीस खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देतात म्हटल्यानंतर दोन कोटींच्या तडजोडीनंतर 1 कोटी 50 लाख रुपये देणे ठरले. मात्र, जो जाळ्यात अडकणार त्याच्या ऐवजी लाचखोर डेप्युटी आणि त्याचा पित्तू हेच मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकले. दोन कोटींची लाच मागितल्याप्रकरणी या दोघांनी आता बेड्या ठोकण्यात आल्या असून मुंबईचे डीजी यांनी ही कारवाई मुंबई लाचलुचपतचे डीआयजी लखमी गौतम यांच्यावर सोपविली होती. त्यांच्या पथकाने 14 तास प्रवास करुन हे मिशन यशस्वी पार पाडले आहे. दरम्यान,  आज मुंबई पोलिसांनी पोलीस उपाधिक्षक राजेंद्र पाल यांच्या मुंबई येथील घरावर छापा टाकला असता. लाचलुचपत विभागाने त्यांच्या घरातून २४ लाख ८४ हजार रुपये अशी बेहिशोबी मालमत्ता हस्तगत केली आहे. याप्रकरणी अद्याप सखोल चौकशी सुरु आहे अशा माहिती मुंबई लाचलुचपत विभागाचे डिआयजी लखमी गौतम साहेब यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील सेलु पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सोमवार दि. 3 मे 2021 रोजी एक अपघात झाला होता. त्यानंतर या संदर्भात सेलु पोलीस ठाण्यात कलम 304 (अ), 279 व 427 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, यात जो व्यक्ती मयत झाला त्याच्या पत्नीने काही आरोप केले होते. ती ऑडिओ क्लिप परभणी जिल्ह्यात व्हायरल झाली होती. ही क्लिप पोलीस उपाधिक्षक राजेंद्र रामकरण पाल यांच्या हाती लागली असता त्यांनी तक्रारदार यास दि. 9 जुलै 2021 रोजी सेलु पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. त्याची चौकशी केली असता तक्रारदार म्हणला की, साहेब.! यात माझा काही दोष नाही. त्यावेळी, पाल म्हणाले की, तुला जर यातून बाहेर पडायचे असेल तर तुला दोन कोटी रुपये द्यावे लागतील.

दरम्यान, पाल यांच्याकडून तक्रारदार यांना प्रचंड त्रास देण्यात आला. त्यांच्याशी अर्वाच्छ भाषेत बोलुन शिवीगाळ, दमदाटी करून वारंवार 2 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. हा अतिरेख वाढत चालल्यामुळे, आता दादा कोणाकडे मागायची असा प्रश्न तक्रारदार यास पडला. त्यामुळे, त्यांनी परभणी पोलीस आणि स्थानिक लाचलुचपत विभाग यांच्यावर अविश्वास व्यक्त करीत गुरूवार दि. 22 जुलै 2021 रोजी थेट मुंबई गाठली. तेथे कोणाला मध्यस्ती न करता मुंबईचे डिजी साहेब यांना भेटून आपली कौफियत त्यांच्यापुढे मांडली. अर्थात सगळीच यंत्रणा भ्रष्ट नसते यावर विश्वास ठेऊन ते पुढे आले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार लेखी देत वरिष्ठ अधिकार्‍यांकडे न्यायाची मागणी केली.

दरम्यान, हे प्रकरण फार मोठे असून पोलीस उपाधिक्षक दर्जाचा अधिकारी इतकी मोठी रक्कम तो मागतो आहे. हे खरे आहे का? यासाठी राज्यातील सर्वात दक्ष असा लाचलुचपत विभाग म्हणजे मुंबई. त्यामुळे. याबाबत मुंबईच्या लाचलुचपत विभागाचे डिआयजी लखमी गौतम यांच्याकडे हे प्रकरण देण्यात आले. त्यांनी सहायक पोलीस आयुक्त आबासाहेब पाटील यांना आदेश करुन शुक्रवार दि. 23 जुलै 2021 रोजी या सर्व प्रकरणाची खात्री करण्यास सांगितले. त्यानंतर पाटील यांच्या पथकाची खात्री झाली की, पोलीस उपाधिक्षक राजेंद्र पाल याने दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली आहे. तर तडजोडी अंती यात 1 कोटी 50 लाख रूपये देणे ठरले आहे.

दरम्यान, लाचेचे टायटल क्लेअर होताच मुंबई लाचलुचपत विभागाचे पोलीस लखमी गौतम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली थेट परभणीत पोहचले. 14 तासांच्या प्रवासानंतर कोणत्याही प्रकारचा आराम न करता पाटील व पोलीस निरीक्षक बनगोसावी यांनी लाचलुचपतचा सापळा रचला. 2 कोटीनंतर दिड कोटी देणे निच्छित ठरले आणि त्यातील 10 लाख रुपये घेण्यासाठी पोलीस उपाधिक्षक राजेंद्र पाल याच्या हाताखाली काम करणारा पोलीस नाईक गणेश लक्ष्मणराव चव्हाण हा आला होता. सदर रक्कम ही तक्रारदार यांचे भाऊ यांनी चव्हाण याच्या हातावर टेकविताच परभणीत पहिल्यांदा अनोखा इतिहास रचला गेला. तो असा की, इतकी मोठी रक्कम आणि ते ही थेट मुंबईतून कारवाई. त्यात पोलीस उपाधिक्षक दर्जाचा अधिकारी आणि पोलीस कर्मचारी अशा दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यामुळे, मुंबई लाचलुचपत विभागाची दशहत आता राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे पोलीस खाते बदमान होत असताना दुसरीकडे कोणालाही पाठीशी न घालता अशा पद्धतीने कारवाया होतात. त्यामुळे, मुंबई पोलिसांचे कौतुक होत आहे.

तर यापुर्वी देखील लखमी गौतम यांच्या आरे विभाग पथकाने घर दुरुस्तीची परवानगी मिळण्यासाठी भ्रष्ट सीईओ याने सर्वसामान्य व्यक्तीकडून तब्बल 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तेव्हा या पथकाने दोघांनाही बेड्या ठेकल्या आहेत. जेव्हा ही कारवाई झाली तेव्हा लाचखोर मुख्य कार्यकारी अधिकारी याच्या घरावर छापा टाकण्यात आला. तेव्हा त्याच्याकडून 3 करोड 46 लाख 10 हजार रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तेव्हा लाचखोर सीईओ नथु राठोड आणि त्याचा शिपाई अरविंद तिवारी या दोघांनाही बेड्या ठोकल्या होत्या. काल परभणीत जी कारवाई झाली ती ही कारवाई मुंबई लाचलुचपत विभागाचे डीआयजी लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त आबासाहेब पाटील, निलम वाव्हळ, पोलीस निरीक्षक बनगोसावी, राहुल कारभारी पोलीस कर्मचारी गावडे, तेली, सणस, खरुवे, परब, झाझुंर्णे, सय्यद, चिंचोळकर आदी पथकाने केली. 

                                                                                                     लखमी गौतम