शंभर कोटी हाप्तेखोरीचा तपास संगमनेरात येऊन धडकला.! अधिकारी तथा डीसीपींची चौकशी.!

    


सार्वभौम (मुंबई) :-

                    मुकेश आंबानी यांच्या अ‍ॅन्टिलिया बंगल्याच्या बाहेर एका स्कार्पिओ गाडीत काही स्पोटक वस्तू सापडल्या होत्या. यात एपीआय सचिन वाझे याचे नाव पुढे आले. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शंभर कोटी हाप्तेखोरीच्या आरोपाने राज्य हदरुन गेले. त्यात मुंबईचा तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, त्या पाठोपाठ एन्काऊंटर स्पेशलिष्ट प्रदीप शर्मा, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह अनेकांच्या चौकशा लागल्या. यात पोलीस अधिकारी संजय पाटील व संगमनेरचे भूमिपुत्र डीसीपी राजू भुजबळ यांची देखील चौकशी करण्यात आली. त्यामुळे, भुजबळ हे अंबी खालसा या गावचे रहिवासी असून काल काही चौकशीसाठी सीबीआयचे पथक त्यांच्या घरी गेल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. पाटील आणि भुजबळ यांची 4 मार्च2021 रोजी पोलीस आयुक्तालयात भेट झाल्याची माहिती परमबीर सिंग यांनी दिली होती. तर याच वेळी वाझे देखील त्याच परिसरात असल्याचे त्यांची सांगितले होते. त्यामुळे, हा तपास थेट संगमनेर तालुक्यात येऊन पोहचला आहे. सीबीआय कर्मचार्‍यांच्या अचानक येण्याने संगमनेरात उलटसुलट चर्चा सुरू होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्पोटक वस्तुंच्या प्रकरणात अडकलेल्या सचिन वाझे याच्याकडून काही धक्कादयक माहिती समोर आली होती. तत्कालिन गृहमंत्री वाझे यास प्रतिमहिना शंभर कोटी रुपयांची वसुल करण्यास सांगत होते. अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते. तर याला उजाळा देत मुंबईचा तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक लेटरबँम्ब काढला आणि भलतीच खळबळ उडवून दिली. या पत्रात सिंग यांनी म्हटले होते की, दि. 4 मार्च 2021 रोजी समाजसेवा शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील व गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची पोलीस आयुक्तालयात भेट घेतली होती. यावेळी सिंग यांनी संजय पाटील यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चांचा देखील गोषवारा मांडला होता. त्यामुळे, या शंभर कोटीत कोणा-कोणाचे हात बरबटलेले आहेत? याचा शोध सीबीआय करीत होती.

दरम्यान, जेव्हा परमबीर सिंग यांनी जे काही आरोप केले होते. त्यावर सीबीआयने चौकशी केली. संजय पाटील यांना जबाबासाठी बोलविण्यात आले होते. त्यांनी सीबीआयला सांगितले की, मी अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वर बंगल्यावर गेलो होतो. तेथे देशमुख यांनी मला बार आणि पब्सच्या वसुलीबाबत काही एक विचारले नाही. मुंबईचा तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी मी काही चॅटींग केली आहे. दरम्यान, काही काळानंतर पाटील यांना सचिन वाझे हा भेटला होता. त्यावेळी त्याने वसुलीबाबत विषय काढला होता. त्यात त्याने गृहमंत्र्याचे नाव घेतले होते. याबाबत फार काही सखोल चर्चा झाली नाही. असे जबाब पाटील यांनी दिल्याची माहिती समोर आली होती.

तर, संगमनेर तालुुक्यात जो काही चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात असे आहे की, राजू भुजबळ हे देखील  दि. 4 मार्च 2021 रोजी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना पोलीस आयुक्तालयात भेटले होते. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत अन्य अधिकारी देखील होते. त्यात संजय पाटील नव्हते. भुजबळ यांनी देशमुख यांची भेट ही अदिवेशनाच्या ब्रिफिंग संदर्भात घेतली होती. यावेळी कोणत्याही प्रकारची अन्य चर्चा झाली नाही. तर एकंदर भुजबळ जेव्हा बाहेर आले. तेव्हा बाहेर येताना संजय पाटील हे त्यांना दारात भेटले होते. ही सर्व चर्चा जरी सुरू असली तरी भुजबळ यांच्याभोवती चौकशीचा ससेमिरा लागला आहे. सीबीआयने देशमुख यांच्यावर अनेकांच्या घरवर छापेमारी केली आहे. त्यामुळे, ही टिम संगमनेरात देखील चौकशी करुन गेली आहे. तर, हे आलेले पथक सीबीआयचे की इडीचे होते. याबाबत ना पोलिसांना माहित होते ना संगमनेरकरांना. त्यामुळे, सर्व संभ्रमाचे वातावरण होते.

प्रथमदर्शनी यात विशेष काही माहिती समोर आली नाही. मात्र, आंबी खालसा येथे राजू भुजबळ यांचे गाव आहे. त्यामुळे, येथे काय-काय आहे? घरी कोणकोण राहते, यांची स्थावर मालमत्ता, काही संशयीत गोष्टी यांच्यासह काही माहिती काढण्यासाठी ही टिम आली असावी असे बोलले जात आहे. भुजबळ यांच्या घरी त्यांचे माता-पिता राहतात तर त्यांच्या बंधुंचे एक औषधाचे दुकान त्यांच्या कुटुंबाच्या नावे काही शेती असून फारशी माहिती या अधिकार्‍यांनी मिळाली नाही. शेतकरी कुटुंबाप्रमाणे ही व्यवस्था असल्याचे पाहून हे अधिकारी निघून गेल्याची चर्चा आहे. मात्र, येणार्‍या काळात शंभर कोटी हप्तेखोरीत आणखी कोणी सांपडते का? हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.